नवोन्मेष आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत आणि सर्जनशील दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि हीच विविधता नवनव्या शक्यता निर्माण करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जसे प्रत्येक पाण्याच्या स्रोताची चव वेगवेगळी असते तसेच प्रत्येक प्रतिभेची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आणि योगदान असते. वैविध्यपूर्ण विचार आणि क्षमतांच्या मिलाफातून नवोन्मेष आणि प्रगती साध्य होते, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे -
“पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः।
जातौ जातौ नवाचाराः नवा वाणी मुखे मुखे॥”
हे सुभाषित सांगते की, नवोन्मेष आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत आणि सर्जनशील दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि हीच विविधता नवनव्या शक्यता निर्माण करते. जसे एका पाण्याच्या स्रोताची चव दुसऱ्या स्रोतापेक्षा वेगळी असते तसेच प्रत्येक प्रतिभेची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आणि योगदान असते. या विविध कल्पना आणि क्षमतांच्या मिलाफातूनच नवोन्मेष आणि प्रगती साध्य होते
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे :
“पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः।
जातौ जातौ नवाचाराः नवा वाणी मुखे मुखे॥”
पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः।
— Narendra Modi (@narendramodi) June 15, 2026
जातौ जातौ नवाचाराः नवा वाणी मुखे मुखे॥ pic.twitter.com/KZHjUsEMzb


