जनरल बिपिन रावत यांच्या मृत्युबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. "तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामुळे मला अतिशय दुःख झाले आहे, या अपघातात आपण जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलाच्या इतर अधिकाऱ्यांना गमावले आहे. त्यांनी संपूर्ण समर्पित वृत्तीने देशाची सेवा केली. या सर्वांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे, " असे त्यांनी शोक संदेशात म्हटले आहे..

जनरल बिपिन रावत एक असामान्य सैनिक होते. " या सच्च्या देशभक्ताने आपल्या सशस्त्र दलांचे आणि संरक्षण सामग्रीचे आधुनिकीकरण करण्यात खूप मोठे योगदान दिले. संरक्षणविषयक घडामोडींविषयी त्यांच्याकडे असाधारण दूरदृष्टी आणि दृष्टीकोन होते. त्यांच्या निधनामुळे मला तीव्र दुःख झाले आहे. ओम शांती, " असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटले की, "भारताचे पहिले सीडीएस म्हणून जनरल रावत यांनी आपल्या सशस्त्र दलांशी संबंधित संरक्षण सुधारणांसह विविध पैलूंवर काम केले. त्यांच्या असामान्य सेवेला देश कधीही विसरणार नाही."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'Strategic partnership' to 'Cooperation in AI': Six major outcomes of PM Modi's historic Sweden visit - Check

Media Coverage

'Strategic partnership' to 'Cooperation in AI': Six major outcomes of PM Modi's historic Sweden visit - Check
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 18 मे 2026
May 18, 2026

Norway to Netherlands: PM Modi's Leadership Turns Heritage, Honors & High-Tech Deals into India's Global Momen