पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शानदार रोड शो केला. पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाला पाठिंबा करण्यासाठी लोक प्रचंड संख्येने रस्त्यावर जमले होते. उत्साही जनसमुदाय 'मोदी मोदी', 'भारत माता की जय' आणि 'फिर एक बार मोदी सरकार'च्या घोषणा देत होता. पंतप्रधानांच्या ताफा शहरातून मार्गक्रमण करत असताना समर्थकांकडून करण्यात येत असलेल्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षावातून त्यांचे प्रेम दिसण्याबरोबरच वातावरणात प्रचंड ऊर्जा निर्माण झाली होती.













