पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझा संघर्ष समाप्त करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या सर्वंकष योजनेचे स्वागत केले आहे.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की ही योजना पॅलेस्टाईन आणि इस्त्राईलमधील जनतेसह संपूर्ण पश्चिम आशियातील प्रदेशासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत शांतता, सुरक्षा आणि विकासाचा एक व्यवहार्य मार्ग उपलब्ध करून देते.

मोदी यांनी आशा व्यक्त केली की सर्व संबंधित पक्ष संघर्ष समाप्त करण्यासाठी आणि शाश्वत शांतता सुनिश्चित करण्यासाठी ट्रम्प यांच्या या उपक्रमाच्या समर्थनार्थ एकत्र येतील.

पंतप्रधानांनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे:

"आम्ही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी गाझा संघर्ष समाप्त करण्यासाठी जाहीर केलेल्या सर्वंकष योजनेचे स्वागत करतो. ही योजना पॅलेस्टाईन आणि इस्त्राईलच्या जनतेसह व्यापक पश्चिम आशियाई प्रदेशासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत शांतता, सुरक्षा आणि विकासाचा एक व्यवहार्य मार्ग प्रदान करते. आम्हाला आशा आहे की सर्व संबंधित पक्ष राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपक्रमाशी एकत्र येऊन संघर्ष समाप्त करण्यासाठी आणि शांती सुनिश्चित करण्यासाठी या प्रयत्नाला पाठिंबा देतील.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Stranded in Tehran, 50 Iranian Sikhs return safely to India

Media Coverage

Stranded in Tehran, 50 Iranian Sikhs return safely to India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 02 ऑगस्ट 2026
August 02, 2026

Youth. Manufacturing. Digital Trust. The Three Engines Powering New Bharat Under PM Modi