पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय अत्यावश्यक खनिजे अभियानाला (National Critical Mineral Mission - NCMM) मान्यता दिली गेली. या अभियासाठी 16,300 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे, तसेच या अभियाना अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसारख्या उपक्रमांद्वारा 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

आत्मनिर्भर भारत उपक्रमाचा एक भाग म्हणून तसेच उच्च तंत्राधारीत उद्योग, स्वच्छ ऊर्जा आणि संरक्षण या आणि अशा क्षेत्रांमधली अत्यावश्यक खनिजांची अपरिहार्य भूमिका लक्षात घेऊनच, भारत सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये अत्यावश्यक खनिज क्षेत्राशी संबंधित  आव्हानांचा सामना करण्यासाठी अनेक उपक्रमही हाती घेतले आहेत.

अत्यावश्यक खनिज क्षेत्राच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर व्हावा याकरता एक प्रभावी आराखडा आखण्याची गरज आहे. याच अनुषंगाने 2024 - 25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाअंतर्गत अत्यावश्यक खनिजे अभियान स्थापन केले जाईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 23 जुलै 2024 रोजी केली होती.

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिलेल्या राष्ट्रीय अत्यावश्यक खनिज अभियानाअंतर्गत खनिज उत्खनन, खाणकाम, लाभ, प्रक्रिया आणि खाण उत्पादन प्रक्रियेच्या अखेरच्या टप्प्यातील उरलेल्या अवशेषांपासून पुनर्प्राप्ती यांसह मूल्य साखळीच्या सर्व टप्प्यांचा समावेश असणार आहे. या अभियानामुळे देशांतर्गत आणि समुद्रकिनारपट्टी प्रदेशातील अत्यावश्यक खनिजांच्या शोधकामालाही गती मिळणार आहे. याचप्रमाणे अत्यावश्यक खनिज खाण प्रकल्पांसाठी जलदगती नियामक मंजुरी प्रक्रिया तयार करणे हे देखील या अभियानाचे उद्दिष्ट असेल. याव्यतिरिक्त, या अभियानाअंतर्गत अत्यावश्यक खनिजांच्या उत्खननासाठी आर्थिक प्रोत्साहन दिले जाईल, तसेच या अभियानामुळे या खनिजांच्या उत्खननातील थरावरील गाळ (overburden) आणि खाणकामानंतर उरलेल्या अवशेषांपासून (tailings) पुनर्प्राप्तीलाही चालना मिळेल.

भारतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना परदेशातील अत्यावश्यक खनिज संपत्तींचा ताबा मिळवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि संसाधनसमृद्ध देशांबरोबरचा व्यापार वाढवणे ही या अभियानाची  उद्दीष्टे आहेत. अत्यावश्यक खनिजांचा देशांतर्गत साठा तयार केला जावा असेही या अभियानात प्रस्तावित केले गेले आहे.

या अभियानाअंतर्गत खनिज प्रक्रिया संकुले उभारणे आणि अत्यावश्यक खनिजांच्या पुनर्वापराला पाठबळ देण्याशी संबंधित तरतुदींचाही समावेश केला गेला आहे. याबरोबरीनेच या अभियानाअंतर्गत अत्यावश्यक खनिज तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधनालाही चालना दिली जाणार असून, अत्यावश्यक खनिजे उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्याची बाबही या अभियानाअंतर्गत प्रस्तावित आहे.

‘संपूर्ण सरकार’ दृष्टिकोन स्वीकारत, हे मिशन आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संबंधित मंत्रालये, सार्वजनिक उपक्रम, खासगी कंपन्या आणि संशोधन संस्थांबरोबर काम करेल.

अत्यावश्यक खनिजांचा शोध आणि उत्खननाला चालना देण्यासाठी, खाण व खनिजे (विकास व नियमन) कायदा 1957 मध्ये 2023 साली सुधारणा करण्यात आली होती. त्याला अनुसरून, खाण मंत्रालयाने धोरणात्मक खनिजांच्या 24 खंडांचा लिलाव केला आहे.

त्याशिवाय, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (जीएसआय) गेल्या तीन वर्षांत अत्यावश्यक  खनिजांसाठी 368 उत्खनन प्रकल्प हाती घेतले असून, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 195 प्रकल्पांवर काम सुरू आहेत. तसेच, आर्थिक वर्ष 2025-26 साठी जीएसआय विविध महत्त्वाच्या खनिजांसाठी 227 प्रकल्प हाती घेणार आहे.  नवोन्मेशाला चालना देण्यासाठी, मंत्रालयाने 2023 मध्ये  विज्ञान आणि तंत्रज्ञान- स्टार्ट-अप्स आणि एमएसएमईमध्ये संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन (एस अँड टी प्रिझम), हा कार्यक्रम सुरू केला, ज्याद्वारे संशोधन आणि विकास आणि व्यावसायिकीकरण यांच्यातील अंतर भरून काढण्यासाठी स्टार्ट-अप आणि एमएसएमईंना निधी उपलब्ध केला जाईल. याशिवाय, ‘काबिल’ या खाण मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रमा अंतर्गत लिथियमचे उत्खनन आणि खाणकामासाठी अर्जेंटिनाच्या कॅटमार्का प्रांतातील सुमारे 15703 हेक्टर क्षेत्र संपादन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात बहुतांश महत्त्वाच्या खनिजांवरील सीमा शुल्क रद्द केले आहे. यामुळे देशात महत्त्वाच्या खनिजांची उपलब्धता वाढेल आणि उद्योगांना भारतात प्रक्रिया सुविधा उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. हे उपक्रम महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठीची भारताची वचनबद्धता अधोरेखित करतात.  

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
From Free Ration To ₹12.75 Lakh Tax-Free Income: PM Modi Lists Govt's Achievements Over 12 Years

Media Coverage

From Free Ration To ₹12.75 Lakh Tax-Free Income: PM Modi Lists Govt's Achievements Over 12 Years
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारताचे सर्वात जास्त काळ पदभार सांभाळणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले
June 09, 2026

भारताच्या पंतप्रधानपदी निवडून येऊन सर्वाधिक काळ पदभार सांभाळत असण्याच्या पूर्वसंध्येला जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.संपूर्ण जगभरातील प्रमुख नेत्यांनी पंतप्रधानांच्या परिवर्तनकारी प्रशासनाला, ग्लोबल साउथ देशांचा पुरस्कार करण्याला आणि समावेशक तसेच आर्थिकदृष्ट्या चैतन्यमय भारताच्या उभारणीच्या संकल्पनेची प्रशंसा केली आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके  यांनी 08 जून 2026 रोजी पंतप्रधानांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांचे सरकार तसेच श्रीलंकेच्या जनतेकडून मोदी यांचे सस्नेह अभिनंदन केले आहे. त्या पत्रात म्हटले आहे: “हा महत्त्वाचा टप्पा म्हणजे केवळ  तुमच्या कार्यकाळाचा अवधी नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमधील जनतेने पुनःपुन्हा तुमच्यावर दाखवलेला विश्वास आणि भरवसा याचे देखील द्योतक आहे.” भारतात घडलेले उल्लेखनीय आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन देखील राष्ट्राध्यक्षांनी अधोरेखित केले तसेच पंतप्रधान मोदी यांच्या विचारांनी श्रीलंकेसह भारताच्या सीमेवरील अनेक देशांना प्रेरणा दिली आहे असे देखील नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी 4 ते 6 एप्रिल 2025 या कालावधीत श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यांची ही चौथी श्रीलंका भेट होती आणि या भेटीदरम्यान मोदी यांना परदेशी मान्यवरांना दिला जाणारा ‘मित्र विभूषण’ हा श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीमुळे भारताच्या ‘शेजारी राष्ट्र सर्वप्रथम’ धोरणाची पुष्टी झाली आणि वर्ष 2022 मध्ये श्रीलंका आर्थिक अडचणीत असताना भारताने दिलेल्या महत्त्वपूर्ण सहयोगासह भारताच्या भक्कम भागीदारीच्या सर्वात जवळच्या लाभार्थ्यांपैकी श्रीलंका हा एक देश आहे याची देखील ग्वाही मिळाली.

पापुआ न्यू गिनीचे राष्ट्राध्यक्ष जेम्स मारापे यांनी एका वैयक्तिक व्हिडिओ संदेशात पंतप्रधान मोदींचे वर्णन "एक आदर्श नेतृत्वाचे उत्तम उदाहरण" असे केले. "20 कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढून त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देणे ही अद्भुत कामगिरी आहे." त्यांनी असेही नमूद केले. मारापे यांनी पापुआ न्यू गिनीची भारताशी असलेली स्नेहपूर्ण मैत्री आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली. भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेसाठी मे 2023 मध्ये पंतप्रधान मोदींनी पापुआ न्यू गिनीला दिलेली भेट ऐतिहासिक होती. भारतीय पंतप्रधानांनी प्रथमच त्या देशाला भेट होती आणि पॅसिफिक द्वीपसमूह राष्ट्रांशी भारताच्या संबंधांमधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला, हे त्यांनी अधोरेखित केले. या भेटीमुळे ग्लोबल साउथ देशांच्या  समूहाचा कटिबद्ध भागीदार म्हणून भारताची भूमिका सुस्पष्ट झाली.

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान  कमला प्रसाद-बिसेसर यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, की "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर बुलंद आवाज म्हणून उदयास आला आहे." अत्यंत सामान्य पार्श्वभूमीपासून ते 1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या राष्ट्राचे सलग तीन कार्यकाळांसाठी नेतृत्व करण्यापर्यंतच्या पंतप्रधान मोदी यांच्या प्रवासावर त्यांनी प्रकाश टाकला; तसेच परराष्ट्र धोरण, आर्थिक विकास, पायाभूत सुविधा आणि सामाजिक-आर्थिक विकास या क्षेत्रांमधील भारताच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी 3-4 जुलै 2025 रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगोला भेट दिली. ही तब्बल 26 वर्षांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांनी दिलेली द्विपक्षीय भेट होती. ती त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये भारतीय स्थलांतरित लोकांच्या आगमनाचा 180 वा वर्धापन दिन साजरा होत असताना झाली हे त्यांनी आवर्जून नमूद केले.