उद्घाटन हे भारताच्या प्रशासकीय व्यवस्थापन रचनेतील परिवर्तनात्मक टप्पा आहे.
सेवा तीर्थमध्ये पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालयाचा समावेश
अर्थ, संरक्षण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, शिक्षण यासह अनेक प्रमुख मंत्रालयांची कार्यालये आता कर्तव्य भवन-1 आणि 2 मध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1:30 वाजता सेवा तीर्थ इमारतींच्या संकुलातील नामफलकांचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1 आणि 2 चे औपचारिकरीत्या उद्घाटन करण्यात येणार असून सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते सेवा तीर्थ येथे होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील.

या वास्तूंचे उद्घाटन भारताच्या प्रशासकीय प्रशासन व्यवस्थेच्या रचनेतील परिवर्तनकारी टप्पा असून त्यातून आधुनिक, कार्यक्षम, सुलभ आणि नागरिक-केंद्रीत प्रशासन परिसंस्था तयार करण्याची पंतप्रधानांची वचनबद्धता दिसून येते.

गेली अनेक दशके, अनेक प्रमुख सरकारी कार्यालये आणि मंत्रालये सेंट्रल व्हिस्टा परिसरातील विविध ठिकाणी विखुरलेल्या वेगवेगळ्या जुन्या इमारतींमध्ये कार्यरत आहेत. या विखुरलेल्या परिस्थितीमुळे कामकाजात अकार्यक्षमता, समन्वयात अडचणी, वाढता देखभाल खर्च आणि कामकाजाच्या दृष्टीने पुरेसे पोषक नसलेले वातावरण निर्माण झाले होते. नवीन इमारत संकुलात  प्रशासकीय कार्यांना आधुनिक, भविष्यास सज्ज सुविधांची जोड देऊन या समस्यांचे निवारण केले गेले आहे.

पूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी असलेले पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय आता सेवा तीर्थ संकुलात एकाच ठिकाणी असणार आहे.

कर्तव्य भवन-1 आणि 2 मध्ये अर्थ मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, संस्कृती मंत्रालय, विधी आणि न्याय मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, रसायने आणि खते मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय यासह अनेक प्रमुख मंत्रालयांची कार्यालये असतील.

दोन्ही इमारत संकुलांमध्ये डिजिटली एकात्मिक कार्यालये, संरचित सार्वजनिक इंटरफेस झोन आणि केंद्रीकृत स्वागत सुविधा आहेत. या नव्या सोयींमुळे सहकार्य, कार्यक्षमता, सुरळित कारभार, नागरिकांचा वाढीव सहभाग आणि कर्मचाऱ्यांचे कल्याण या गोष्टींना चालनान मिळेल. ही संकुलांची रचना 4-तारांकित जीआरआयएचए मानकांनुसार केली गेली असून त्यामध्ये अक्षय ऊर्जा प्रणाली, जलसंवर्धन, कचरा व्यवस्थापन उपायांनी सुसज्ज असून उच्च-कार्यक्षमता असलेल्या इमारतींच्या आच्छादनाचा समावेश आहे. हे उपाय पर्यावरण बदलांचे परिणाम लक्षणीयरीत्या कमी करणारे असून परिचालन कार्यक्षमता सुधारणारे आहेत. इमारतींच्या संकुलांमध्ये स्मार्ट प्रवेश नियंत्रण प्रणाली, देखरेख नेटवर्क आणि अत्याधुनिक आपत्कालीन प्रतिसाद पायाभूत सुविधा यासारख्या व्यापक सुरक्षा यंत्रणांचा देखील समावेश असल्याने अधिकारी आणि अभ्यागतांना सुरक्षित आणि सुलभ वातावरण उपलब्ध होईल हे सुनिश्चित झाले आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's 1 Trillion Retail Moment: Dawn of Retail Revenue Intelligence

Media Coverage

India's 1 Trillion Retail Moment: Dawn of Retail Revenue Intelligence
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 जून 2026
June 27, 2026

Appreciation for PM Modi's Development-Focused and People-Centric Governance