पंतप्रधान त्शेरिंग तोबग्ये यांनी पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाची केली प्रशंसा
भूतान सोबत असलेल्या अनुकरणीय भागीदारीप्रती भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पंतप्रधान मोदी यांच्याकडून पुनरुच्चार

भूतानचे पंतप्रधान दाशो त्शेरिंग तोबग्ये यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला आणि 18 व्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांच्या  गेल्या दशकातील  दूरदर्शी नेतृत्वाची पंतप्रधान तोबग्ये यांनी प्रशंसा केली तसेच तिसऱ्या यशस्वी कार्यकाळासाठी त्यांनी मोदींना सदिच्छा दिल्या.

पंतप्रधान तोबग्ये यांच्या प्रशंसेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले. भूतानसोबतच्या अनुकरणीय भागीदारीला भारत सर्वोच्च प्राधान्य देतो अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. भारत आणि भूतान यांच्यातील मैत्री आणि सहकार्याचे अनोखे बंध आणखी दृढ करण्याप्रती भारताच्या  वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी यावेळी पुनरुच्चार केला.

भारत आणि भूतान यांच्यातील भागीदारी सर्व स्तरांवर दृढ  विश्वास, सद्भावना आणि परस्पर सामंजस्य यावर आधारित आहे तसेच ही भागीदारी दोन्ही देशांतील जनतेमध्ये असलेले दृढ संबंध आणि सखोल आर्थिक तसेच विकासात्मक भागीदारीमुळे अधिक मजबूत झाली आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre launches Bhavya scheme to set up 100 industrial parks across country

Media Coverage

Centre launches Bhavya scheme to set up 100 industrial parks across country
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 मे 2026
May 24, 2026

Strength, Growth & Global Trust: How PM Modi is Transforming India Across Frontiers