शेअर करा
 
Comments
India & Israel are committed to advance our engagement on several fronts: Prime Minister
Our engagement is multi-dimensional and wide-ranging: PM Modi to President of Israel
Our economic initiatives, emphasis on innovation, research & technological development match well with Israel’s strengths & capacities: PM
Israeli companies can scale up their tie-ups with our schemes of Make in India, Digital India, Skill India, and Smart Cities: PM
President Rivlin and I deeply value our strong and growing partnership to secure our societies: Prime Minister Modi
India is grateful to Israel for its clear support to India’s permanent candidature in a reformed UN Security Council: PM Modi
आदरणीय राष्ट्राध्यक्ष रेयुव्हेन रिव्हलीन

आणि प्रसारमाध्यमातील मित्रहो,

राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या शिष्टमंडळातील आदरणीय सदस्यांचे मी भारतात स्वागत करतो. राष्ट्राध्यक्ष रिव्हलीन हे पहिल्यांदाच भारतात येत आहेत. या विशेष प्रसंगी त्यांचे स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. महोदय, आपल्या भागिदारीचे नवे स्तंभ उभारण्याच्या दृष्टीने आपली भेट मोलाचे प्रोत्साहन देणारी आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी मागील वर्षी पहिल्यांदा इस्रायलला दिलेल्या भेटीनंतर आपल्या संबंधांना मिळालेली गती आपल्या भेटीमुळे पुढे कायम राहील. पुढच्या वर्षी दोन्ही देश संपूर्ण राजकीय संबंधांची 25 वर्षे पूर्ण करतील. या मैलाच्या दगडाच्या दिशेने प्रवास करताना काही आघाड्यांवरील आपली गुंतवणुक वाढविण्याप्रती आणि प्रादेशिक तसेच जागतिक मुद्द्यांबाबत आमचे स्वारस्य आणि चिंता लक्षात घेत एककेंद्राभिमुखता आणि समानता निर्माण करण्याप्रती आपण वचनबध्द आहोत.

मित्रहो,

आमची प्रतिबद्धता बहुमितीय आणि विस्तृत आहे. पुढील बाबतीत आम्ही सहयोगी आहोत.

– कृषी उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढविणे;

– संशोधन आणि नावीन्यपूर्ण दुव्यांना प्रोत्साहन;

– आमच्या समाजाच्या फायद्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ॲप्लिकेशन्सचा वापर;

– मजबूत व्यापार दुवे आणि गुंतवणूक संबंध जोडणे;

– आमच्या लोकांच्या सुरक्षेसाठी संरक्षण संबंधांची निर्मिती; आणि

– मोठ्या सांस्कृतिक आणि पर्यटन संबंधांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये दुवा निर्माण करणे.

– शैक्षणिक देवाण-घेवाणीला प्रोत्साहन. भारतीय विद्यार्थ्य़ांनी इस्रायलमध्ये आणि इस्रायलच्या विद्यार्थ्य़ांनी भारतामध्ये शिक्षणासाठी येणे, यातून आमच्या द्विपक्षीय भागीदारीचा एक महत्त्वाचा पूल निर्माण होऊ शकतो.

मित्रहो,

दिवसभरात, यापूर्वी झालेल्या चर्चेत, आमच्या देशांदरम्यान सुरू असलेल्या सहकार्याच्या काही प्रबळ क्षेत्रांबाबत राष्ट्राध्यक्ष रिव्हलीन आणि माझ्यात सहमती झाली. कृषी क्षेत्रातील इस्रायलची आधुनिकता आणि दुष्काळ प्रवण क्षेत्रातील सूक्ष्म सिंचन तसेच जल व्यवस्थापन क्षेत्रातील कुशलतेबाबत आम्ही सुपरिचित आहोत. परस्पर सहकार्याच्या दृष्टीने जल व्यवस्थापन आणि संवर्धन तसेच वैज्ञानिक संशोधन आणि विकासासाठी सहकार्य अशी दोन प्राधान्य क्षेत्रे आम्ही सुनिश्चित केली आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या मार्गक्रमणात इस्रायली कंपन्यांना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक संधी खुल्या झाल्या आहेत, यावर आम्हा दोघांचेही सहमत झाले आहे. आमचे आर्थिक उपक्रम आणि कार्यक्रम, नावीन्यावर भर, संशोधन आणि तांत्रिक विकास या बाबी इस्रायलची ताकद आणि क्षमतेशी जुळणाऱ्या आहेत. आमच्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्कील इंडिया आणि स्मार्ट शहरे या मुख्य पथदर्शी योजनांसोबत इस्रायलच्या कंपन्या हातमिळवणी करू शकतात. दोन्ही देशांमधील खाजगी क्षेत्रातील भागधारकांनी पुढाकार घेऊन दोन्ही देशांमध्ये वाणिज्य आणि गुंतवणूकीचे व्यावसायिक संबंध निर्माण करण्यासाठी या परिपूर्ण संधीचा वापर करावा, यासाठी मी प्रोत्साहन देईन. उच्च तंत्रज्ञानसंबंधी उत्पादन आणि सेवा क्षेत्रातही भारतीय आणि इस्रायली कंपन्या एकत्र काम करू शकतात. आमच्या चर्चेदरम्यान राष्ट्राध्यक्ष रिव्हलीन यांनी सांगितल्याप्रमाणे “मेक विथ इंडिया”च्या माध्यमातून दोन्ही देशांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच भौगोलिक लाभही होऊ शकतो. आमच्या भागीदारीतून रोजगार आणि दोन्ही देशांना भौगोलिक फायदा मिळू शकतो. माहिती तंत्रज्ञान सेवा हे असे एक क्षेत्र आहे, ज्यातील भागीदारीच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना मोठा फरक जाणवू शकतो.

मित्रहो,

राष्ट्राध्यक्ष रिव्हलीन आणि मी, आमचे समाज सुरक्षित राखण्यासाठी आमच्या मजबूत आणि वृद्धिंगत होणाऱ्या भागिदारीचे मोल जाणतो. दहशतवाद आणि अतिरेकी संघटनांद्वारे आमच्या नागरिकांना सातत्याने घाबरविले जात आहे. दहशतवाद हे जागतिक आव्हान आहे, तो कोणत्याही सीमा जाणत नाही आणि संघटित गुन्ह्यांच्या इतर प्रकारच्या गुन्ह्यांशी दहशतवादाचे धागेदोरे जोडलेले आहेत, हे आम्ही जाणतो. दुर्दैवाने त्याचा उगम असणारा आणि प्रसार करणारा देश भारताच्या शेजारीच आहे. दहशतवादी जाळे तसेच त्यांचे अस्तित्व असणारी ठिकाणे निश्चित करणे आणि ती नष्ट करण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय समुदायाने पावले उचलली पाहिजेत, याबाबत आम्ही सहमत आहोत. कृती करण्यातील अपयश आणि मौन बाळगल्याने दहशतवादाला प्रोत्साहनच मिळते. सर्व शांतताप्रिय देशांमध्ये दहशत पसरवणाऱ्या अतिरेकी बलांशी लढा देऊन त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आमचे सहकार्य वाढविण्याबाबतही आमच्यात एकमत आहे. सायबर क्षेत्रात प्रत्यक्ष आणि विशिष्ट सहकार्य वाढविण्याला आम्ही प्राधान्य देतो. आमच्या संरक्षणविषयक वाढत्या सहकार्याच्या ताकतीची आम्हाला जाणीव आहे आणि उत्पादन तसेच उत्पादकता भागिदारीच्या माध्यमातून तिचा अधिक विस्तार करण्याच्या आवश्कतेबाबतही आमची सहमती झाली आहे. सुधारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी उमेदवारीसाठी इस्रायलने दिलेल्या पूर्ण पाठिंब्याबद्दलही भारत आभारी आहे.

मित्रहो,

इतर लोकशाहीप्रधान देशांप्रमाणेच आमचे नागरिक ही आमची सर्वात मोठी शक्ती आहे आणि ते सक्षम भारत-इस्रायल भागिदारीचे सर्वात मोठे लाभधारकही आहेत. भारतातील 2000 वर्षे जुना ज्यू समुदाय भूतकाळाशी दुवा जोडणारा आहे. आज, आमच्या समग्र सांस्कृतिक प्रतिमेचा तो अविभाज्य घटक असून आजही ती परंपरा कायम राहिली आहे. भारतातील ज्यू समुदायाचा आम्हाला अभिमान वाटतो. दीर्घ इतिहास असणाऱ्या आमच्या लोकांच्या परस्पर संबंधांना प्रोत्साहन द्यावे, याला आमचे प्राधान्य राहील, याबाबत राष्ट्राध्यक्ष आणि माझ्यात एकमत झाले.

 


आदरणीय महोदय,

अडीच दशकांच्या आपल्या मैत्रीने दोन्ही देशांना उत्तम लाभ दिले आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर शांतता, स्थैर्य आणि लोकशाहीचा पुरस्कार करण्याच्या भूमिकेला बळ मिळाले आहे. आपल्या भेटीमुळे आपल्या भागिदारीची नवी दालने खुली करण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे. या शब्दांसह भारत भेटीसाठी पहिल्यांदाच आलेले राष्ट्राध्यक्ष रिव्हलिन यांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि भारतातील त्यांचे वास्तव्य फलदायक आणि आनंददायी असावे, अशी सदिच्छा व्यक्त करतो.

धन्यवाद…
Share your ideas and suggestions for 'Mann Ki Baat' now!
Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
India saw 20.5 bn online transactions worth Rs 36 trillion in Q2

Media Coverage

India saw 20.5 bn online transactions worth Rs 36 trillion in Q2
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Social Media Corner 5th October 2022
October 05, 2022
शेअर करा
 
Comments

Citizens give a big thumbs up to the unparalleled planning and implementation in healthcare and other infrastructure in Himachal Pradesh

UPI payments double in June quarter, accounted for over 83% of all digitally made payments in India