एकूण 108.134 किमी लांबीच्या या मार्गासाठी एकूण भांडवली खर्च 3653.10 कोटी रूपये आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आंध्र प्रदेश राज्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -67 वर 3653.10 कोटी रुपये खर्चाच्या 108.134 किमी लांबीच्या चौपदरी बडवेल-नेल्लोर कॉरिडॉरच्या बांधकामाचा डिझाइन- बांधा-अर्थसहाय्य करा-वापरा- हस्तांतरित करा या (DBFOT) पद्धतीने विकास करायला मान्यता दिली आहे.

मंजूर झालेला बडवेल-नेल्लोर कॉरिडॉर आंध्र प्रदेशातील तीन औद्योगिक कॉरिडॉरमधील महत्त्वाच्या, म्हणजेच विशाखापट्टणम-चेन्नई औद्योगिक कॉरिडॉर (VCIC) वरील कोपर्थी नोड, हैदराबाद-बेंगळुरू औद्योगिक कॉरिडॉर (HBIC) वरील ओरवाकल नोड आणि चेन्नई-बेंगळुरू औद्योगिक कॉरिडॉर (CBIC) वरील कृष्णपट्टणम नोड्सना जोडेल. याचा देशाच्यालॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्सवर (LPI) सकारात्मक परिणाम होईल.

विद्यमान राष्ट्रीय महामार्ग एनएच-67बडवेल नेल्लोर कॉरिडॉर वायएसआर कडप्पा जिल्ह्यातील  गोपावरम गावापासून सुरू होतो आणि आंध्र प्रदेशातील एसपीएसआर नेल्लोर जिल्ह्यातील एनएच-16 (चेन्नई-कोलकाता) येथील कृष्णपट्टणम पोर्ट जंक्शनवर संपतो तसेच चेन्नई-बेंगळुरू औद्योगिक कॉरिडॉर (सीबीआयसी) अंतर्गत प्राधान्य नोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णपट्टणम बंदराला हा मार्ग जोडला जाईल .

प्रस्तावित कॉरिडॉरमुळे कृष्णपट्टनम बंदरापर्यंतचे प्रवास अंतर सध्याच्या बडवेल-नेल्लोर रस्त्याच्या तुलनेत 142  किमीवरून 108.13 किमीपर्यंत म्हणजे 33.9 किमीने कमी होईल. यामुळे प्रवासाचा वेळ एक तासाने कमी होईल आणि इंधनाचा वापर कमी होण्याच्या बाबतीत लक्षणीय फायदा होईल ज्यामुळे पर्यावरणीय सुरक्षितता वाढून (कार्बन फूट प्रिंट)  वाहन चालविण्याचा खर्च (VOC) कमी होईल. प्रकल्प संरेखन आणि निर्देशांक नकाशाचे तपशील परिशिष्ट-I मध्ये जोडलेले आहेत.

108.13 किमी लांबीच्या या प्रकल्पामुळे सुमारे 20 लाख प्रत्यक्ष मानवदिवस रोजगार आणि 23 लाख अप्रत्यक्ष मानवदिवस रोजगार निर्माण होतील. प्रस्तावित कॉरिडॉरच्या जवळ आर्थिक  उपक्रमात वाढ झाल्यामुळे या प्रकल्पामुळे अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

परिशिष्ट

The details of Project Alignment and Index Map:

Figure 1: Index Map of Proposed Corridor

Figure 2: Detailed Project Alignment

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How PLI schemes, design in India and manufacturing excellence are transforming the architectural lighting industry

Media Coverage

How PLI schemes, design in India and manufacturing excellence are transforming the architectural lighting industry
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 जुलै 2026
July 28, 2026

From Factories to Space & High-Speed Rail: How PM Modi’s Vision is Rewiring India’s Future