पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने आज 117.7 किलोमीटर लांबीच्या कानपूर- कबरई प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड महामार्गाच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. हा मार्ग चार पदरी असेल, यावरील पूल आणि इतर बांधकामे भविष्यातील सहा पदरीकरणाचा विचार करून डिझाइन केली जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग कार्यक्रमांतर्गत भोपाळ-कानपूर आर्थिक कॉरिडॉरचा हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.

सुमारे 7145.14 कोटी रुपयांच्या अंदाजित एकूण भांडवली खर्चाच्या या प्रकल्पाची अंमलबजावणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाद्वारे 'बीओटी ' म्हणजेच बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर केली जाईल. यासोबतच, राष्ट्रीय महामार्ग-34 च्या सध्याच्या कानपूर- कबरई या टप्प्याचे संचालन आणि देखभालीची जबाबदारीदेखील याच पद्धतीने पार पाडली जाईल.

या प्रकल्पामुळे कानपूर आणि कबरई दरम्यान दळणवळणाला वेग येईल,  तसेच सागर, भोपाळ आणि मध्य प्रदेशच्या इतर भागांशी संपर्क सुरळीत होईल. यामुळे उत्तर प्रदेशातील औद्योगिक व व्यावसायिक केंद्रांना मध्य प्रदेशातील खनिजांनी समृद्ध, उत्पादन आणि कृषी क्षेत्रांशी जोडणारा एक आधुनिक, प्रवेश-नियंत्रित आर्थिक कॉरिडॉर निर्माण होईल, ज्यामुळे या भागातील प्रगतीला अधिक गती मिळेल.

ताशी 80 ते 100 किमी वेगाने धावण्यासाठी डिझाइन करण्यात आलेला हा मार्ग कानपूर आणि कबराई दरम्यानचा प्रवासाचा वेळ 3.5 तासांवरून 1.5 तासांवर आणेल (58% घट). यामुळे केवळ रस्ते सुरक्षा सुधारणार नसून, वाहनांचा देखभाल व इंधन खर्च कमी होईल आणि प्रवासी व मालवाहतूक अधिक वेगवान व सुलभ होईल.

हा प्रकल्प NH-34, NH-35, बुंदेलखंड एक्सप्रेसवे, कानपूर रिंग रोड तसेच SH-46, SH-91, SH-10B आणि SH-42 या राज्य महामार्गांशी देखील जोडला जाईल. ज्यामुळे प्रादेशिक महामार्गाचे जाळे अधिक विस्तारले जाईल. याशिवाय, हा कॉरिडॉर कबराईच्या खाण पट्ट्याशी देखील जोडला जाणार असल्याने, खनिजे, औद्योगिक वस्तू, बांधकाम साहित्य आणि शेतीमालाची वाहतूक अधिक वेगाने होईल. लॉजिस्टिक्सची कार्यक्षमता वाढवण्यात, पुरवठा साखळी मजबूत करण्यात आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला गती देण्यामध्ये याचा फायदा होईल.

बांधकामादरम्यान या प्रकल्पातून प्रति लेन प्रति किलोमीटर सुमारे 11,188 थेट आणि 13,985 अप्रत्यक्ष मनुष्य-दिवस रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे. तसेच, आर्थिक वर्ष 2028 पर्यंत या मार्गावरून दररोज सरासरी सुमारे 18,069 प्रवासी वाहतूक होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, यामुळे या प्रकल्पाचे दळणवळणाच्या दृष्टीने दीर्घकालीन आर्थिक महत्त्व अधोरेखित होते. एकूणच, हा प्रस्तावित प्रकल्प थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराचे मिळून तब्बल 1.2 कोटींहून अधिक मनुष्य-दिवस निर्माण करेल.

Map of Corridor:

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi’s FTA push: Why India’s MSMEs now have a bigger export opportunity

Media Coverage

PM Modi’s FTA push: Why India’s MSMEs now have a bigger export opportunity
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 ऑगस्ट 2026
August 17, 2026

India Ascendant: Citizens Hail PM Modi's Vision and India’s Multi-Sectoral Growth