1. भारत आणि कोरिया प्रजासत्ताक (आरओके) हे खुल्या, समावेशक आणि समृद्ध हिंद-प्रशांत प्रदेशाच्या उभारणीसाठी सामायिक दृष्टी असलेले विशेष धोरणात्मक भागीदार देश आहेत.
  2. मुक्त बाजारपेठ आणि नियमांवर आधारित व्यापाराप्रती सामायिक बांधिलकीवर आधारित असलेली तसेच आमच्या भरभराटीचा आणि आर्थिक सुरक्षिततेचा आधार असलेली दीर्घ आणि विश्वासार्ह आर्थिक व उर्जा संसाधन सहकार्य हा आमच्या विशेष धोरणात्मक भागीदारीचा मुख्य आधारस्तंभ आहे. या सामायिक तत्वांना दुजोरा देत आणि सध्याच्या परिस्थितीचा उद्योग आणि बाजारपेठांवर पडणारा प्रभाव समजून घेणे हे सध्याच्या काळात अत्यावश्यक आहे.
  3. भारत- कोरिया   व्यापक आर्थिक भागीदारी करार (सीईपीए) आणि  इतर द्विपक्षीय चौकटींच्या  माध्यमातून आमच्या उर्जा संसाधन  व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वाढवण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.  भारत हा  कोरियाचा   नॅफ्था तसेच इतर पेट्रोलियमसंबंधी कच्च्या मालाचा प्रमुख पुरवठादार देश आहे. तर  कोरिया   हा भारताला पेट्रोलियम उत्पादने तसेच वंगण आधारित तेले यांचा पुरवठा करणारा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे.
  4. ऊर्जा पुरवठा साखळी अधिक सक्षम करण्यासाठी, प्रादेशिक सहकार्य वाढवणे, ऊर्जा संक्रमणाला गती देणे आणि ऊर्जा संसाधनांसाठी खुले व्यापार व्यवस्थांना समर्थन देणे यासाठी दोन्ही देश वचनबद्ध आहेत.  LNG वापरणाऱ्या प्रमुख देशांमध्ये अधिक समन्वय साधून बाजार स्थिरता, पारदर्शकता आणि ग्राहकांच्या हितांचे प्रतिनिधित्व मजबूत करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.  
  5. उर्जा क्षेत्रात लवचिकता आणण्याप्रती आमची सामायिक कटिबद्धता आम्ही मान्य केली आहे. जहाजबांधणीसह लवचिक सागरी पायाभूत सुविधा दोन्ही देशांच्या उर्जा सुरक्षेची सुनिश्चिती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत हे आम्ही मान्य करतो. उर्जेच्या सुरक्षित, विश्वासार्ह तसेच कार्यक्षम वाहतुकीला पाठबळ पुरवण्यात सशक्त आणि वैविध्यपूर्ण जहाजबांधणी परिसंस्थेचे महत्त्व आम्ही स्वीकारत आहोत.
  6. या पार्श्वभूमीवर, भारत आणि कोरिया पुढील उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील:
  • आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांचा मुक्त व्यापार तसेच संपूर्ण उर्जा मूल्य साखळीमध्ये सहकार्य सुरु ठेवण्यासाठी दोन्ही देशांतर्फे सुरु असलेल्या प्रयत्नांसह एक स्थिर, सुरक्षित आणि विश्वासार्ह उर्जा पुरवठा कायम राखणे.- नॅफ्था
  • एलएनजी वापरकर्त्या देशांमध्ये अधिक दृढ सहकार्याबाबत प्रयत्न करणे.
  • भारतात जहाजबांधणी कारखाने उभारणे, या कारखान्यांचे आधुनिकीकरण करणे, मनुष्यबळ विकास आणि तंत्रज्ञानविषयक भागीदारी यांच्यासह, मात्र यांच्या पुरतेच मर्यादित न ठेवता जहाजबांधणी क्षेत्रातील सहकार्य बळकट करणे
  1. भारत आणि कोरिया यांनी प्रादेशिक भागीदारांना आवाहन केले आहे की जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी खुली आणि सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्रितपणे काम करावे, ज्यामुळे सर्वांच्या सुरक्षितता आणि समृद्धीला चालना मिळेल.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Jumbo Indian contingent comprising 768 athletes, support staff and officials for Asian Games

Media Coverage

Jumbo Indian contingent comprising 768 athletes, support staff and officials for Asian Games
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 4 सप्टेंबर 2026
September 04, 2026

Make in India, Power India, Play for India: Multi-Sector Momentum Under PM Modi’s Leadership