पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलचा हा एक खास किस्सा आहे. नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशातील सोलांग येथे पॅराग्लायडिंगसाठी गेले होते तेव्हाची, दोन दशकांपूर्वीची ही घटना आहे. पॅराग्लायडिंग प्रशिक्षक रोशन ठाकूर जी यांनी सोलांगच्या उतारावर नरेंद्र मोदींनी दाखवलेल्या धाडसाची आठवण सांगितली.
रोशन जी सांगतात, “मोदीजींना पॅराग्लायडिंगला जायचे होते. मात्र पावसामुळे आम्ही त्यावेळी पॅराग्लायडिंग बंद केले होते. पण आपल्याला ते करायचेच आहे, असा मोदीजींनी आग्रह धरला. ते करू शकतील की नाही म्हणून, मी जरा साशंकच होतोय म्हणून मी माझी संपूर्ण टीम पॅराग्लायडर्ससोबत पाठवली. पण मोदीजींनी न घाबरता किंवा न डगमगता ते केले ज्यामुळे मला आश्चर्य वाटले. त्यांचा हा धाडसीपणा पाहून मी प्रभावित झालो.”
रोशन जी पुढे असेही म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या स्वभावातील या धाडसीपणामुळेच ते हसतमुखाने आव्हाने स्वीकारून त्यावर मात करू शकले.
A #ModiStory unlike any other!
— Modi Story (@themodistory) April 24, 2022
Roshan Thakur is a paragliding coach from Manali. He reminisces Modi’s paragliding flights from the slopes of Solang, Himachal Pradesh 2 decades ago! https://t.co/EdWZ1iScoN
Follow: @themodistory pic.twitter.com/A9kxHkBGL9


