पंतप्रधानांच्या हस्ते 3400 कोटी रुपयांच्या दळणवळणविषयक प्रकल्पांची पायाभरणी
गौरीकुंड ते केदारनाथ आणि गोविंदघंटा ते हेमकुंड साहिब दरम्यानच्या रोप वे प्रकल्पांची पंतप्रधान करणार पायाभरणी
गौरीकुंड ते केदारनाथ दरम्यानच्या रोपवे मुळे सहा-सात तासांचे अंतर केवळ 30 मिनिटांत पार करणे शक्य
गोविंदघाट ते हेमकुंड रोपवेमुळे आधी एक पूर्ण दिवस करावा लागणारा प्रवास आता फक्त 45 मिनिटांत होणार पूर्ण
पंतप्रधानांच्या हस्ते 1000 कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विस्तार प्रकल्पाचीही पायाभरणी- यामुळे सीमेवर बारमाही संपर्क व्यवस्था उपलब्ध होणार
या सर्व प्रकल्पांमुळे या प्रदेशातील संपर्कव्यवस्था आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ऑक्टोबर 2021 रोजी उत्तराखंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. केदारनाथ इथे सकाळी साडेआठ वाजता ते केदारनाथाचे दर्शन आणि पूजा करतील. त्यानंतर 9 वाजताच्या सुमारास, त्यांच्या हस्ते केदारनाथ रोपवे प्रकल्पाची पायाभरणी केली जाईल.  त्यानंतर, ते आदि शंकराचार्य यांच्या समाधीचे दर्शन घेतील. 9.25 ला, पंतप्रधान मंदाकिनी अष्टपथ आणि सरस्वती अष्टपथाच्या विकासकामांचा आढावा घेतील.

त्यानंतर, पंतप्रधान बद्रीनाथला जाणार आहेत. तिथे सुमारे 11.30 वाजता, पंतप्रधान बद्रीनाथ मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. सुमारे 12 वाजता, ते नदीकिनाऱ्यावरील विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतील. त्यानंतर, माना या गावात दुपारी साडे बारा वाजता पंतप्रधान रस्ते आणि रोपवे प्रकल्पाची पायाभरणी करतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता, पंतप्रधान, अरायव्हल प्लाझा आणि तलावांच्या विकासकामांचा आढावा घेतील.

केदारनाथमधील रोपवे सुमारे 9.7 किमी लांबीचा असेल आणि गौरीकुंड ते केदारनाथला जोडेल, दोन्ही ठिकाणांमधला प्रवासाचा वेळ सध्या असलेल्या 6-7 तासांवरून केवळ 30 मिनिटांपर्यंत कमी होईल.हेमकुंड रोपवे गोविंदघाट ते हेमकुंड साहिबला जोडेल.हा रोप वे  सुमारे 12.4 किमी लांबीचा  असेल आणि प्रवासाचा वेळ एका दिवसापेक्षा कमी करून केवळ 45 मिनिटांपर्यंत कमी करेल.हा रोपवे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यानाचे  प्रवेशद्वार असलेल्या घंगारियाला देखील जोडेल.

सुमारे 2430 कोटींच्या एकूण खर्चाने विकसित होणारे हे रोपवे हे वाहतुकीचा एक पर्यावरणपूरक मार्ग आहे जो वाहतुकीचे निर्धोक , सुरक्षित आणि स्थिर  साधन प्रदान करेल. या मोठ्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, यामुळे  या प्रदेशातील आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि अनेक रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.

सुमारे 1000 कोटी रुपयांच्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पांची पायाभरणीही या दौऱ्यात होणार आहे. माना ते माना पास (राष्ट्रीय महामार्ग 07) आणि जोशीमठ ते मलारी (राष्ट्रीय महामार्ग 107ब ) -या दोन रस्ता रुंदीकरण प्रकल्पांची पायाभरणी ही आपल्या सीमावर्ती भागांमध्ये शेवटच्या टोकापर्यंत  सर्व हवामानाशी सुसंगत रस्ते कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या दिशेने हे आणखी एक पाऊल ठरेल.कनेक्टिव्हिटी वाढवण्यासोबतच, हे प्रकल्प धोरणात्मक दृष्टिकोनातूनही फायदेशीर ठरतील.

केदारनाथ आणि बद्रीनाथ ही  सर्वात महत्वाची हिंदू देवस्थाने आहेत. हे क्षेत्र हेमकुंड साहिब या पूज्य शीख तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. हाती घेतलेले कनेक्टिव्हिटी प्रकल्प हे धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी प्रवेश सुलभ करण्यासाठी आणि मूलभूत पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी पंतप्रधानांची वचनबद्धता दर्शवतात.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
IndiaAI Mission-backed startup Avataar launches indigenous video AI model

Media Coverage

IndiaAI Mission-backed startup Avataar launches indigenous video AI model
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 जून 2026
June 13, 2026

Viksit Bharat Accelerating: Tech, Defense, Infra & Exports Power India's Global Leap Under the Leadership of PM Modi