युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट 2024 रोजी युक्रेनला भेट दिली. दोन्ही देशांमध्ये 1992 साली राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यापासून भारतीय पंतप्रधानांनी युक्रेनला दिलेली ही पहिलीच भेट होती.

राजकीय संबंध

दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांना भविष्यात सर्वसमावेशक भागीदारीवरून धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित  करण्याच्या दिशेने काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

दोन्ही देशांच्या जनतेच्या हितासाठी परस्पर विश्वास, आदर आणि स्पष्टता यावर आधारित द्विपक्षीय संबंध अधिक विकसित करण्याप्रति वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

उभय नेत्यांनी गेल्या तीन दशकांत लक्षणीयरीत्या बळकट झालेल्या द्विपक्षीय संबंधांच्या स्थिर आणि सकारात्मक वाटचालीचा आढावा घेतला. तसेच जी-7 शिखर परिषदांच्या निमित्ताने जून 2024 मध्ये अपुलिया आणि मे 2023 मध्ये हिरोशिमा येथे झालेली बैठक, मार्च 2024 मध्ये युक्रेनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची नवी दिल्लीला भेट, भारताचे आणि युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री यांच्यात तसेच  भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि युक्रेनच्या अध्यक्षांच्या कार्यालयाचे प्रमुख यांच्यात अनेकदा झालेला संवाद आणि दूरध्वनी संभाषण, परस्पर सामंजस्य, विश्वास आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी जुलै 2023 मध्ये कीव येथे परराष्ट्र कार्यालयांदरम्यान सल्लामसलतींसाठी झालेली चर्चेची नववी फेरी यांसारख्या विविध स्तरांवर भारत आणि युक्रेन दरम्यान नियमितपणे झालेल्या संवादाची त्यांनी प्रशंसा केली.

व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2024 आणि रायसीना संवाद 2024 मध्ये युक्रेनचे अधिकृत शिष्टमंडळ सहभागी झाल्याबद्दल उभय नेत्यांनी प्रशंसा केली.

सर्वसमावेशक, न्याय्य आणि चिरस्थायी शांततेची सुनिश्चिती

पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष झेलेन्स्की यांनी प्रादेशिक अखंडता तसेच देशाच्या  सार्वभौमत्वाचा आदर यासारख्या संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरसह आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचे पालन करण्यात सहकार्य दृढ करण्यासाठी तयार असल्याचा पुनरुच्चार केला. या संदर्भात अधिक निकट द्विपक्षीय संवाद व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारताने आपल्या तत्त्वनिष्ठ भूमिकेचा तसेच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून शांततापूर्ण तोडगा काढण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा पुनरुच्चार केला. याचाच एक भाग म्हणून, जून 2024 मध्ये स्वित्झर्लंडमधील बर्गेनस्टॉक येथे  युक्रेनमधील शांततेबाबत आयोजित शिखर परिषदेत भारत सहभागी झाला होता.

युक्रेनकडून भारताच्या या सहभागाचे स्वागत करण्यात आले आणि पुढील शांतता शिखर परिषदेत भारताच्या उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

युक्रेनमधील शांततेबाबत शिखर परिषदेत मान्यता देण्यात आलेल्या शांतता आराखड्यावरील संयुक्त निवेदन संवाद, मुत्सद्दीपणा आणि आंतरराष्ट्रीय कायद्यावर आधारित न्याय्य शांततेला चालना देण्याच्या प्रयत्नांसाठी एक उपयुक्त दस्तावेज ठरू शकेल, असे युक्रेनने सांगितले.

युक्रेनमधील मानवतावादी धान्य उपक्रमासह जागतिक अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केल्या जात असलेल्या विविध प्रयत्नांची उभय नेत्यांनी प्रशंसा केली. जागतिक बाजारपेठांमध्ये विशेषत: आशिया आणि आफ्रिकेतील कृषी उत्पादनांच्या अखंड आणि विनाअडथळा पुरवठ्याच्या महत्त्वावर  भर देण्यात आला.

शांतता लवकर पुनर्स्थापित करण्यासाठी व्यापक स्वीकारार्हता आणि  योगदान देऊ शकतील, असे अभिनव उपाय विकसित करण्यासाठी सर्व संबंधितांचा प्रामाणिक आणि व्यवहार्य सहभाग आवश्यक असल्याचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला. युक्रेनमध्ये लवकरात लवकर शांतता नांदावी यासाठी शक्य त्या सर्व मार्गांनी मदत करण्यास भारत तयार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

आर्थिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्य

दोन्ही देशांमधील व्यापार आणि उद्योगाच्या मोठ्या सहभागाच्या माध्यमातून डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उद्योग, उत्पादन, हरित ऊर्जा इत्यादी क्षेत्रांमध्ये मजबूत भागीदारीच्या संधी शोधण्याबरोबरच व्यापार आणि वाणिज्य, कृषी, औषधनिर्माण, संरक्षण, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि संस्कृती यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

दोन्ही देशांदरम्यान भविष्यवेधी आणि मजबूत आर्थिक भागीदारी सुलभ करण्यासाठी व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक सहकार्यावरील भारत-युक्रेन आंतरसरकारी आयोगाच्या (आयजीसी) महत्त्वावर उभय नेत्यांनी भर दिला.

मार्च 2024 मध्ये युक्रेनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान झालेली आंतरसरकारी आयोगाची (आयजीसी) आढावा बैठक तसेच 2024 मध्ये परस्परांच्या सोयीने आयजीसी चे सातवे अधिवेशन लवकर बोलावण्याच्या दृष्टीने संयुक्त कार्यगटाच्या बैठका घेण्याच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची आयजीसी चे सह-अध्यक्ष/अध्यक्ष म्हणून करण्यात आलेल्या नियुक्तीचे युक्रेनने स्वागत केले.

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या आव्हानांमुळे वर्ष 2022 पासून वस्तूंच्या वार्षिक द्विपक्षीय व्यापारात लक्षणीय घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर, उभय नेत्यांनी आयजीसीच्या सह-अध्यक्षांना द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंध युद्ध-पूर्व पातळीपर्यंत पूर्ववत करण्यासाठी तसेच हे संबंध अधिक विस्तारण्यासाठी आणि दृढ करण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजनांची चाचपणी करण्याचे निर्देश दिले.

भारत-युक्रेनदरम्यान वाणिज्य आणि व्यापाराला चालना देण्यातील अडथळे दूर करण्याबरोबरच परस्पर आर्थिक व्यवहार  आणि गुंतवणुकीसाठी व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या महत्त्वावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. संयुक्त प्रकल्प, सहकार्य आणि उपक्रमांच्या संधींचा शोध घेण्यासाठी सरकारी तसेच व्यावसायिक स्तरावर सहभाग वाढवण्याला दोन्ही देशांनी प्रोत्साहन दिले.

उभय देशांमधले कृषी क्षेत्रातले  दृढ संबंध  आणि मानके आणि प्रमाणन प्रक्रियांच्या ताळमेळासह  पूरक क्षेत्रातल्या  सामर्थ्याच्या बळावर द्विपक्षीय संवाद आणि बाजारपेठ पोहोच वृद्धिंगत करण्याचा मानस असल्याचे स्मरण दोन्ही नेत्यांनी  केले.

औषध निर्मिती  क्षेत्रातले सहकार्य हा  भागीदारीच्या भक्कम स्तंभांपैकी एक असल्याचे जाणून या नेत्यांनी परीक्षण , निरीक्षण  आणि नोंदणी प्रक्रिया यासह व्यापक बाजार पोहोच,गुंतवणूक सुलभता आणि संयुक्त प्रकल्प सुविधा यासाठीच्या  इच्छेच्या नेत्यांनी पुनरुच्चार केला.  प्रशिक्षण आणि उत्तम पद्धतींचे आदान-प्रदान यासह औषधे आणि औषध उत्पादन क्षेत्रात सहकार्य आणखी विस्तारण्याची इच्छा दोन्ही बाजूनी व्यक्त केली. भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि स्टेट सर्विस ऑफ युक्रेन यांच्यात औषधे आणि औषध नियंत्रण संदर्भातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याचे त्याचबरोबर औषध निर्मिती सहकार्यावरच्या भारत- युक्रेन संयुक्त कृती गटाच्या ऑगस्ट 2024 मध्ये व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित  तिसऱ्या  बैठकीचे त्यांनी स्वागत केले.  किफायतशीर आणि दर्जेदार औषधांच्या पुरवठ्यासाठी विश्वासार्ह स्त्रोत म्हणून युक्रेनच्या बाजूने भारताची प्रशंसा करण्यात आली.  

द्विपक्षीय संबंधांविषयी कायद्याचा ढाचा विस्तारण्यासाठीच्या, विशेषकरून गुंतवणुकीचे परस्पर संरक्षण,आणि शैक्षणिक दस्तावेज, शैक्षणिक पदवी यांच्या  परस्पर मान्यतेच्या शक्यता यासंदर्भातल्या कामाला अधिक वेग देण्यासाठी  दोन्ही बाजूनी सहमती दर्शवली.  

भारत आणि युक्रेन दरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य कराराच्या यशस्वी अंमलबजावणीची दखल घेत विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यावरच्या संयुक्त कृती गटाची प्रभावी कार्य पद्धती आणि द्विपक्षीय संशोधन प्रकल्प पूर्णत्वाला गेल्याचे लक्षात घेऊन दोन्ही बाजूंनी विशेषकरून आयसीटी, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निग, क्लाउड सर्व्हिसेस, जैव तंत्रज्ञान,नवी सामग्री,हरित उर्जा आणि पृथ्वी विज्ञान या क्षेत्रात नियमित आदान-प्रदान आणि कार्यक्रम आयोजित करण्याला दोन्ही बाजूनी प्रोत्साहन दिले.  वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्यावरच्या संयुक्त कृती गटाच्या 20 जून 2024 रोजी झालेल्या 8 व्या बैठकीचे त्यांनी स्वागत केले.

संरक्षण सहकार्य

भारत आणि युक्रेन यांच्यातल्या संरक्षण  सहकार्याचे महत्व अधोरेखित करत , दोन्ही देशातल्या संरक्षण आस्थापनांमध्ये अधिक दृढ संबंध सुलभ करण्याच्या दृष्टीने, काम जारी ठेवण्याला उभय नेत्यांनी सहमती दर्शवली यामध्ये  संयुक्त प्रकल्प, भारतात उत्पादनासाठी भागीदारी आणि नव्याने उदयाला येणाऱ्या क्षेत्रांचा समावेश आहे. 2012 मध्ये संरक्षण सहकार्य कराराअंतर्गत  स्थापन झालेल्या लष्करी – तंत्रज्ञान सहकार्यावरच्या भारत  - युक्रेन संयुक्त कृती गटाची दुसरी बैठक नजीकच्या भविष्यात  भारतात घेण्यालाही दोन्ही बाजूंनी मान्यता दिली.

सांस्कृतिक आणि दोन्ही देशांमधल्या जनतेमधले संबंध  

भारत आणि युक्रेन यांच्यातल्या स्थायी मैत्रीमध्ये सांस्कृतिक आणि दोन्ही देशांमधल्या जनतेतल्या परस्पर संबंधांच्या महत्वाच्या भूमिकेची दखल घेऊन दोन्ही बाजूनी,सांस्कृतिक सहकार्याच्या द्विपक्षीय  कार्यक्रमाची  सांगता आणि भारत आणि युक्रेन मध्ये सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य कार्यक्रमाअंतर्गत देण्यात येत असलेली शिष्यवृत्ती,भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची सर्वसाधारण सांस्कृतिक शिष्यवृत्ती योजना यासह जनते-जनतेमधले आणि सांस्कृतिक आदान-प्रदान जारी राखण्याच्या आणि अधिक वृद्धिंगत करण्याच्या महत्वावर या नेत्यांनी भर दिला.

दोन्ही देशातल्या नागरिकांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांच्या शाखा सुरु करण्याच्या शक्यता आजमावण्याला उभय बाजूनी मान्यता दिली.  

दोन्ही देशांमधल्या लोकांमध्ये संबंध आणि मित्रत्वाचे नाते विकसित करण्यात  युक्रेनमधल्या भारतीय समुदायाच्या योगदानाची नेत्यांनी प्रशंसा केली.

2022 च्या सुरवातीच्या महिन्यात युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात युक्रेनने केलेली मदत आणि सहकार्य आणि त्यानंतर युक्रेनमध्ये परतलेले  भारतीय नागरिक  आणि विद्यार्थ्यांची  सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी युक्रेनप्रती  भारताच्या बाजूने  कृतज्ञतेचा पुनरुच्चार करण्यात आला. भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी  सुलभ व्हिसा  आणि नोंदणी सुविधा यासंदर्भात युक्रेनच्या बाजूने सातत्यपूर्ण सहाय्य ठेवावे अशी भारताने विनंती केली आहे.

युक्रेनला पुरवलेल्या मानवतावादी सहाय्याबद्दल युक्रेनच्या बाजूने भारताप्रती  कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भारत आणि युक्रेन दरम्यान उच्च प्रभाव सामुदायिक विकास प्रकल्पावर सामंजस्य करार संपन्न झाल्याचे स्वागत करण्यात आले, भारतीय अनुदान सहाय्यातून परस्पर संमतीच्या प्रकल्पांचा विकास यातून शक्य होणार आहे.

युक्रेनची पुनर्निर्मिती आणि पुनर्बांधणीमध्ये उचित पद्धतीने भारतीय कंपन्यांच्या योगदानाची शक्यता आजमावण्यासाठी दोन्ही पक्ष सहमत झाले.

या नेत्यांनी दहशतवादाचा स्पष्टपणे निषेध केला. आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्र सनद यांच्या आधारावर या क्षेत्रात वाढत्या सहकार्याचे महत्व लक्षात घेत  कोणत्याही स्वरूपातला  दहशतवाद आणि कट्टरतावाद  याविरोधात कोणतीही तडजोड न करता लढ्याचे आवाहन केले.    

समकालीन जागतिक वास्तव प्रतिबिंबित करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा मुद्दे हाताळण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अधिक प्रातिनिधिक, प्रभावी आणि कार्यक्षम होण्यासाठी यामध्ये व्यापक सुधारणांचे   आवाहन दोन्ही पक्षांनी केले. सुधारित आणि विस्तारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी आपल्या पाठींब्याचा युक्रेनने  पुनरुच्चार केला.

आंतरराष्ट्रीय सौरआघाडीमध्ये (आयएसए) युक्रेन सहभागी होण्यासंदर्भात भारतीय पक्षाने औत्सुक्य  दर्शवले आहे.

द्विपक्षीय संबंधांच्या समग्र पैलूंवर  या नेत्यांची व्यापक चर्चा आणि प्रादेशिक आणि सामायिक हिताच्या जागतिक मुद्यांवर करण्यात आलेले विचारांचे आदान-प्रदान, भारत-युक्रेन संबंधांची सखोलता त्याचबरोबर  परस्पर जाण आणि विश्वास दर्शवते.  

या भेटीदरम्यान आपल्या आणि आपल्या प्रतिनिधी मंडळाच्या स्नेहपूर्ण आदरातिथ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की  यांचे आभार मानले आणि परस्परांच्या सोयीच्या वेळी भारत भेटीचे त्यांना निमंत्रण दिले. 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s exports hit $43.56 billion in April as shipments record double-digit growth

Media Coverage

India’s exports hit $43.56 billion in April as shipments record double-digit growth
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam highlighting the virtues of firm resolve, self-control, and wisdom
June 02, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today shared a Sanskrit Subhashitam, observing that firm resolve and self-control are the powers that make even the most difficult paths easy. Shri Modi highlighted that today, our youth are continuously engaged in nation-building with this very resolve.

The Prime Minister posted on X:

"दृढ़ निश्चय और आत्म-संयम वह शक्ति है, जो कठिन से कठिन राह को भी आसान बना देती है। आज हमारे युवा साथी इसी संकल्प के साथ राष्ट्र निर्माण में निरंतर जुटे हुए हैं।

निश्चित्य यः प्रक्रमते
नान्तर्वसति कर्मणः।

अबन्ध्यकालो वश्यात्मा
स वै पण्डित उच्यते॥"

A person who begins a task after careful deliberation and with firm resolve, who never leaves it unfinished, who uses time wisely and who maintains complete control over their senses, such a person alone is truly wise.