पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज अटल पेन्शन योजना (एपीवाय) आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत चालू ठेवण्यास तसेच प्रोत्साहनात्मक आणि विकासात्मक उपक्रमांसाठी निधी सहाय्य आणि व्यवहार्यता तफावत निधी सुरु ठेवण्यास मंजुरी दिली.

 अंमलबजावणी धोरण :

 ही योजना सरकारच्या सहकार्याने 2030-31 पर्यंत सुरू राहील -

  1.  असंघटित कामगारांमध्ये जागरूकता, क्षमता बांधणीसह पोहोच वाढवण्यासाठी प्रोत्साहनात्मक  आणि विकासात्मक उपक्रम.

  2. व्यवहार्यता आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि योजनेची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी तफावत निधी

 प्रमुख परिणाम :

  • अल्प उत्पन्न असलेल्या आणि असंघटित क्षेत्रातील लाखो कामगारांसाठी वृद्धापकाळात उत्पन्न सुरक्षा सुनिश्चित करते.

  • आर्थिक समावेशकता  वाढवते आणि भारताला पेन्शन-आधारित समाजात परिवर्तित होण्यासाठी सहाय्य पुरवते .

  • शाश्वत सामाजिक सुरक्षा प्रदान करून विकसित भारत @2047 च्या स्वप्नाला बळ देते 

पार्श्वभूमी : 

  • प्रारंभ : असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात उत्पन्न सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने 9 मे 2015 रोजी अटल पेन्शन योजना (एपीवाय ) सुरू करण्यात आली.

  • योजनेची वैशिष्ट्ये: एपीवाय वयाच्या  60 व्या वर्षापासून योगदानाच्या आधारे दरमहा 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत  किमान पेन्शनची हमी  देते.

  • प्रगती: 19 जानेवारी 2026 पर्यंत,8.66 कोटींहून अधिक सदस्यांची नोंदणी झाली असून  एपीवाय भारताच्या समावेशक सामाजिक सुरक्षा चौकटीचा एक आधारस्तंभ बनला आहे.

  • विस्ताराची आवश्यकता: योजनेची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी  जागरूकता, क्षमता निर्मिती आणि व्यवहार्यता तफावत भरून काढण्यासाठी सातत्यपूर्ण सरकारी पाठिंबा आवश्यक आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s electric PV retail sales jump 44% in February; Tata Motors leads: FADA

Media Coverage

India’s electric PV retail sales jump 44% in February; Tata Motors leads: FADA
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 मार्च 2026
March 07, 2026

Reform, Perform and Transform: PM Modi’s Mantra for India’s Growth