पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे (एफएओ) रोम येथील मुख्यालयात 2026 साठी प्रतिष्ठेच्या 'ॲग्रिकोला’ पदकाने सन्मानित करण्यात आले. भारतात आणि जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा, शाश्वत कृषी आणि ग्रामीण विकास, यासारख्या क्षेत्रांमधील त्यांच्या असाधारण नेतृत्वाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एफएओचे महासंचालक डॉ. क्यू डोंग्यू यांच्या हस्ते पंतप्रधानांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांनी हा सन्मान भारतातील शेतकरी आणि भारतीय कृषी वैज्ञानिक समुदायाला समर्पित केला, जे भारतातील आणि जगभरातील लोकांसाठी अन्न सुरक्षा आणि पोषण सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम घेतात. हा सन्मान म्हणजे मानव कल्याण, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकासाप्रति असलेल्या भारताच्या वचनबद्धतेचा गौरव असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारतातील कृषी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी यावर जोर दिला की, शेती हे धरणीमाता आणि भारतीय जनता यांच्यातील एक पवित्र बंध आहे.

भारताचा वैज्ञानिक आणि नवोन्मेष-आधारित शेतीचा दृष्टीकोन शाश्वत, हवामान-अनुकूल आणि भविष्यासाठी सज्ज परिसंस्थेला चालना देत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या प्रयत्नात, 'पर ड्रॉप मोअर क्रॉप’, सारख्या पद्धती आणि सूक्ष्म सिंचन, आणि अचूक शेतीसाठीचा मिशन-आधारित दृष्टीकोन, भारताच्या कृषी धोरणांना दिशा देत आहे, असे ते म्हणाले. तंत्रज्ञानावर आधारित शेतीविषयक उपाययोजनांबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, एआय-आधारित सल्लागार प्रणाली, ड्रोन, रिमोट-सेन्सिंग तंत्रज्ञान आणि सेन्सर-आधारित यंत्रसामग्री भारतीय शेतकऱ्यांना चांगले पीक मिळवण्यासाठी आणि शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी सहाय्य करत आहेत. ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत भारताने हवामान बदलाशी जुळवून घेणारे सुमारे 3,000 पिकांचे वाण विकसित केले आहेत. भारताची विज्ञानाभिमुख शेती, विशेषत: ग्लोबल साउथमधील देशांसाठी जागतिक अन्न सुरक्षेला बळकटी देत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधान म्हणाले की, एफएओचा संस्थापक सदस्य म्हणून, जागतिक अन्न सुरक्षा, शाश्वत शेती आणि उपासमार मुक्त जगाला चालना देण्यासाठी या संस्थेबरोबर काम करण्याचा बहुमान भारताला मिळाला. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करून आरोग्यदायी अन्नाच्या निवडीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताबरोबर काम केल्याबद्दल त्यांनी अन्न आणि कृषी संघटनेचे आभार मानले.

पंतप्रधान म्हणाले की, एफएओचा संस्थापक सदस्य म्हणून, जागतिक अन्न सुरक्षा, शाश्वत शेती आणि उपासमार मुक्त जगाला चालना देण्यासाठी या संस्थेबरोबर काम करण्याचा बहुमान भारताला मिळाला. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करून आरोग्यदायी अन्नाच्या निवडीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताबरोबर काम केल्याबद्दल त्यांनी अन्न आणि कृषी संघटनेचे आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एफएओ मुख्यालयाला दिलेली भेट ही गेल्या 30 वर्षांत भारताच्या राष्ट्रप्रमुखांनी दिलेली पहिलीच भेट होती.
हमारे शानदार स्वागत और ‘एग्री-कोला मेडल’ से सम्मानित करने के लिए... मैं FAO के Director General का ह्रदय से आभार व्यक्त करता हूं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 20, 2026
यह भारत के करोड़ों किसानों, पशुपालकों, मत्स्य पालकों, कृषि वैज्ञानिकों और श्रमिकों का सम्मान है।
— PMO India (@PMOIndia) May 20, 2026
यह भारत की उस अटूट प्रतिबद्धता का भी सम्मान है, जिसके केंद्र में मानव कल्याण, खाद्य सुरक्षा और Sustainable Development है: PM @narendramodi
हम सिर्फ Production बढ़ाने के लिए ही नहीं, एक ऐसा Farming Ecosystem बनाने के लिए भी काम कर रहे हैं, जो Sustainable भी हो, Climate-Resilient भी हो…और Future-Ready भी हो।
— PMO India (@PMOIndia) May 20, 2026
और इसीलिए पूरे भारत में Scientific Agriculture को Mission Mode में आगे बढ़ाया जा रहा है: PM @narendramodi
Technology आज Indian Agriculture की नई ताकत बन रही है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 20, 2026
हम मानते हैं कि Future Of Farming केवल “Produce More” में नहीं…बल्कि “Produce Better” में है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 20, 2026
भारत Food-Surplus Nation होने के साथ-साथ वैश्विक Food Security में भी महत्वपूर्ण योगदान दे रहा है।
— PMO India (@PMOIndia) May 20, 2026
मिल्क और स्पाइस प्रोडक्शन में भारत सबसे आगे है।
चावल, गेहूं, Fruits, Vegetables और Cotton के उत्पादन में भी भारत अग्रणी देशों में शामिल है: PM @narendramodi
हमारे लिए Food Security केवल Policy Matter नहीं है, यह मानवता के प्रति हमारी जिम्मेदारी है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 20, 2026


