महामहिम पंतप्रधान इशिबा,

भारत आणि जपानमधील उद्योजक

महिला आणि पुरुषगण ,

नमस्कार

Konnichiwa!

मी आज सकाळीच टोक्योमध्ये पोहोचलो. माझ्या दौऱ्याची सुरुवात  उद्योग जगतातील धुरिणांसोबत होत आहे याचा मला खूप आनंद आहे.

मी तुमच्यापैकी अनेकांना वैयक्तिकरित्या ओळखतो. गुजरातमधील माझ्या मुख्यमंत्री काळात तसेच  दिल्लीला आल्यानंतरच्या काळात भेटलो आहे.  तुमच्यापैकी अनेकांशी माझे निकटचे संबंध आहेत. आज तुम्हाला सर्वांना भेटण्याची संधी मिळाली याचा  मला खूप आनंद झाला आहे.

 

या मंचात सहभागी झाल्याबद्दल मी  पंतप्रधान इशिबा यांचे विशेष आभार मानतो. त्यांच्या बहुमोल भाषणाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

भारताच्या विकासाच्या प्रवासात जपान नेहमीच एक महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. मेट्रो सेवा असो , वस्तुनिर्माण  असो, सेमीकंडक्टर असो किंवा स्टार्ट-अप असोत, प्रत्येक क्षेत्रात आपली भागीदारी परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे.

जपानी कंपन्यांनी भारतात 40 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक  गुंतवणूक केली आहे. गेल्या दोन वर्षांतच 13 अब्ज डॉलर्सची खाजगी गुंतवणूक झाली आहे. जेबीआयसी म्हणते की भारत हे  सर्वात 'आश्वासक' ठिकाण  आहे. जेट्रो म्हणते की 80 टक्के कंपन्यांना भारतात विस्तार करायचा  आहे  आणि 75 टक्के कंपन्या आधीच नफ्यात आहेत.

याचा अर्थ, भारतात भांडवल केवळ वाढत नाही तर ते अनेक पटीने वाढते !

मित्रांनो,

गेल्या अकरा वर्षांमध्ये भारतात झालेल्या अभूतपूर्व परिवर्तनाशी  तुम्ही सर्व परिचित आहात. आज भारतात  राजकीय आणि आर्थिक स्थैर्य  आहे आणि स्पष्ट आणि अंदाज वर्तवण्याजोगी धोरणे आहेत. भारत आता जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच ती जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

जागतिक विकासात भारताचे योगदान 18% आहे. भारताच्या भांडवली बाजारातून चांगले परतावे मिळत आहेत आणि आमच्याकडे मजबूत बँकिंग क्षेत्र आहे. महागाई आणि व्याजदर कमी आहेत आणि परकीय चलन साठा सुमारे 700 अब्ज डॉलर्स आहे.

मित्रांनो,

या बदलामागे आमचा 'सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन' हा दृष्टिकोन आहे. 2017 मध्ये, आम्ही "एक राष्ट्र- एक कर" सुरू केला आणि आता आम्ही त्यात नवीन आणि मोठ्या सुधारणा करण्यावर काम करत आहोत. काही आठवड्यांपूर्वी, आमच्या संसदेने नवीन आणि सोप्या आयकर संहितेला देखील मान्यता दिली आहे.

आमच्या सुधारणा केवळ कर प्रणालीपुरत्या मर्यादित नाहीत. आम्ही व्यवसाय  सुलभतेवर भर दिला आहे. आम्ही व्यवसायांच्या मंजुरीसाठी एकल डिजिटल विंडो  स्थापित केली आहे. आम्ही 45,000 अनुपालनांचे सुसूत्रीकरण केले आहे. ही प्रक्रिया वेगवान करण्यासाठी नियमनमुक्तीबाबत एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

 

संरक्षण आणि अंतराळ सारखी संवेदनशील क्षेत्रे खाजगी क्षेत्रासाठी खुली करण्यात आली आहेत. आता, आम्ही अणुऊर्जा क्षेत्र देखील खुले करत आहोत.

मित्रांनो,

या सुधारणा विकसित भारताच्या उभारणीप्रति आमचा दृढ निर्धार प्रतिबिंबित करतात. आमच्याकडे बांधिलकी, दृढ निर्धार आणि रणनीती आहे आणि जगाने त्याची केवळ दखल घेतलेली नाही तर त्याचे कौतुकही केले आहे. एस अँड पी ग्लोबलने दोन दशकांनंतर भारताच्या पतमानांकनात सुधारणा केली आहे.

जग फक्त भारताकडे पाहत नसून जगाला भारताबद्दल विश्वासही वाटत  आहे.

मित्रांनो,

भारत-जपान व्यवसाय मंच अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये उभय देशांतील कंपन्यांमधील व्यावसायिक करारांची तपशीलवार माहिती आहे. या उल्लेखनीय प्रगतीबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. मी आपल्या भागीदारीसाठी काही सूचना देखील नम्रपणे देऊ इच्छितो.

पहिले म्हणजे वस्तुनिर्माण. वाहनक्षेत्रातील आपली भागीदारी अत्यंत यशस्वी झाली आहे आणि पंतप्रधानांनी त्याचे तपशीलवार वर्णन केले आहे. आपण एकत्रितपणे बॅटरी, रोबोटिक्स, सेमी-कंडक्टर, जहाज बांधणी आणि अणुऊर्जेमध्ये समान जादूची पुनरावृत्ती करू शकतो. एकत्रितपणे, आपण ग्लोबल साऊथच्या, विशेषतः आफ्रिकेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो.

मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो: या, मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड. सुझुकी आणि डायकिनच्या यशोगाथा तुमच्याही यशोगाथा बनू शकतात.

दुसरे म्हणजे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष. जपान हे "टेक पॉवरहाऊस" म्हणजेच तंत्रज्ञानाचे ऊर्जा केंद्र आहे. आणि, भारत हे "टॅलेंट पॉवरहाऊस" म्हणजे प्रतिभेचे ऊर्जा केंद्र आहे. भारताने एआय, सेमीकंडक्टर्स, क्वांटम कंप्युटिंग, बायोटेक आणि अवकाशातील धाडसी आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतले आहेत. जपानचे तंत्रज्ञान आणि भारताची प्रतिभा या शतकातील तंत्रज्ञान क्रांतीचे एकत्रितपणे नेतृत्व करू शकतात.

 

तिसरे क्षेत्र म्हणजे हरित ऊर्जा संक्रमण. भारत 2030 पर्यंत 500 गिगावॅट अक्षय ऊर्जेकडे वेगाने वाटचाल करत आहे. 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जेचेही आमचे ध्येय आहे. सौर पेशींपासून ते हरित हायड्रोजनपर्यंत, भागीदारीसाठी मोठ्या संधी आहेत.

भारत आणि जपानमध्ये संयुक्त पत यंत्रणेबाबत एक करार झाला आहे. याचा वापर स्वच्छ आणि हरित भविष्य घडविण्यासाठी सहकार्य करण्यास केला जाऊ शकतो.

चौथे क्षेत्र म्हणजे, पुढील पिढीतील पायाभूत सुविधा. गेल्या दशकात भारताने नेक्स्ट-जनरेशन मोबिलिटी आणि लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अभूतपूर्व प्रगती केली आहे. आमच्या बंदरांची क्षमता दुप्पट झाली आहे. आमच्याकडे 160 हून अधिक विमानतळ आहेत. 1000 किमी लांबीच्या मेट्रो लाईन्स बांधल्या गेल्या आहेत. जपानच्या सहकार्याने मुंबई-अहमदाबाद जलदगती रेल्वेचेही काम सुरू आहे.

पण आपला प्रवास इथेच थांबत नाही. जपानची उत्कृष्टता आणि भारताची व्याप्ती एक परिपूर्ण भागीदारी निर्माण करू शकते.

पाचवे म्हणजे कौशल्य विकास आणि व्यक्ती-व्यक्तींमधील संबंध. भारतातील कुशल तरुणांच्या प्रतिभेमध्ये जागतिक गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे. जपानलादेखील याचा फायदा होऊ शकतो. तुम्ही भारतीय प्रतिभेला जपानी भाषा आणि सॉफ्ट स्किल्समध्ये प्रशिक्षित करू शकता आणि एकत्रितपणे "जपानसाठी तयार" कार्यबल तयार करू शकता. एक सामायिक कार्यबल सामायिक समृद्धीकडे घेऊन जाईल.

मित्रांनो,

शेवटी मी हे सांगू इच्छितो - भारत आणि जपानची भागीदारी धोरणात्मक आणि स्मार्ट आहे. आर्थिक तर्काने प्रेरित होऊन आपण सामायिक हितसंबंधांचे सामायिक समृद्धीत रूपांतर केले आहे.

ग्लोबल साऊथकडे जाणाऱ्या जपानी व्यवसायांसाठी भारत हा एक आधारस्तंभ आहे. एकत्रितपणे, आपण स्थैर्य, वाढ आणि समृद्धीसाठी आशियाई शतकाला आकार देऊया.

या शब्दांसह मी पंतप्रधान इशिबा आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो.

अरिगातो गोझाईमासू!

खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
MSMEs’ contribution to GDP rises, exports triple, and NPA levels drop

Media Coverage

MSMEs’ contribution to GDP rises, exports triple, and NPA levels drop
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam highlighting the importance of grasping the essence of knowledge
January 20, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi today shared a profound Sanskrit Subhashitam that underscores the timeless wisdom of focusing on the essence amid vast knowledge and limited time.

The sanskrit verse-
अनन्तशास्त्रं बहुलाश्च विद्याः अल्पश्च कालो बहुविघ्नता च।
यत्सारभूतं तदुपासनीयं हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात्॥

conveys that while there are innumerable scriptures and diverse branches of knowledge for attaining wisdom, human life is constrained by limited time and numerous obstacles. Therefore, one should emulate the swan, which is believed to separate milk from water, by discerning and grasping only the essence- the ultimate truth.

Shri Modi posted on X;

“अनन्तशास्त्रं बहुलाश्च विद्याः अल्पश्च कालो बहुविघ्नता च।

यत्सारभूतं तदुपासनीयं हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात्॥”