प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या प्रेरणादायी संबोधनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रपतींनी भारताच्या संविधानाचे वेगळेपण अतिशय समर्पकपणे अधोरेखित केले आहे आणि देशाला पुढे नेणाऱ्या सामूहिक भावनेची प्रशंसा केली आहे. त्यांचे हे संबोधन प्रत्येक नागरिकाला लोकशाही बळकट करण्यासाठी, घटनात्मक आदर्शांचे पालन करण्यासाठी आणि 'विकसित भारत' घडवण्यासाठी आपली वचनबद्धता पुन्हा दृढ करण्यास प्रोत्साहित करते, असेही त्यांनी नमूद केले.

'X' या समाजमाध्यमावर पंतप्रधानांनी म्हटले आहे:

“प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी अतिशय प्रेरणादायी संबोधन केले. त्यांनी आपल्या संविधानाचे वेगळेपण योग्यरित्या अधोरेखित केले असून आपल्या राष्ट्राला पुढे नेणाऱ्या सामूहिक भावनेचे कौतुक केले आहे. त्यांचे हे भाषण प्रत्येक नागरिकाला लोकशाही बळकट करण्यासाठी, घटनात्मक आदर्शांचे पालन करण्यासाठी आणि 'विकसित भारत' घडवण्याच्या दिशेने आपला संकल्प पुन्हा दृढ करण्याची प्रेरणा देते.”

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
In a first, NCERT adds Emergency to Class 9 textbooks; chapter details rights suspension and press censorship

Media Coverage

In a first, NCERT adds Emergency to Class 9 textbooks; chapter details rights suspension and press censorship
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 जून 2026
June 25, 2026

Viksit Bharat in Action: PM Modi's Reforms Powering Inclusive Growth, Tech Innovation & Global Competitiveness