पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 27 ते 29 जून 2026 या कालावधीतील सेशेल्सच्या अधिकृत दौऱ्याचा एक भाग म्हणून, आज व्हिक्टोरिया, माहे येथील 'स्टेट हाऊस'मध्ये आयोजित बैठकीत पंतप्रधान आणि सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्यात अधिकृत चर्चा झाली. या चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा समावेश होता. आरोग्य, शिक्षण, क्षमता बांधणी, डिजिटल परिवर्तन, शाश्वत विकास, सामाजिक पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, सागरी सुरक्षा आणि संरक्षण या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. तसेच, त्यांनी प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली; यामध्ये बेकायदेशीर मासेमारी, अमली पदार्थांची तस्करी आणि समुद्री चाचेगिरी यांसह हिंदी महासागर क्षेत्रातील आव्हाने या मुदद्यांचाही समावेश होता. भारताने जाहीर केलेल्या विशेष आर्थिक पॅकेजअंतर्गत विविध प्रकल्प आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

सेशेल्सच्या विकासाच्या प्राधान्यांना पाठिंबा देण्यास तसेच उभय देशांदरम्यानची घनिष्ठ आणि चिरस्थायी भागीदारी आणखी दृढ करण्यास भारत कटिबद्ध असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

अधिकृत चर्चेनंतर, दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष संयुक्त बोधचिन्हाचे (लोगो) दोन्ही नेत्यांनी प्रकाशन केलेे. त्यानंतर क्षमता बांधणी, यूपीआय , आरोग्य, कृषी, जहाजबांधणी आणि नौवहन, अंतराळ, गुन्हेगारांचे प्रत्यार्पण आणि 'लाइन ऑफ क्रेडिट' या क्षेत्रांमधील विविध सामंजस्य करारांची देवाणघेवाण करण्यात आली. याअंतर्गत 1250 कोटी रुपये एवढी रक्कम 'कर्ज रुपाने दिली जाणार आहे.

सामंजस्य करार /करारांची संपूर्ण यादी येथे पाहता येईल [link]. याशिवाय, सेशेल्सच्या विकासात्मक गरजांना पाठबळ देण्यासाठी अन्नसुरक्षा, पायाभूत सुविधा, आरोग्य, व्यावसायिक प्रशिक्षण, सागरी सुरक्षा आणि संरक्षण या क्षेत्रांमध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या. या घोषणांचा तपशील येथे पाहता येईल [link]. सेशेल्सने ‘आपत्ती रोधक पायाभूत सुविधा आघाडी ’ (सीडीआरआय) मध्ये सहभागी होण्याची घोषणाही केली.

दिवसाच्या उत्तरार्धात पंतप्रधानांनी सेशेल्सच्या नॅशनल असेम्ब्लीच्या  विशेष अधिवेशनाला संबोधित केले. असे करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. आपल्या भाषणात त्यांनी भारत आणि सेशेल्स यांच्यातील ऐतिहासिक मैत्रीपूर्ण संबंध अधोरेखित केले आणि लोकशाही, कायद्याचे राज्य आणि जनकेंद्रित प्रशासन ही दोन्ही देशांना मार्गदर्शक ठरणारी समान मूल्ये असल्याचे नमूद केले. विकास सहकार्य, सागरी सुरक्षा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, आरोग्य आणि क्षमता विकास या क्षेत्रांमधील परस्पर विश्वास व निकट सहकार्यामुळे मजबूत भागीदारी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, दोन्ही लोकशाही राष्ट्रांमध्ये संसदीय देवाणघेवाण अधिक वाढविण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण येथे पाहता येईल [link].

सेशेल्सचे विरोधी पक्षनेते बर्नार्ड जॉर्ज यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत-सेशेल्स द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली आणि दोन्ही देशांतील विशेष मैत्री अधिक दृढ करण्यासाठी ठाम पाठिंबा  व्यक्त केला.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Railways to roll out the first rake of 20 LHB coaches for Bangladesh Railway on August 12

Media Coverage

Indian Railways to roll out the first rake of 20 LHB coaches for Bangladesh Railway on August 12
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 ऑगस्ट 2026
August 12, 2026

India Rising on Every Front: Economic Strength, Global Recognition & Self-Reliance Under PM Modi’s Vision