“राष्ट्रीय सृजक पुरस्कार आपल्या सर्जनशील निर्मात्यांच्या समुदायाच्या प्रतिभेला मिळालेली दाद असून आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा गौरव आहे. ”
“राष्ट्रीय रचनाकार पुरस्कार नवीन युगाला त्याची सुरुवात होण्याआधीच ओळख मिळवून देत आहेत”
"डिजिटल इंडिया मोहिमेने आशय निर्मात्यांचे एक नवीन जग तयार केले आहे"
"आपला शिव नटराज आहे, त्याच्या डमरूतून महेश्वर सूत्र ऐकू येते , त्याचे तांडव लय आणि निर्मितीचा पाया रचते "
"युवकांनी त्यांच्या सकारात्मक कृतींमधून सरकारचे आशय निर्मात्यांकडे लक्ष वेधले आहे "
“तुम्ही एक कल्पना आखली, त्यात नावीन्यता आणली आणि पडद्यावर साकार केली . तुम्ही इंटरनेटचे MVP आहात”
"आशय निर्मिती देशाबद्दलच्या चुकीच्या धारणा सुधारण्यात मदत करू शकते"
“आपण असा आशय तयार करू शकतो का जो तरुणाईमध्ये अंमली पदार्थांच्या नकारात्मक परिणामांबद्दल जागरूकता आणेल ? आपण म्हणू शकतो - ड्रग्स आर नॉट कुल (अंमली पदार्थ चांगले नाहीत) ”
"शंभर टक्के लोकशाहीचा अ
सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्जनशीलतेचा वापर करण्यासाठी एक मंच म्हणून या पुरस्काराची कल्पना पुढे आली .
यावेळी त्यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आणि गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्याच्या निर्णयाचीही माहिती दिली तेव्हा तिथे उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या गजरात त्या निर्णयाचे स्वागत केले.

अजून काही ऐकायचे बाकी आहे का?

कसे आहात तुम्ही सगळेजण ?

थोडी  ‘वाइब ' देखील तपासूया ?

या कार्यक्रमाला उपस्थित माझे मंत्रिमंडळातील सहकारी अश्विनी वैष्णव जी, परीक्षक मंडळातील सदस्य प्रसून जोशी जी, रुपाली गांगुली जी, देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे उपस्थित असलेले सर्व आशय निर्माते , देशातल्या काना - कोपऱ्यात हा कार्यक्रम पाहणारे माझे सर्व तरुण मित्र. आणि इतर सर्व मान्यवर,  तुम्हा सर्वांचे स्वागत आहे, तुम्हा सर्वांचे अभिनंदन. आणि तुम्ही ते लोक आहात ज्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे आणि म्हणूनच तुम्ही आज त्या ठिकाणी आहात – भारत मंडपम. आणि बाहेरील चिन्ह देखील सर्जनशीलतेशी निगडीत आहे आणि हे ते ठिकाण आहे जिथे जी -20 चे सर्व प्रमुख नेते  येथे जमले होते, आणि यापुढे जगाला दिशा कशी दाखवायची यावर चर्चा करत होते. आणि आज तुम्ही लोक आहात जे भारताचे भविष्य कसे घडवायचे यावर चर्चा करायला आले आहात.

 

मित्रहो,

जेव्हा काळ बदलतो, नवे पर्व सुरू होते, तेव्हा त्याच्याशी मेळ राखत बरोबरीने चालणे  ही देशाची जबाबदारी असते. आज देश आपली तीच जबाबदारी भारत मंडपम इथे पार पाडत आहे. पहिला राष्ट्रीय सर्जक पुरस्कार म्हणजेच हा कार्यक्रम जो प्रथमच आयोजित करण्यात आला आहे , तो नव्या युगाला वेळेपूर्वीच ओळख देणारा कार्यक्रम आहे. आणि काही लोक मला कधी कधी विचारतात, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे? असे मला विचारतात.  मी प्रत्येकाला उत्तर देत नाही. एखाद्या  रेस्टॉरंटचा  मालक त्याचे स्वयंपाकघर दाखवतो का? पण मी तुम्हाला सांगतो. ईश्वराची कृपा आहे, मी वेळेच्या आधी वेळेचा अंदाज बांधू  शकतो. आणि म्हणूनच अशा प्रकारचा हा पहिलाच पुरस्कार आहे, जो येत्या काही दिवसांत खूप महत्त्वाचं स्थान मिळवणार आहे.  या नव्या युगाला 'उर्जा' देणाऱ्या तुम्हा सर्व तरुणांना गौरवण्याची , सर्जनशीलतेचा आदर करण्याची आणि समाजाच्या दैनंदिन जीवनाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा आदर करण्याची ही संधी आहे. भविष्यात, हा पुरस्कार आशय निर्मात्यांसाठी एक खूप  मोठी प्रेरणा बनेल, त्यांच्या कार्याला मोठी ओळख मिळणार आहे. आज मी त्या विजेत्यांचे अभिनंदन करतो ज्यांना राष्ट्रीय सर्जक पुरस्कार मिळाला आहे, मात्र  ज्यांनी यात उत्साहाने भाग घेतला त्यांचे विशेष अभिनंदन करायचे आहे. कारण खूप  कमी वेळ मिळाला होता, आम्ही ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकलो नव्हतो. आणि मला त्यात आणखी वेळ घालवायचा नव्हता. पण एवढ्या कमी वेळात दीड ते पावणे दोन लाख सर्जनशील मने यात जोडली जाणे ही देखील माझ्या देशाची एक ओळख निर्माण करते.

 

आणि मित्रहो,

आज आणखी एक पवित्र योगायोग आहे. या पहिल्या राष्ट्रीय सर्जक पुरस्काराचे आयोजन महाशिवरात्रीच्या शुभ दिनी करण्यात आले आहे. आणि माझ्या काशीमध्ये तर भगवान शंकराशिवाय कुठलेही पान हलत नाही.  महादेव, भगवान शिव यांना भाषा, कला आणि सर्जनशीलतेचे जनक मानले जाते. आपले शिव जी  नटराज आहेत . शंकराच्या  डमरूमधून महेश्वर सूत्रे प्रकट झाली आहेत. शंकराचे  तांडव लय आणि सृजनाचा पाया रचते. आणि म्हणूनच, इथे उपस्थित सर्जकांना नवीन विषय मिळतील. महाशिवरात्रीच्या दिवशी आयोजित हा कार्यक्रम एक अतिशय सुखद योगायोग आहे. आणि मी तुम्हाला आणि देशवासियांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

 

मित्रहो,

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन देखील आहे. मात्र आज मला दिसत आहे की पुरुष पहिल्यांदाच टाळ्या वाजवत आहेत.  नाहीतर त्यांना वाटत असते की त्यांचा  दिवस कधीच येत नाही . आज पुरस्कार विजेत्यांमध्ये अनेक मुलींनी बाजी मारली आहे. मी त्यांचेही अभिनंदन करतो आणि मी त्याच जगात आपल्या देशाच्या मुली पाहत आहे, मोठ्या संख्येने मुली दिसत आहेत. तुम्हाला पाहून मला खूप अभिमान वाटतो. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मी देशातील सर्व महिला, भगिनी आणि मुलींना खूप-खूप शुभेच्छा देतो. आणि आज तुम्ही सगळ्याजणी  इथे बसला असताना मी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे दर  100 रुपयांनी  कमी करून आलो आहे.

 

मित्रहो,

कोणत्याही देशाच्या प्रवासात एका धोरणात्मक निर्णयाचा किंवा मोहिमेचा कसा गुणात्मक  प्रभाव पडतो हे तुम्हा सर्वांना पाहून लक्षात येते. 10 वर्षांत झालेल्या डेटा क्रांतीपासून ते स्वस्त मोबाइल फोनपर्यंत, डिजिटल इंडिया मोहिमेने एक प्रकारे आशय निर्मात्यांचे एक नवीन जग तयार केले आहे. आणि हे कदाचित पहिल्यांदाच घडले असेल, जेव्हा कोणत्याही क्षेत्रातील युवा शक्तीने सरकारला प्रेरित केले असेल, सरकारला विचार करायला भाग पाडले असेल की ते किती दिवस बसून राहतील., याबाबतही विचार करा. आणि म्हणूनच तुम्ही अभिनंदनास पात्र आहात. आजच्या या पुरस्कार सोहळ्याचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते भारतातील माझ्या युवकांना  आणि  प्रत्येक डिजिटल आशय निर्मात्याला जाते.

 

मित्रहो,

भारतातील प्रत्येक आशय निर्माता आणखी एका वेगळ्या गोष्टीचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या तरुणांना योग्य दिशा मिळाली तर ते काय काय करू शकतात? तुम्ही आशय निर्मितीचा  कोणताही अभ्यासक्रम शिकलेला नाही. तसा नाहीच त्यामुळे काय करणार? शिक्षण घेत असताना करिअर निवडताना आपण आशय निर्माते सारखे काहीतरी बनू, असा विचारही केला नसेल. मात्र तुम्ही भविष्य ओळखले, भविष्य पाहिले आणि बहुतेक लोकांनी वन मॅन आर्मीप्रमाणे काम सुरु केले. आता ही श्रद्धा पहा, स्वत: मोबाईल घेऊन बसलेली असते. स्वतःच्या प्रकल्पात स्वतःच लेखक , स्वतःच  दिग्दर्शक , स्वतःच निर्माती , स्वतःच संकलक आहे , म्हणजेच तुम्हाला सर्व काही करावे लागते. म्हणजेच  एक प्रकारे एवढी प्रतिभा एका ठिकाणी जमा होणे आणि मग ती प्रकट झाली की त्याचे सामर्थ्य किती  असू शकते याची आपण कल्पना करू शकतो. तुम्ही कल्पना करता, अभिनव संशोधन  करता आणि ते पडद्यावर जिवंत करता. तुम्ही जगाला तुमच्या क्षमतेची केवळ ओळख करून दिली नाही, तर जग देखील दाखवले. तुम्ही दाखवलेल्या धाडसामुळेच आज तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात. आणि देश तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. तुमची आशय सामग्री आज संपूर्ण भारतामध्ये जबरदस्त प्रभाव निर्माण करत आहे. तुम्ही एकप्रकारे इंटरनेटचे MVP आहात...बरोबर आहे ना ? तुमचे डोके थोडे वापरा, तुमची सर्जनशीलता दाखवा. जेव्हा मी तुम्हाला MVP म्हणतो, तेव्हा याचा अर्थ तुम्ही सर्वात मौल्यवान व्यक्ती बनला आहात.

 

मित्रहो,

तुम्हा सर्वांना माहित आहे की जेव्हा आशय आणि सर्जनशीलता एकत्र येतात तेव्हा त्यातून सहभाग वाढतो.  जेव्हा आशय डिजिटल बनतो  तेव्हा परिवर्तन होते. जेव्हा आशय हेतुपूर्वक सहकार्य करते, तेव्हा त्यातून प्रभाव दिसून येतो. आणि आज जेव्हा तुम्ही लोक इथे आला आहात, तेव्हा मलाही तुम्हाला अनेक विषयांवर सहकार्यासाठी विनंती करायची आहे.

 

मित्रांनो,

एके काळी अगदी छोट्यातल्या छोट्या दुकानावर सुद्धा, इथे खूप चविष्ट पदार्थ  मिळतात, असे लिहिलेले पहायला मिळायचे.  असे पहायचात ना?  कुणी विचारलं तिथेच का जेवायचं, तर सांगितले जायचे की जेवण चविष्ट आहे.  पण आज आपण पाहतो की आता दुकानदार असे लिहितात की इथे आरोग्यपूर्ण खाद्यपदार्थ मिळतात. आता चवदार  लिहीत नाही, तर  आरोग्यदायी खाणे उपलब्ध आहे असं लिहितात, हा बदल का झाला?  तर असा बदल आता समाजातही होत आहे. म्हणजे आशय असा असावा की ज्यामुळे लोकांमध्ये कर्तव्याची भावना जागृत होईल.  देशाप्रती असलेल्या तुमच्या कर्तव्यांसाठी लोकांना प्रेरीत करा.  आणि तुमच्या व्यक्त होण्यात थेट संदेश असायला पाहिजे असे नाही, तुम्ही व्यक्त होताना कर्तव्यभाव लक्षात ठेवला तर तो निश्चितपणे अप्रत्यक्षपणे देखील त्यात प्रतिबिंबित होईल.  तुम्हाला आठवत असेल, मी लाल किल्ल्यावरून मुलींच्या अपमानाचा (त्याला सापत्न वागणूक देण्याबाबतचा) मुद्दा उपस्थित केला होता. मी असेही म्हटले होते की तुमची मुलगी संध्याकाळी घरी आल्यावर तुम्ही विचारता….तू उशीरा का आलीस, कुठे गेली होतीस, घरी का लवकर आली नाहीस?  मी लाल किल्ल्यावर विचारले होते की मला असे आई-वडील दाखवा जे आपल्या मुलाला विचारतात की तो उशीरा का येत आहे, मला सांगा?  प्रत्येकजण मुलीला विचारतो की ती कुठे गेली होती , परंतु कुणीही मुलाला विचारत नाही.  मी कंटेंट क्रिएटर्सना (आशय निर्मात्यांना) सांगतो की हे कसे पुढे न्यावे मांडावे, वातावरण कसे तयार करावे,जबाबदारी देखील तितकीच असली पाहिजे.  मुलगी उशिरा आली तर भूकंप होणार आणि मुलगा उशीरा आला तर बेटा जेवला आहेस ना अशी काळजीपूर्वक विचारणा, असे का बरे?  माझे म्हणणे एवढेच आहे  मित्रांनो, की आपल्याला समाजाचा विचार करायला  पाहिजे.  आणि तुमच्यासारखे मित्र ही भावना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे काम खूप चांगले करू शकतात.  बघा, आज महिला दिनी तुम्ही हा संकल्प पुन्हा करू शकता.

आपल्या देशात स्त्री शक्तीचे सामर्थ्य किती मोठी आहे, हे देखील तुमच्या आशय निर्मितीचा एक प्रमुख भाग बनू शकतो.  मी निश्चितपणे म्हणू शकतो की सर्जनशील मन असलेल्या तुमच्यापैकी कुणालाही सकाळपासून रात्रीपर्यंत आई काय करते हे माहीत आहे. हेच थोडं ध्वनीचित्रमुद्रीत (रेकॉर्ड) करून  संपादीत (एडिट) करा, हे चित्रण पाहून त्या कुटुंबातील मुलं थक्क होतील… अच्छा आई एवढं काम करते….एका वेळी करते!  म्हणजे तुमच्यात एक शक्ती आहे, ती तुम्ही याप्रमाणे उपयोगात आणू शकता.  खेड्यातील जीवनाप्रमाणेच खेड्यातील महिलांचा आर्थिक उलाढालीत मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे तुम्ही पाहिले असेल.  भारतात  महिला अर्थार्जन करत नाहीत ही जी पाश्चात्यांची विचारसरणी आहे ना…….अरे बाबांनो, अर्थार्जन करणाऱ्या महिलांचे जाऊ देत, भारतात महिला आहेत म्हणूनच तर सर्व आयुष्यगाडा चालू शकतोय. आपल्या माता-भगिनी खेड्यापाड्यात अर्थार्जनाची खूप कामे करतात हे तुम्हाला दिसेल.  जर तुम्ही आदिवासी पट्ट्यात, डोंगरावर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की जास्तीत जास्त अर्थार्जन आपल्या माता-भगिनी करतात.  आणि म्हणूनच, आपल्या सर्जनशीलतेद्वारे, आपण वस्तुस्थितीच्या आधारे या चुकीच्या धारणा-समज सहजपणे बदलू शकतो.  आणि मला विश्वास आहे की आपण ते केले पाहिजे.  फक्त एक दिवसाच्या आयुष्याचं चक्र दाखवलं तरी कळेल की आपल्याकडे पशुपालक असो, शेतकरी स्त्री असो, मजूर स्त्री असो, ती कशी काम करते, किती कष्ट करते!

स्वच्छ भारताच्या यशाबद्दल तुम्हा सर्वांना माहित आहे आणि तुम्ही त्यात सहकार्य देखील केले आहे. पण ही तर कायम सुरु राहणारी  लोकचळवळ आहे.  कुठूनही एखादी स्वच्छते बाबतची गोष्ट समोर येते…. आता जसे मी एक रील पाहिले की वाघ पाणी पिण्यासाठी जात आहे आणि त्यात त्याला एक प्लास्टिकची बाटली दिसते, तेव्हा वाघ तोंडाने प्लास्टिकची बाटली उचलतो आणि ती कुठेतरी सोडायला जातो…. दूर जात राहतो!  आता याचा अर्थ मोदी कुणाकुणा पर्यंत विचार पोहोचवतो, समजले ना? आता याच माध्यमातून आपणही विचार  पोहोचवू शकता.  आणि म्हणूनच तुम्ही या विषयावर देखील सतत काहीतरी करत रहा!. आणखी एक महत्वाचा विषय देखील मला तुम्हाला सांगायचा आहे, मित्रांनो!  या छोट्या-छोट्या गोष्टी माझ्या हृदयाला भिडतात, तर मला असे वाटते की सर्जनशील मनाची माणसे असतील तर कदाचित मी मोकळेपणाने बोलू शकेन.  मी भाषण करत नाहीये जी!  मानसिक आरोग्याप्रमाणेच हा एक अतिशय हळवा विषय आहे जी!  आणि जरी डिजिटल मंचावर बऱ्याच गोष्टी हास्यविनोदाशी संबंधित असल्या तरी, इतर अनेक गंभीर विषय देखील आहेत. मी पाहतो, मानसिक आरोग्याबाबत (तुमचे अभिनंदन, तुमचे अभिनंदन, तुमचे अभिनंदन, तुमचे अभिनंदन) मी असे म्हणत नाही की आपण त्यावर काही बनवत नाही.  मी असे काहीही सांगितलेले नाही जी… मी अशी चूक करूच शकत नाही.  मला माझ्या देशाच्या प्रतिभेवर-गुणवत्तेवर विश्वास आहे, मला वाटते की माझ्या देशातील लोकांची संवेदनशीलता माझ्यापेक्षा जरासुद्धा कमी नाही.  पण मी असे म्हणू शकतो की जे लोक या विषयावर विचार करतात ते अधिक सर्जनशील असतात.  कारण अनेक आशय निर्माते मानसिक आरोग्याबाबत खूप चांगले काम करतही आहेत. मात्र, सध्या यावर अधिक काम करण्याची गरज आहे आणि शक्य असल्यास स्थानिक भाषेत करण्याची गरज आहे.  खेड्यातल्या एखाद्या कुटुंबात जर असे मूल असेल तर त्यांच्यासाठी काय केले जाऊ शकते?  जगातील एखाद्या मोठ्या शहरात पंचतारांकीत वातावरणात ते होत असेल. कारण त्यांच्या आयुष्यात हे खूप महत्वाचे आहे जी!  तसाच एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे मुलांवरील ताणतणाव! आपल्याला माहीत नसते.  पूर्वी आपले एकत्र कुटुंब असायचे.  आणि कधी आजी मुलांना सांभाळायची, कधी आजोबा सांभाळायचे, कधी आईकडील आजी-आजोबा, कधी काका-काकी , वहिनी, भाऊ!  आता  एक संक्षिप्त कुटुंब असते,आईवडील दोघेही घराबाहेर पडलेले असतात,  मूल आया सोबत असते, काही समजत नाही की मुलावर कशा प्रकारचा ताण आहे,  काहीही माहीत नाही.  आता जसा परीक्षेचा काळ असतो.  विद्यार्थ्यांना निकालाची चिंता खूप भेडसावू लागते. छातीवर दडपण येऊन श्वासोच्छवास वेगाने होऊ लागतो, ऊर धपापू लागतो. निकाल येणार आहे असे तो, जणू नुकताच निकाल आला असल्यासारखा त्याच्या मित्रांना दूरध्वनीवर सांगतो. मग हळूहळू पारा चढू लागतो…. वातावरण गरम होते.  12-15 वर्षांपूर्वी मी एक छोटासा चित्रपट पाहिला होता.  त्यावेळी व्हिडिओ हा प्रकार इतका प्रचलित नव्हता.

 

पण मला, जाणून घ्यायला, समजून घ्यायला, शिकायला आवडते……तर,  त्यात सांगितले होते की कोणताही चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा, चांगले जीवन जगणे अधिक सोपे आहे आणि त्यामुळे आयुष्य किती सुंदर बनते. तर, त्या मुलाला परीक्षा द्यायची असते.  त्याला वाटते की आपण हे सर्व करू शकणार नाही, तर आत्महत्या करण्याचा  विचार त्याच्या मनात घोळू लागतो. कदाचित या चित्रपटाचे जे निर्माते असतील, त्यांच्या हे लक्षात असेल.

मला पूर्ण आठवत नाही, कारण 15-16 वर्षांपूर्वी मी तो चित्रपट पाहिला होता…. 20 वर्षेही झाली असतील!  तर  त्या मुलाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करावीशी वाटते.  म्हणून तो दोरी विकत घ्यायला जातो.

म्हणून तो त्याला विचारतो की  किती फूट उंची पाहिजे.तो विचार करतो फूट काय असते? त्यामुळे तो जाऊन फूट काय असते याचा  अभ्यास करतो.  मग तो म्हणतो की त्याला हुक हवा आहे.  लोखंडाचा पाहिजे आहे, कसला पाहिजे? याचा अभ्यास करून, मग त्याच्या लक्षात येते की मरण्यापेक्षा अभ्यास करणे सोपे आहे.  त्यांनी खूप चांगला चित्रपट बनवला आहे.  7-8 मिनिटांचा आहे .  पण जेव्हा मी हा चित्रपट पाहिला, ही जी आत्महत्या करण्याची मनःस्थिती निर्माण होते ना मुलांची यावर आधारित चित्रपट एक छोटी गोष्ट आहे, पण ती त्यांच्या आयुष्याला एक नवीन मार्ग दाखवते. आता तुम्हाला हे देखील माहित आहे की, मी परीक्षेवर चर्चा कार्यक्रम आयोजित करतो.  तुम्हाला असे वाटेल की अनेकजण खिल्ली उडवतील की पंतप्रधान असताना हे मुलांशी परीक्षेची चर्चा करत राहतात, वेळ वाया घालवतात. मला माहीत आहे मित्रांनो, मी कोणतेही सरकारी परिपत्रक काढून मुलांचे आयुष्य घडवू शकत नाही.  मला त्यांच्याशी संवाद साधावा लागेल, त्यांना जाणून घ्यावे लागेल, मनापासून काम करावे लागेल आणि  त्या वेळी म्हणजे पावसाळ्यानंतर शेतात काम केले तर त्याचा उपयोग होतो. परीक्षेच्या दिवसांत याचे खूप सामर्थ्य असते आणि म्हणून मी दरवर्षी हा कार्यक्रम नियमितपणे करतो.  कारण माझ्या मनात फक्त इतकेच आहे की या मुलांशी बोलावे, मोकळेपणाने बोलावे, कदाचित एखादी गोष्ट कुणाला तरी उपयोगी पडेल. त्यांच्या मनाला स्पर्श करेल, त्यांचा हात धरेल, त्यांना पाठबळ देईल, त्यांच्या पालकांना , त्यांच्या शिक्षकांनाही वाटावे

 

मित्रांनो,

या सगळ्या कामांमध्ये मला हे सगळे रील बनवायला वेळ मिळत नाही म्हणून मी या गोष्टी करतो.  पण तुम्ही ते पण करू शकता.     तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या नकारात्मक परिणामांबद्दल जागरूकता करणारी अधिकाधिक आशय निर्मिती  आपण  करू शकतो का? आपण निश्चितपणे सर्जनशील मार्गाने समजावून सांगू शकतो की- अंमली पदार्थ  तरुणांसाठी चांगले नाहीत म्हणजेच ड्रग्ज  इज नॉट कूल फॉर युथ.

 

मित्रांनो, 

या मध्ये खूप मोठे करण्यासारखे आहे  आणि तुम्ही लोक आहात, कारण तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यांच्या भाषेत बोलू शकता.

 

मित्रांनो,  

येत्या काही दिवसांत लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.आजचा कार्यक्रम यासाठी आहे असे समजू नका. आणि मी तुम्हाला हमी देतो की जर शक्य असेल तर पुढच्या शिवरात्रीला सुद्धा तेव्हा दुसरी तारीख असू शकते.इथे असाच कार्यक्रम मीच करणार आहे.  पण मी त्या अर्थाने लोकसभा निवडणुकीचा विषय काढला नाही, कारण मला खात्री आहे की, माझ्यापेक्षा तुम्ही माझ्यासाठी जास्त करता . आणि तुम्ही माझ्यासाठी कारण कारण मी तुमच्यासाठी जगतो, आणि असे बरेच लोक आहेत जे स्वतःसाठी जगत नाहीत त्यांच्यासाठी इतर लोक करतात . ही मोदींची हमी नाही, तर 140 कोटी देशवासियांची हमी आहे. बरोबर आहे, हे माझे कुटुंब आहे.

 

मित्रांनो,

मी लोकसभा निवडणुकीबद्दल बोलत होतो आणि सर्जनशील जगातली  माणसे  उत्तम काम करू शकतात. आपल्या तरुणांना आणि विशेषतः पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवंमतदारांमध्ये  जागृती करण्यासाठी आपण काही करू शकतो का? आणि त्याला हे माहित असले पाहिजे की मतदान करणे म्हणजे एखाद्याला जिंकवणे किंवा पराभूत करणे नाही. मतदान म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या देशाच्या निर्णय प्रक्रियेचा एक भाग झाला आहात. देशाचे भविष्य घडवण्यात तुम्ही महत्त्वाचे भागीदार आहात, हे त्याच्यापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. कोणाला मत द्यायचे हे कधीही सांगू नका. पण तुम्ही त्यांना  जरूर सांगा की त्यांनी मतदान केलेच पाहिजे. कोणाला द्यायचे हे ते  ठरवतील , कोणाला द्यायचे नाही हे ते ठरवतील , पण त्यांना  हे सांगायलाच हवे की  मतदान केले पाहिजे आणि माझा विश्वास आहे की, आपल्या देशात आणि जगातील इतर देशांमध्ये जसजशी समृद्धी वाढली, तसतशी मतदानाची पद्धत कमी होत गेली.  .जगातील देश समृद्ध झाले, परंतु विविध व्यवस्थां अंतर्गत समृद्धी पर्यंत घेऊ गेले आणि नंतर लोकशाहीच्या दिशेने गेले. शंभर टक्के लोकशाही प्रस्थापित करून भारत एक समृद्ध राष्ट्र बनण्याच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी वाटचाल करत  आहे आणि जगासाठी एक आदर्श बनणार आहे.जगासाठी हा  एक मोठा  आदर्श  असणार आहे. पण मला त्यात माझ्या देशातील तरुणांचा सहभाग हवा आहे.जसे 18,19,20,21 वर्षांच्या

 

मित्रांनो,

आपल्या आजूबाजूला आपण पाहतो की दिव्यांगजन असतात  आणि  दिव्यांग लोकांमध्ये खूप प्रतिभा असते. तुम्हीही त्यांच्यासाठी मोठे माध्यम बनून त्यांना आधार देऊ शकता. आपल्या दिव्यांग लोकांमध्ये असलेली अंगभूत सामर्थ्य  बाहेर आणण्याची गरज आहे आणि त्यालासमाजमाध्यमांच्या  सामर्थ्याचीही जोड देण्याची गरज आहे.

 

मित्रांनो,

दुसरा विषय भारताबाहेर भारताचा प्रभाव अधिक वाढवण्याचा आहे. आज जगामध्ये तुमच्यापैकी जे आज जगाशी  परिचित आहेत, आज भारताच्या तिरंग्याचा खूप शान आणि अभिमान आहे, भारताच्या पारपत्राची   खूप शान आणि अभिमान आहे.आहे की नाही? आहे ना ?  तुम्ही पाहिले असेल, युक्रेन सोडताना मुले तिरंगा झेंडा दाखवत होती ,  काम होत होते . हे सामर्थ्य असेच आले  नाही मित्रांनो, हे सामर्थ्य असेच आले  नाही. यामागे  मिशन मोडमध्ये  तपश्चर्या करण्यात आली आहे.   आज जगातील वातावरण बदलले आहे, परंतु त्याहीपेक्षा, आजच्या जगात काही समज आपल्याबद्दल  आहेत, आपण ते बदलू शकतो का? आणि मी मानतो की , मला आठवते  की मी एकदा एका देशात गेलो होतो तेव्हा एक दुभाषी माझ्यासोबत होता.

आणि तो संगणक अभियंता होता. आणि तो  त्या सरकारमध्ये काम करायचा . म्हणून त्याने मला मदत केली. तीन-चार दिवस तो माझ्यासोबत होता आणि आमची ओळख झाली. तर शेवटी तो म्हणाला, सर, तुमची हरकत नसेल तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी म्हणालो काय? नाही सर, तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना? मी म्हणालो नाही-नाही मित्रा, तू मला तीन-चार दिवसांपासून पाहतो आहेस, वाईट वाटण्याचा प्रश्नच नाही, तुम्ही जरूर विचारा . नाही नाही, राहूद्या  सर, मी नाही विचारत. मी म्हणालो   विचारा, तो म्हणाला साहेब, तुमच्या देशात अजूनही साप,सर्प , जादूटोना  होतात का? हा प्रश्न मला विचारला गेला.मी म्हणालो, बघ मित्रा, त्या काळात आमची माणसे  खूप ताकदवान होती, त्यामुळे त्यांच्यासाठी साप-सर्प  हा सहज होत असे. आता मी म्हणातो  की आमची ताकद खूप कमी झाली आहे. आणि हळुहळू ते माऊसवर आले आहेत. पण मी म्हणालो की ते  त्यांच्या  माऊसने  संपूर्ण जगाला हलवून टाकत आहेत. 

 

मित्रांनो,

आज जर आपण माझ्या देशाच्या या क्षमतेचा उपयोग करून आपल्या क्षमतेने परदेशात बसलेल्या व्यक्तीला आकर्षित करू शकलो, तर त्यांना इथे आणण्यासाठी आपण काम केले पाहिजे, अशा प्रकारे आपण आपली आशय निर्मिती करू शकतो. मित्रांनो, आज संपूर्ण जगभरात तुम्ही भारताचे डिजिटल ॲम्बेसेडर आहात. आणि मला विश्वास आहे की ही एक मोठी ताकद आहे. तुम्ही क्षणार्धात जगभरात जगापर्यंत पोहोचू शकता. तुम्ही वोकल फॉर लोकलचे ब्रँड ॲम्बेसेडर आहात. काल श्रीनगरला गेलो होतो तेव्हा एका तरुणाशी संवाद साधला. मला आश्चर्य वाटले कि ते फक्त मधाचा व्यवसाय करतात. मधमाशी पालनाचे काम करून त्यांनी केवळ डिजिटल जगाच्या माध्यमातून आपला ब्रँड जागतिक स्तरावर नेला आहे.

 

आणि म्हणूनच मित्रांनो,

चला, आपण सर्व मिळून सर्जक भारत चळवळ (क्रिएट ऑन इंडिया मुव्हमेंट) उभारूया अशी मी मोठ्या जबाबदारीने तुमच्याकडून अपेक्षा करतो. आपण भारताशी निगडित कथा, भारताची संस्कृती, भारताचा वारसा आणि परंपरा या जगासोबत सामायिक करूया. चला आपल्या भारताच्या गोष्टी सर्वांना सांगूया. चला भारताविषयी आशयनिर्मिती करूया, जगासाठी आशयनिर्मिती करूया. तुम्ही अशी आशयनिर्मिती करा जी आपल्याबरोबरच आपल्या देशाला, आपल्या सर्वांच्या भारत देशाला जास्तीत जास्त पसंती मिळवून देईल. आणि यासाठी आपल्याला जागतिक प्रेक्षकांनाही आकर्षित करावे लागेल. आपल्याला जगातील विद्यापीठांशी आणि जगातील तरुणांशी जोडले पाहिजे. आज जगभरातील लोकांना भारताबद्दल जाणून घ्यायचे आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना परदेशी भाषा माहित असतील, जर नसतील तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येईल. काही लोक शिकूही शकतात. जर तुम्ही शक्य तितक्या संयुक्त राष्ट्रांच्या भाषांमध्ये, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश यांसारख्या भाषांमध्ये आशयनिर्मिती केली तर तुमची आणि भारताची पोहोचही वाढेल. आपले शेजारील देशांच्या भाषेत काही रचना केली तर आपली वेगळी ओळख निर्माण होईल. आणि आपण पाहिलंच असेल की आम्ही नुकताच एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मी काही दिवसांपूर्वी बिल गेट्स यांच्याशी गप्पा मारत होतो. तेव्हा एआय वगैरे विषयांवर बरीच चर्चा झाली. त्याच्याबद्दल तुम्हाला एक दिवस नक्कीच कळेल. पण आम्ही कालच एक निर्णय घेतला आहे. आमच्याकडे एआय मिशन आहे आणि माझा विश्वास आहे की, एआयमध्ये भारत काय काम करेल याकडे जग पाहत आहे. कारण भारत नेतृत्व करेल मित्रांनो, यावर विश्वास ठेवा, कारण मी तुमच्या भरवशावरच बोलत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सेमीकंडक्टर विषयी, सेमी कंडक्टरच्या जगात भारत ज्या प्रकारे पुढे जात आहे ते जाणून घेतले असेल. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही 2G, 4G कधीच मागे सोडलंय आणि आता आम्ही 5G मध्ये आघाडी घेतली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, सेमी कंडक्टर्सच्या जगात आपण आपले स्थान खूप वेगाने बनवू. आणि बघता बघता त्यात आपण आपला ठसा उमटवू. आणि हे मोदींमुळे नाही, तर माझ्या देशातील तरुणांमुळे, माझ्या देशाच्या प्रतिभेमुळे होईल. खूप क्षमता आहे, मोदी तर फक्त संधी देतात. वाटेतील काटे काढून टाकतात, जेणेकरून आपल्या देशातील तरुण अधिक वेगाने प्रगती करू शकतील मित्रांनो. आणि म्हणूनच मला वाटते की, आपल्या शेजारच्या देशातील भाषेनुसार, त्यांच्या विचारसरणीशी अनुकूल असलेल्या गोष्टी त्यांच्या भाषांमध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर मला वाटते की आमचे ऋणानुबंध अधिक घट्ट होतील. मित्रांनो, आपल्याला स्वतःचा आवाका वाढवावा लागेल, आपला प्रभाव निर्माण करावा लागेल. आणि हे काम सर्जनशील जग खूप चांगले करू शकते. आणि तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेची ताकद माहित आहे, आजकाल मी तुमच्याशी जो संवाद साधतो तो तुम्हाला काही क्षणातच भारतातील 8-10 भाषांमध्ये उपलब्ध होतो हे तुम्ही अनुभवले असेलच. कारण मी एआय वापरतो. तुमच्यासोबत इथे येताना माझा फोटो आला तर तुम्ही तो फोटो एआय च्या माध्यमातून तुमच्यासाठी मिळवू शकता. तुम्ही नमो ॲपवर जाल, फोटो बूथवर जाल, तर तुम्हाला माझा फोटो सहज मिळेल. तुम्ही 5 वर्षापूर्वी कुठेतरी भेटला असाल, एका कोपऱ्यातून माझ्याकडे बघत असताना तुमचा एकच डोळा फोटोत आला असला तरी तो तुमची ओळख पटवेल. ही एआयची ताकद आहे, आपल्या देशातील तरुणांची शक्ती आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो मित्रांनो, भारतात ही क्षमता आहे. ही क्षमता आम्हाला पुढे न्यायची आहे. आणि या सर्जनशीलतेने आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा नव्या उंचीवर नेऊ शकतो. एखादा खाद्यसंस्कृतीशी निगडित सर्जक एखाद्याला मुंबईतील प्रसिद्ध वडा पाव दुकानात नेऊ शकतो. एक फॅशन डिझायनर संपूर्ण जगाला भारतीय कलाकारांच्या कलागुणांची जाणीव करून देऊ शकतो. एक तंत्रज्ञान सर्जक संपूर्ण जगाला सांगू शकतो की आपण मेक इन इंडियाद्वारे काय बनवत आहोत आणि भारतात नवोन्मेष कसा वाढत आहे. खेडेगावात बसलेला ट्रॅव्हल ब्लॉगरसुद्धा परदेशात बसलेल्या व्यक्तीला त्याच्या व्हिडिओंद्वारे भारताला भेट देण्यास प्रवृत्त करू शकतो. आपल्या भारतात अनेक प्रकारच्या जत्रा भरतात. प्रत्येक पर्वाची स्वतःची कथा असते आणि जगाला ती जाणून घ्यायची असते. ज्यांना भारत जाणून घ्यायचा आहे, भारताचा काना-कोपरा जाणून घ्यायचा आहे अशा लोकांची सुद्धा तुम्ही खूप मदत करू शकता.

 

मित्रांनो,

या सर्व प्रयत्नांमध्ये, तुमची शैली, तुमचे सादरीकरण, तुमचे कथानक, तुमची वस्तुस्थिती, वास्तव आणि विषय यांच्यात तुम्ही कधीही तडजोड करणार नाही याचा मला विश्वास आहे. बघा, तुमची एक अनोखी शैली तयार होईल. आता हेच बघा ना, कलाकृती अनेक असतात. पुरातत्वशास्त्रज्ञांनी अनेक गोष्टी शोधून काढल्या आहेत. पण जो वास्तव जाणतो तो जेव्हा निर्मिती करतो, जतन करतो तेव्हा आपण त्या युगात पोहोचतो. जेव्हा आपण 300 वर्षे जुनी एखादी गोष्ट पाहतो तेव्हा असे वाटते की मी तो काळ जगत आहे. ही सर्जनशीलतेची शक्ती आहे मित्रांनो. आणि मला वाटते की माझ्या देशात अशी सर्जनशीलता आहे जी माझ्या देशाचे नशीब बदलण्यासाठी एक उत्प्रेरक एजंट बनू शकते. आणि याच भावनेतून आज मी तुम्हा सर्वांना भेटलो, तुम्हा सर्वांना निमंत्रित केले, तुम्हाला अल्पावधीत सांगूनही तुम्ही आलात, तुम्ही काहीतरी करून दाखवले आहे. मी ज्युरींचेही अभिनंदन करतो, कारण दीड, अडीच लाख लोकांचा प्रत्येक तपशील बारकाईने पाहणे हे खूप कठीण काम आहे. मात्र येत्या काळात हे काम अधिक चांगल्या प्रकारे आणि शास्त्रीय पद्धतीने आपण करू शकू. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Over 1,700 agri startups supported with Rs 122 crore: Govt

Media Coverage

Over 1,700 agri startups supported with Rs 122 crore: Govt
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM to visit Uttar Pradesh on 13 December
December 12, 2024
PM to visit and inspect development works for Mahakumbh Mela 2025
PM to inaugurate and launch multiple development projects worth over Rs 6670 crore at Prayagraj
PM to launch the Kumbh Sah’AI’yak chatbot

Prime Minister Shri Narendra Modi will visit Uttar Pradesh on 13th December. He will travel to Prayagraj and at around 12:15 PM he will perform pooja and darshan at Sangam Nose. Thereafter at around 12:40 PM, Prime Minister will perform Pooja at Akshay Vata Vriksh followed by darshan and pooja at Hanuman Mandir and Saraswati Koop. At around 1:30 PM, he will undertake a walkthrough of Mahakumbh exhibition site. Thereafter, at around 2 PM, he will inaugurate and launch multiple development projects worth over Rs 6670 crore at Prayagraj.

Prime Minister will inaugurate various projects for Mahakumbh 2025. It will include various road projects like 10 new Road Over Bridges (RoBs) or flyovers, permanent Ghats and riverfront roads, among others, to boost infrastructure and provide seamless connectivity in Prayagraj.

In line with his commitment towards Swachh and Nirmal Ganga, Prime Minister will also inaugurate projects of interception, tapping, diversion and treatment of minor drains leading to river Ganga which will ensure zero discharge of untreated water into the river. He will also inaugurate various infrastructure projects related to drinking water and power.

Prime Minister will inaugurate major temple corridors which will include Bharadwaj Ashram corridor, Shringverpur Dham corridor among others. These projects will ensure ease of access to devotees and also boost spiritual tourism.

Prime Minister will also launch the Kumbh Sah’AI’yak chatbot that will provide details to give guidance and updates on the events to devotees on Mahakumbh Mela 2025.