जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक रोबर्तो एझवेदो सध्या भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्याशी आज विविध विषयांवर चर्चा केली.
बहुस्तरीय व्यापारी यंत्रणा पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी भारत सरकारने हाती घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत एझवेदो यांनी भारत सरकारचे आभार मानले. ही व्यवस्था पुन्हा सुरु करण्याबद्दल दोघांमध्ये चर्चा झाली.

भारत बहुस्तरीय व्यापार व्यवस्थेचा खंदा पुरस्कर्ता आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. जागतिक व्यापार संघटनेचा प्राधान्यक्रम निश्चित करायला हवा, म्हणजेच विकसनशील देशांच्या चिंता जागतिक व्यापार संघटनेच्या लक्षात येतील, असा प्रस्ताव पंतप्रधानांनी मांडला. विकसनशील देशांना मुक्त व्यापार आणि जागतिकीकरणाचे लाभ मिळावेत यासाठी जागतिक व्यापार संघटनेने जोरकस प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्र्यांच्या आगामी बैठकीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
Had a wonderful meeting with Mr. Roberto Azevêdo, Director-General of the @wto. @WTODGAZEVEDO pic.twitter.com/nhX2UaTkeO
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2018


