पंतप्रधान 79,150 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या 'धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाचा' करणार प्रारंभ
पंतप्रधान 40 एकलव्य शाळांचे उद्घाटन आणि 25 एकलव्य शाळांसाठी पायाभरणी करणार
पीएम-जनमन अंतर्गत अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑक्टोबर 2024 रोजी झारखंडला भेट देणार आहेत. पंतप्रधान, हजारीबाग येथे दुपारी 2 च्या सुमाराला सुमारे 83,300 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घाटन करणार आहेत.

देशभरातील आदिवासी समुदायांचा सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून पंतप्रधान 79,150 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या  'धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाला' प्रारंभ करतील. या अभियानात 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 549 जिल्हे आणि 2,740 तालुक्यांमधल्या 63,000 गावांचा समावेश असून  5 कोटींहून अधिक आदिवासी लोकांना त्याचा लाभ होईल. या अभियानाचा उद्देश केंद्र सरकारची  विविध 17 मंत्रालये आणि विभागांद्वारे कार्यान्वित  25 हस्तक्षेपांच्या माध्यमातून  सामाजिक पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, उपजीविका यामधील गंभीर तफावत भरून काढणे हा आहे.

आदिवासी समुदायांसाठी शैक्षणिक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी, पंतप्रधान 40 एकलव्य आदर्श निवासी शाळांचे उदघाटन करतील आणि 2,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 25 एकलव्य आदर्श निवासी शाळांसाठी  पायाभरणी करतील.

'प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाअंतर्गत (PM-JANMAN/पीएम -जनमन ) 1360 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान करतील. यामध्ये 1380 किलोमीटरपेक्षा अधिक रस्ते, 120 अंगणवाड्या, 250 बहुउद्देशीय केंद्रे आणि 10 शालेय वसतिगृहांचा समावेश आहे. याखेरीज पीएम जनमनअंतर्गत साध्य महत्त्वपूर्ण कामांचे अनावरण ते करतील. यात सुमारे 3,000 गावांमधील 75,800 हून अधिक विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांच्या (पीव्हीटीजी) 75,800 हून अधिक घरांचे विद्युतीकरण, 275 फिरत्या वैद्यकीय एककांचे कार्यान्वयन, 500 अंगणवाडी केंद्रांचा प्रारंभ, 250 वन धन विकास केंद्रांची स्थापना आणि 5,550 हून अधिक पीव्हीटीजी गावांमध्ये नळाद्वारे पाणी योजनेची पूर्तता यांचा समावेश आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
The quiet foundations for India’s next growth phase

Media Coverage

The quiet foundations for India’s next growth phase
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Emphasizes Power of Benevolent Thoughts for Social Welfare through a Subhashitam
December 31, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi, has underlined the importance of benevolent thinking in advancing the welfare of society.

Shri Modi highlighted that the cultivation of noble intentions and positive resolve leads to the fulfillment of all endeavors, reinforcing the timeless message that individual virtue contributes to collective progress.

Quoting from ancient wisdom, the Prime Minister in a post on X stated:

“कल्याणकारी विचारों से ही हम समाज का हित कर सकते हैं।

यथा यथा हि पुरुषः कल्याणे कुरुते मनः।

तथा तथाऽस्य सर्वार्थाः सिद्ध्यन्ते नात्र संशयः।।”