पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'भारत-ब्रिटन  सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार' (सीईटीए ) आणि 'सामाजिक सुरक्षा करार' यांवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लिहिलेला एक लेख सामायिक  केला. हा करार भारत-ब्रिटन  भागीदारीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी म्हणाले की, हे दोन करार भारत आणि ब्रिटन यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करतील तसेच  दोन्ही देशांच्या सामायिक आकांक्षांचे रूपांतर तेथील जनतेसाठी ठोस संधींमध्ये करतील.

मोदी यांनी नमूद केले की, सीईटीए मुळे अनेक महत्वपूर्ण  क्षेत्रांमध्ये ब्रिटनच्या  बाजारपेठेत पोहोच वाढवून भारतातील शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमई यांना नवी चालना मिळेल.  सामाजिक सुरक्षा करारामुळे ब्रिटनमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना महत्वपूर्ण  आधार मिळेल आणि भारतीय उद्योगांची स्पर्धात्मकता वाढेल असे ते म्हणाले.

मोदी यांनी 'एक्स' (X) वर पोस्ट केले:

भारत-ब्रिटन भागीदारीतील हा एक महत्त्वपूर्ण क्षण आहे!

सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार आणि सामाजिक सुरक्षा करार अंमलात आल्यामुळे, आमचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार आहेत. हे करार एकत्रितपणे आमच्या सामायिक आकांक्षांचे रूपांतर आमच्या जनतेसाठी ठोस संधींमध्ये करतील .

सीईटीएमुळे आमचे शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमई यांना नवी चालना मिळेल. अनेक महत्वपूर्ण  क्षेत्रांना ब्रिटनच्या बाजारपेठेत अधिक भक्कम प्रवेश मिळेल. तसेच, यामुळे तंत्रज्ञान, व्यावसायिक सेवा आणि नवोन्मेष  या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढेल आणि कुशल भारतीय मनुष्यबळाच्या गतिशीलतेला चालना मिळेल.

सामाजिक सुरक्षा करारामुळे ब्रिटनमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना मोठा  आधार मिळेल आणि भारतीय उद्योगांची स्पर्धात्मकता अधिक मजबूत होईल.

हा क्षण आमच्या लोकशाही देशांमधील परस्पर विश्वास आणि व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक व नवोन्मेष  आधारित भविष्यवेधी भागीदारी उभारण्याचा आमचा संकल्प दर्शवतो. भारत आणि ब्रिटन सामायिक समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करत राहतील.

#IndiaUKFTA

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Nepal praises India's efforts in times of crisis; calls PM Modi 'exceptionally generous'

Media Coverage

Nepal praises India's efforts in times of crisis; calls PM Modi 'exceptionally generous'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 ऑगस्ट 2026
August 29, 2026

New India, New Speed, New Stage: Missiles, Medals, Multilateralism under PM Modi