पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात दिल्ली क्षयरोग समाप्ती शिखर परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण आशियाई विभागीय कार्यालय आणि क्षयरोग निर्मूलन भागीदारी संस्था यांनी संयुक्तरित्या या शिखर परिषदेचे आयोजन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येईल. या मोहिमेअंतर्गत क्षयरोग निर्मूलनासाठी राष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक योजना राबविली जाईल. देशातील प्रत्येक क्षयरोग रुग्णाला दर्जेदार तपास, औषधोपचार सहज उपलब्ध व्हावेत यासाठी पुढील तीन वर्षात 12 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद या राष्ट्रीय पातळीवरील धोरणात्मक योजनेसाठी करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक क्षयरोग रुग्णाचा शोध घेता यावा यासाठी या नव्या योजनेत बहुआयामी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

2025 पर्यंत क्षयरोगांचं निर्मूलन करण्याचं पंतप्रधानांचं ध्येय डोळ्यासमोर ठेऊन सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या स्थापनेपासून म्हणजेच 1997 पासून आतापर्यंत 2 कोटी रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India a ‘front-runner’ market, plans to deepen AI and manufacturing presence: Ericsson CEO

Media Coverage

India a ‘front-runner’ market, plans to deepen AI and manufacturing presence: Ericsson CEO
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 मार्च 2026
March 03, 2026

Citizens Express Their Appreciation on Heartfelt Leadership, Historic Gains: PM Modi’s India Shines in Conservation, Commerce, and Clean Energy