पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार राज्य स्थापना दिनानिमित्त बिहारच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, बिहार आपल्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय जीवनाच्या सर्व क्षेत्रात योगदान देणाऱ्या बिहारच्या लोकांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने एक विशेष ओळख निर्माण केली आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"बिहार राज्य दिनानिमित्त राज्याच्या सर्व बंधु-भगिनींना खूप-खूप शुभेच्छा. आपला समृद्ध इतिहास आणि संस्कृतीसाठी बिहारचे लोक देशाच्या विकासात अतुलनीय योगदान देत आहेत. आपल्या मेहनत आणि कठोर परिश्रमांनी त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे".
बिहार दिवस पर राज्य के अपने सभी भाई-बहनों को बहुत-बहुत बधाई! अपने समृद्ध इतिहास और जीवंत संस्कृति के लिए प्रसिद्ध बिहार के लोग देश के विकास के लिए हर क्षेत्र में अतुलनीय योगदान दे रहे हैं। अपनी लगन और कठिन परिश्रम से उन्होंने एक विशेष पहचान बनाई है।
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2023


