Launch to initiate ‘LiFE Global Call for Papers’ inviting ideas for adoption of environment conscious lifestyle
The idea of LiFE was introduced by PM during COP26 in Glasgow
It focuses on 'mindful and deliberate utilisation' instead of 'mindless and destructive consumption'

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जून रोजी सायंकाळी 6 वाजता पर्यावरणासाठी जीवनशैली (लाईफ) या जागतिक पुढाकाराची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरूवात करणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जीवनशैली जगभरातील व्यक्ती, समुदाय आणि संघटना यांनी स्वीकारावे, यासाठी प्रभावी आणि पाठपुरावा कसा करायचा, यासंदर्भात शिक्षणतज्ञ, विद्यापीठे आणि संशोधन संस्था आदींकडून नवनवीन कल्पना आणि सूचना मागवण्यासाठी लाईफ ग्लोबल कॉल फॉर पेपर्स या उपक्रमाने सुरूवात होणार आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांचे मुख्य भाषणही होणार आहे.

या कार्यक्रमात बिल अँड मेलिंडा गेट्स प्रतिष्ठानचे सहअध्यक्ष बिल गेट्स, हवामान अर्थशास्त्रज्ञ निकोलस स्टर्न, नज थिअरीचे लेखक प्राध्यापक कॅस सस्टेन, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष अनिरूद्ध दासगुप्ता; यूएनईपीच्या जागतिक प्रमुख श्रीमती इंगर अँडरसन, यूएनडीपीचे जागतिक प्रमुख अचिम स्टेनर आणि जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हीड मॅलपास यांचा सहभागही रहाणार आहे.

ग्लासगो येथे गेल्या वर्षी झालेल्या 26 व्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदलविषयक परिषदेत(सीओपी26) पंतप्रधानांनी लाईफची कल्पना मांडली होती. अविचारी आणि विनाशकारी उपभोगाऐवजी विचारी आणि जाणीवपूर्वक उपयोगाला या कल्पनेवर भर देणारी पर्यावरणविषयक जागृत जीवनचक्राला ही कल्पना चालना देते.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
MSME exports touch Rs 9.52 lakh crore in April–September FY26: Govt tells Parliament

Media Coverage

MSME exports touch Rs 9.52 lakh crore in April–September FY26: Govt tells Parliament
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 डिसेंबर 2025
December 20, 2025

Empowering Roots, Elevating Horizons: PM Modi's Leadership in Diplomacy, Economy, and Ecology