आपल्या अनुभवातून भारत-अफगाणिस्तान मैत्रीचा सुगंध दरवळतो-पंतप्रधान

अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरीद मामुन्दजई यांनी आज डॉक्टर्स दिनानिमित्त केलेल्या ट्वीटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे. या राजदूतांनी, भारतीय डॉक्टरसोबतचा आपला एक भावनिक अनुभव संगीतला आहे. मामुन्दजई एका डॉक्टरकडे उपचारांसाठी गेले होते, त्यावेळी, जेव्हा ते अफगाणिस्तानचे राजदूत असल्याचे डॉक्टरांना कळले, तेव्हा त्या डॉक्टरांनी ‘मी माझ्या बंधूकडून कसलेही पैसे घेणार नाही’ असे सांगत कोणतेही शुल्क आकारले नव्हते. विशेष म्हणजे मामुन्दजई यांनी हे ट्वीट हिंदीत केले आहे. राजदूतांनी सांगितलेल्या या अनुभवातून, भारत-अफगाणिस्तान सबंधांमधील स्नेहाचा दरवळ जाणवतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली आहे.

तसेच, याच  ट्वीटवर कॉमेंट करतांना, एका व्यक्तीने मामुन्दजई यांना पंजाबजवळच्या हरीपूरा गावात येण्याचे आमंत्रण दिले आहे. तिथे आणि गुजरातमधील ऐतिहासिक ओळख असलेल्या हरीपूरा गावालाही भेट द्यावी, असे पंतप्रधानांनी या ट्वीट थ्रेड मध्ये म्हटले आहे.

आज राष्ट्रीय डॉक्टर्स दिन आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Beyond Make in India: Building a globally competitive manufacturing ecosystem

Media Coverage

Beyond Make in India: Building a globally competitive manufacturing ecosystem
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 6 जून 2026
June 06, 2026

Viksit Bharat Rising: PM Modi's Vision Powers Energy, Defense & Digital Dominance