Mr. Ravi Karunanayake, Foreign Minister of Sri Lanka meets PM Modi

श्रीलंकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रवि करुणानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज संवाद साधला.

आंतरराष्ट्रीय वेसाक दिनानिमित्त मागच्या महिन्यात श्रीलंका येथे दिलेल्या फलदायक आणि स्मरणीय भेटीला पंतप्रधानांनी यावेळी उजाळा दिला. परराष्ट्र व्यवहार मंत्री पदाची नवी जबाबदारी स्वीकारणारे करुणानायके यांचे त्यांनी अभिनंदन केले.

श्रीलंकेत नुकतीच उद्‌भवलेली पूरस्थिती आणि भूस्खलनामुळे झालेल्या जिवीतहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. यासंदर्भात भारत श्रीलंकेला मदत करण्यास कायम तत्पर राहिल, असा दिलासाही त्यांनी दिला.

श्रीलंकेतील पूरस्थिती आणि भूस्खलनानंतर भारताने तात्काळ केलेल्या मदतीबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री रवि करुणानायके यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. भारतासोबतची भागिदारी दृढ करण्याप्रति श्रीलंका सरकारच्या वचनबध्दतेची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
In Photos: PM Narendra Modi Prays At Kashi Vishwanath, Holds Trishul-Damru

Media Coverage

In Photos: PM Narendra Modi Prays At Kashi Vishwanath, Holds Trishul-Damru
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 30 एप्रिल 2026
April 30, 2026

Investment Magnet India: PLI Triumphs, FTA Deals & Defence Milestones — How PM Modi’s Vision is Reshaping the Nation