द्विपक्षीय संबंधांना 'धोरणात्मक भागीदारी' पर्यंत उन्नत करण्यात आले.
सीमाशुल्क विषयक सहकार्य आणि परस्पर प्रशासकीय सहाय्याबाबत करार.
इथिओपियाच्या परराष्ट्र मंत्रालयात डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार.
संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमांसाठी प्रशिक्षण सहकार्याबाबत अंमलबजावणी व्यवस्था.
जी20 कॉमन फ्रेमवर्क अंतर्गत इथिओपियाच्या कर्ज पुनर्रचनेबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत इथिओपियन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दुप्पट करण्यात येणार.
भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (ITEC) कार्यक्रमांतर्गत इथिओपियाचे विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात विशेष अल्प-मुदतीचे अभ्यासक्रम.
आदिस अबाबा येथील महात्मा गांधी रुग्णालयाची क्षमता वाढवण्यासाठी भारताकडून सहकार्य, विशेषतः माता आरोग्यसेवा आणि नवजात शिशु काळजी या क्षेत्रांसाठी मदत.


