पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 15 एप्रिल रोजी, गुजरातमधल्या भुज इथे, के. के. पटेल सुपर स्पेशालिटी रूग्णालयाचे राष्ट्रार्पण  सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. भुज इथल्या श्री कच्छी  लेवा पटेल समाजाने, हे रुग्णालय बांधले आहे.

कच्छ परिसरातील हे पहिलेच धर्मादाय सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे. 200 खाटांच्या या रुग्णालयात सगळ्या सुपर स्पेशालिटी सुविधा, जसे की इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी (हस्तक्षेपात्मक हृदयचिकित्सा) कॅथलॅब, कार्डिओथोरासिक शस्त्रक्रिया, रेडीएशन ऑन्कोलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी,सर्जिकल

ऑन्कोलॉजी अशा कर्करोगविषयक सेवा, नेफरोलॉजी, युरोलॉजी, न्यूक्लियर मेडिसीन, न्यूरो सर्जरी, जॉइंट रिप्लेसमेंट आणि इतर सहायक सेवा, जसे की प्रयोगशाळा, रेडियोलॉजी इत्यादी  दिल्या जातील. या रुग्णालयामुळे आसपासच्या परिसरातील लोकांना परवडणाऱ्या दरात, सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध होतील.

 

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Indian Athletics Rises as Biggest Gainer in Govt Funding For 2024 Paris Olympics Preparations

Media Coverage

Indian Athletics Rises as Biggest Gainer in Govt Funding For 2024 Paris Olympics Preparations
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 जुलै 2024
July 15, 2024

From Job Creation to Faster Connectivity through Infrastructure PM Modi sets the tone towards Viksit Bharat