पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल गुजरातचे अभिनंदन केले.

सूर्यनमस्काराचे नानाविध फायदे असल्यामुळे प्रत्येकाने सूर्यनमस्काराला आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवावा असे आवाहनही त्यांनी केले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"गुजरातने 2024 चे स्वागत एका उल्लेखनीय उपक्रमाने केले, तो म्हणजे - सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा  गिनीज जागतिक विक्रम प्रस्थापित करणे! आपल्या सर्वांना माहीत आहेच की, 108 क्रमांकाचे आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. या स्थळांमध्ये मोढेरा सूर्य मंदीराचाही समावेश आहे. येथील कार्यक्रमात अनेक लोक सामील झाले होते. योग आणि आपल्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आमच्या वचनबद्धतेचा हा खरा पुरावा आहे.

मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की मौलिक फायदे असलेल्या सूर्यनमस्काराला तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s pharmaceutical sector records transformative growth over 12 years, strengthening affordable healthcare and self-reliance

Media Coverage

India’s pharmaceutical sector records transformative growth over 12 years, strengthening affordable healthcare and self-reliance
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 जून 2026
June 19, 2026

Appreciation for India’s Domestic Growth and Rising Global Influence under PM Modi’s Leadership