अनुक्रमांक

सामंजस्य करार/ करार/ इरादापत्र

तपशील

1

भारत आणि ऑस्ट्रिया यांच्या दरम्यान दृक्श्राव्य कार्यक्रमांच्या सह-निर्मिती बाबत करार

हा करार दोन्ही देशांतील चित्रपट उद्योगांच्या दरम्यान वाढीव सहकार्यासाठीची चौकट उपलब्ध करून देईल आणि संयुक्त चित्रपट निर्मिती, सर्जनशील देवाणघेवाण तसेच अधिक उत्तम सांस्कृतिक सहभागासाठी सुलभता निर्माण करेल.

2

भारतीय तसेच ऑस्ट्रियन कंपन्यांसाठी द्रुतगती यंत्रणा उभारण्याबाबत संयुक्त घोषणा

भारतीय तसेच ऑस्ट्रियन कंपन्या आणि परस्परांच्या अर्थव्यवस्थांमधील गुंतवणूकदार यांच्यासमोर उभ्या राहणाऱ्या समस्या ओळखून त्या सोडवण्यासाठी सदर द्रुतगती यंत्रणा उपयुक्त ठरेल. तसेच व्यापार करण्यातील सुलभतेच्या संदर्भात गुंतवणूकदारांच्या दृष्टीकोनातून सर्वसामान्य सूचनांची चर्चा करण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून देखील ही द्रुतगती यंत्रणा कार्य करेल

3

लष्करी बाबींमधील सहकार्याबाबत इरादापत्र

हे इरादापत्र दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी झालेल्या भारत-ईयू संरक्षण आणि सहकार्यविषयक भागीदारी करारातील प्रगतीच्या आधारावर, लष्करी बाबी, संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक आणि तंत्रज्ञानविषयक भागीदारी यांतील सहकार्याला चालना देण्यासाठी संस्थात्मक चौकट निर्माण करेल तसेच संरक्षण धोरणविषयक संवाद, प्रशिक्षण तसेच क्षमता उभारणी अधिक सुलभ करेल

4

दहशतवाद विरोधासंदर्भातील संयुक्त कृतिगटाबाबत इरादापत्र

या इरादापत्राच्या मदतीने भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यादरम्यान दहशतवादविरोधी सहकार्यात वाढ करता येईल तसेच यामध्ये दहशतवादाशी लढताना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत धोरणात्मक सहकार्याची क्षेत्रे शोधण्यासाठी दहशतवाद विरोधी संयुक्त कृतिगटाची स्थापना करण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकत्र येऊन काम करण्याच्या उद्दिष्टाचा समावेश आहे.

 

 

5

ऑस्ट्रियाची एजीईएस आणि भारतातील एफएसएसएआय ही संस्था यांच्या दरम्यान अन्न सुरक्षेच्या संदर्भात सामंजस्य करार

या करारामुळे अन्न सुरक्षा विषयक मानके, शास्त्रीय देवाणघेवाण, क्षमता निर्मिती तसेच अन्न नियमन आणि जोखीम मूल्यांकनातील सर्वोत्तम पद्धतींचे सामायीकीकरण अशा विविध क्षेत्रांतील सहकार्याला चालना मिळेल आणि त्यायोगे सुरक्षाविषयक मानकांना सर्वोच्च प्राधान्यक्रम दिला जाईल याची सुनिश्चिती करतानाच कृषी तसेच अन्न उत्पादनाच्या व्यापाराला चालना मिळेल

6

दुहेरी व्यावसायिक प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि व्यावसायिक पात्रतेला दिल्या जाणाऱ्या मान्यतेच्या संदर्भात संयुक्त इरादापत्र

सदर इरादापत्र दुहेरी व्यावसायिक प्रशिक्षण (शिकाऊ उमेदवारी), कौशल्य विकास तसेच ऑस्ट्रियन मानकांना अनुसरुन असलेल्या भारतीय व्यावसायिक पात्रतांना मान्यता देण्याला चालना देणे यांसारख्या क्षेत्रांमध्ये देवाणघेवाण तसेच ज्ञानाचे सामायीकीकरण विस्तारण्यासाठी उपयुक्त ठरेल.

 

घोषणा

अनु. क्र.

शीर्षक

1

रस्ते पायाभूत सुविधा क्षेत्रातील तांत्रिक सहकार्यावरील सामंजस्य कराराचे नूतनीकरण

(हा सामंजस्य करार इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स(आयटीएस), रस्ते सुरक्षा, इलेक्ट्रॉनिक पथकर संकलन आणि वाहतूक व्यवस्थापन या क्षेत्रांमधील तांत्रिक सहकार्य अधिक बळकट करण्यास मदत करेल.)

 

2

भारत-ऑस्ट्रिया ‘स्टार्टअप ब्रिज’ अंतर्गत स्टार्टअप परिसंस्थांचे वर्धित सहकार्य.

(दोन्ही देशांमधील स्टार्टअप्स, युनिकॉर्न्स , नवोन्मेष परिसंस्था आणि व्हेंचर कॅपिटल नेटवर्क्स दरम्यान निरंतर सहकार्य)

 

3

संस्थात्मक सायबर सुरक्षा संवादाचा प्रारंभ

4

भारताचे संयुक्त राष्ट्र शांतता मोहीम केंद्र आणि ऑस्ट्रियन सशस्त्र दल आंतरराष्ट्रीय केंद्र (AUTINT) यांच्यात भागीदारी

5

2026 च्या शरद ऋतूमध्ये व्हिएन्ना येथे द्विपक्षीय अंतराळ उद्योग परिसंवाद संयुक्तपणे आयोजित करण्याचा करार; संयुक्त निवेदनात समाविष्ट

6

‘वर्किंग हॉलिडे’ कार्यक्रम कार्यान्वित करणे

7

भारत-ऑस्ट्रिया वर्धित भागीदारीचा एक मध्यवर्ती आधारस्तंभ म्हणून उच्च-तंत्रज्ञान सहकार्य

 

(विज्ञान आणि तंत्रज्ञान संयुक्त समिती अंतर्गत पदार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्वांटम तंत्रज्ञान, सांडपाणीप्रक्रिया, मशीन लर्निंग, लेझर्स इत्यादी क्षेत्रांमधील अनेक सहयोगी संशोधन आणि विकास प्रकल्प चिन्हांकित )

 

 

8

शिक्षण क्षेत्रातील सहकार्यावर एक सुव्यवस्थित द्विपक्षीय संवाद सुरू करणे.

(कौशल्य विकासाला चालना देणे, अभ्यासक्रम विकासाला प्रोत्साहन देणे, पात्रतेला परस्पर मान्यता सुलभ करणे, आणि उच्च शिक्षण व व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण प्रणालींच्या विकासात संस्थात्मक सहकार्याला पाठिंबा देणे हा याचा उद्देश आहे.)

 

9

भारतासोबत शैक्षणिक आणि संशोधन सहकार्य पद्धतशीरपणे अधिक दृढ करण्यासाठी ऑस्ट्रियाच्या प्रमुख तांत्रिक विद्यापीठांचा 'फोकस इंडिया' उपक्रम

 

(ऑस्ट्रियातील तीन सरकारी तंत्रज्ञान विद्यापीठांद्वारे (व्हिएन्ना तंत्रज्ञान विद्यापीठ , ग्राझ तंत्रज्ञान विद्यापीठ आणि मोंटान विद्यापीठ लोबेन ) ऑस्ट्रियामध्ये अभियांत्रिकी आणि तांत्रिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश सुलभ करण्यासाठी एका समर्पित पोर्टलची सुरुवात.)

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Cotton duty relief: Textile industry welcomes import tax waiver, sees boost for exports and MSMEs

Media Coverage

Cotton duty relief: Textile industry welcomes import tax waiver, sees boost for exports and MSMEs
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 31 मे 2026
May 31, 2026

India’s Golden Chapter: Maritime Might, Digital Revolution & Nari Shakti Under PM Modi