पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच येत्या 26 एप्रिलला सकाळी साडे दहा वाजता सौराष्ट्र तामिळ संगममच्या सांगता सोहळ्याला संबोधित करणार आहेत.
“एक भारत, श्रेष्ठ भारत” या तत्वाला प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीनुसार हा उपक्रम राबवला जात आहे. देशाच्या विविध भागांतील लोकांमध्ये असलेले प्राचीन अनुबंध शोधून काढण्याचा प्रयत्न या उपक्रमांच्या माध्यमातून होत आहे. याच दृष्टिकोनातून यापूर्वी काशी तमिळ संगमचे आयोजन करण्यात आले होते. सौराष्ट्र तमिळ संगमम, गुजरात आणि तामिळनाडूमधील समान संस्कृती आणि वारसा साजरा केला जात आहे.
अनेक शतकांपूर्वी सौराष्ट्र प्रदेशातून अनेक लोक तामिळनाडूत स्थलांतरित झाले. सौराष्ट्र तमिळ संगममने सौराष्ट्रीय तमिळांना त्यांच्या मुळांशी पुन्हा जोडण्याची संधी दिली आहे. 10 दिवस चाललेल्या या संगमामुळे 3000 हून अधिक सौराष्ट्रीयन तामिळ लोक विशेष रेल्वेगाडीने सोमनाथला आले. कार्यक्रमाची सुरुवात 17 एप्रिल रोजी झाली, आता त्याचा समारोप सोहळा 26 एप्रिल रोजी सोमनाथ इथं होणार आहे.


