देशाच्या युवाशक्तीचे सामर्थ्य अधोरेखित करणाऱ्या एका संदेशात पंतप्रधानांनी आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
भारताच्या युवाशक्तीचा दृढ संकल्प अतुलनीय असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. आपले युवा साथी जो काही निर्धार करतात तो पूर्ण करून दाखवतात, त्यामुळेच आज आपला देश आपली स्वप्ने साकार करत आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर सामायिक केले आहे :
''भारताच्या युवाशक्तीचा दृढ संकल्प अतुलनीय आहे. आपले युवा साथी जो काही निर्धार करतात तो पूर्ण करून दाखवतात., त्यामुळेच आज आपला देश आपली स्वप्ने साकार करत आहे.
न वा उ मां वृजने वारयन्ते न पर्वतासो यदहं मनस्ये।
मम स्वनात् कृधुकर्णो भयात एवेदनु द्यून्किरणः समेजात्।।"
तुमच्या आत्मविश्वासाची शक्ती प्रचंड आहे. कोणीही तुमचा आत्मनिर्धार चिरडून टाकू शकत नाही. मोठ्या पर्वतांएवढे मोठे अडथळेदेखील तुमचा मार्ग रोखू शकत नाहीत. जर तुमच्याकडे इच्छाशक्तीची ताकद असेल तर तुम्ही सूर्यापेक्षाही शक्तिशाली आहात.
भारतवर्ष की युवाशक्ति का दृढ़ संकल्प अतुलनीय है। हमारे युवा साथी जो ठान लेते हैं, वो करके दिखाते हैं। यही वजह है कि आज हमारा देश अपने सपनों को साकार कर रहा है।
— Narendra Modi (@narendramodi) March 2, 2026
न वा उ मां वृजने वारयन्ते न पर्वतासो यदहं मनस्ये।
मम स्वनात् कृधुकर्णो भयात एवेदनु द्यून्किरणः समेजात्।। pic.twitter.com/vh6QABNncx


