अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात शंभर आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग अभियानाची उद्यापासून सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 2 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे नशामुक्त युवा -विकसित भारत संकल्प अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. युवकांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करणे आणि आपल्या समाजात सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचे दूत बनण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या शुभारंभासह अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधातील शंभर आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग अभियानाची सुरुवात होणार आहे. या अभियानांतर्गत, अमली पदार्थमुक्त समाज उभारण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढावा, यासाठी देशभरात दर रविवारी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या उपक्रमांमध्ये क्रीडा स्पर्धा, वॉकेथॉन, ध्यानसत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृती मोहिमा, पथनाट्ये, चर्चासत्रे, कला स्पर्धा आणि सामुदायिक सहभागाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
शैक्षणिक संस्था, युवा संघटना, नागरी समाजातील विविध संस्था, उद्योग क्षेत्रातील संघटना आणि आध्यात्मिक संस्थांना एका समान व्यासपीठावर आणून, अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात सामूहिक जनआंदोलन उभारण्यासाठी समाजाच्या सहभागाला अधिक बळकटी देण्याचाही या उपक्रमाचा उद्देश आहे.

देशभरातील 10 हजारांहून अधिक ठिकाणांहून युवक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. माय भारत स्वयंसेवक, माय भारत राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, युवा मंडळे, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, उद्योग संघटनांच्या युवा शाखा तसेच 125 हून अधिक भागीदार आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात आभासी माध्यमातून सहभागी होणार आहेत.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'BRICS 2026 becomes major Bharat achievement for PM Narendra Modi'

Media Coverage

'BRICS 2026 becomes major Bharat achievement for PM Narendra Modi'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 सप्टेंबर 2026
September 15, 2026

A Mandate of Performance: Civic Wins, IPO Surge and Neighbourly Power Reflect Faith in PM Modi’s Leadership