पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ  समितीने तामिळनाडूमध्ये 4 - पदरी  मरक्कनम-पुदुचेरी (46 किमी) महामार्गाच्या बांधकामाला मंजुरी  दिली आहे. हा प्रकल्प हायब्रिड अॅन्युइटी मोड अंतर्गत  विकसित केला जाईल ज्याचा एकूण भांडवली खर्च 2,157  कोटी रुपये आहे.

सध्या, चेन्नई, पुदुचेरी, विलुप्पुरम आणि नागपट्टिनम यांच्यातील कनेक्टिव्हिटी विद्यमान  2 पदरी  राष्ट्रीय महामार्ग 332A (NH-332A)आणि संबंधित राज्य महामार्गांवर अवलंबून आहे, ज्यावर  जास्त वाहतुकीमुळे  , विशेषतः दाट लोकवस्ती असलेल्या भागात आणि कॉरिडॉरच्या बाजूने असलेल्या प्रमुख शहरांमध्ये वाहतूक कोंडी होते. या आव्हानांना तोंड देण्यासाठी, प्रकल्पात मरक्कनम ते पुद्दुचेरी पर्यंतच्या NH-332A च्या अंदाजे 46 किमी लांबीच्या रस्त्याचे 4-पदरी मार्गात रूपांतर केले जाईल. यामुळे विद्यमान कॉरिडॉरवरील कोंडी  कमी होईल, सुरक्षितता सुधारेल आणि चेन्नई, पुद्दुचेरी , विलुप्पुरम आणि नागपट्टिनम सारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरांच्या गतिशीलता संबंधी  गरजा पूर्ण होतील.

हा प्रकल्प  2  प्रमुख राष्ट्रीय महामार्ग (NH-32, NH-332) आणि दोन राज्य महामार्ग (SH-136, SH-203) यांना जोडतो, ज्यामुळे तामिळनाडूमधील प्रमुख आर्थिक, सामाजिक आणि लॉजिस्टिक्स नोड्सना वेगवान  कनेक्टिव्हिटी मिळेल.  याव्यतिरिक्त, उन्नत कॉरिडॉर दोन रेल्वे स्थानके (पुदुच्चेरी, चिन्नाबाबुसमुद्रम), दोन विमानतळ (चेन्नई, पुदुच्चेरी) आणि एक छोटे बंदर (कुड्डालोर) यांच्याशी जोडून मल्‍टी-मोडल एकात्मता वाढवेल ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात माल आणि प्रवासी वाहतूक जलद गतीने सुलभ होईल.

काम पूर्ण झाल्यानंतर, मरक्कनम - पुदुच्चेरी मार्ग  प्रादेशिक आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, प्रमुख धार्मिक आणि आर्थिक केंद्रांमधील कनेक्टिव्हिटी मजबूत करेल , पुदुच्चेरीमध्ये पर्यटनाला चालना देईल  आणि व्यापार आणि औद्योगिक विकासासाठी नवीन मार्ग खुले करेल. या प्रकल्पामुळे सुमारे 8 लाख मनुष्य -दिवस प्रत्यक्ष आणि 10 लाख मनुष्य -दिवस अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये  विकास , प्रगती आणि समृद्धीचे नवीन मार्ग खुले होतील.

कॉरिडॉरचा नकाशा

Appendix - I: Project Details

Feature

Details

Project Name

4-Lane Marakkanam – Puducherry Section (NH 332A)

Corridor

Chennai–Puducherry–Nagapattinam-Tuticorin-Kanyakumari Economic Corridor (East Coast Road - ECR)

Length (km)

46.047

Total Civil Cost (Rs Cr.)

1,118

Land Acquisition Cost (Rs Cr.)

442

Total Capital Cost (Rs Cr.)

2,157

Mode

Hybrid Annuity Mode (HAM)

Bypasses

Puducherry Bypass (Greenfield Access Controlled) – 34.7 km

Major Roads Connected

National Highways – NH-32, NH-332

State Highways – SH-136, SH-203

Economic / Social / Transport Nodes Connected

Airports: Chennai, Puducherry

Railway Stations: Puducherry, Chinnababusamudram

Minor Port: Cuddalore

Economic Nodes: Mega Food Park, Pharma Cluster, Fishing Cluster

Social Nodes: Arulmigu Manakula Temple, Paradise Beach

Major Cities / Towns Connected

Chennai, Marakkanam, Puducherry

Employment Generation Potential

8 lakh Man-Days (direct) & 10 lakh Man-Days (indirect)

Annual Average Daily Traffic (AADT) in FY-25

Estimated at 17,800 Passenger Car Units (PCU)

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Government eases defence export SOP to help local manufacturers tap global market

Media Coverage

Government eases defence export SOP to help local manufacturers tap global market
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister extends greetings on National Sports Day
August 29, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi has extended his greetings to all sports lovers on National Sports Day. Shri Modi said that the dedication, passion and determination of sportspersons make the entire nation proud.

The Prime Minister also paid homage to the legendary Major Dhyan Chand Ji, whose brilliance and contribution to Indian hockey continue to inspire generations.

Shri Modi posted on X:

“To every sports lover…your dedication, passion and determination make everyone proud.

We also pay homage to the legendary Major Dhyan Chand Ji, whose brilliance inspires generations.

#NationalSportsDay”