ईद आणि नवरोजच्या शुभेच्छा देत पंतप्रधानानांनी प्रादेशिक स्थैर्य आणि सागरी सुरक्षेवर दिला भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्रपती डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत, पश्चिम आशियातल्या घडामोडींविषयी चर्चा केली तसेच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावरही भर दिला.

ईद आणि नवरोज सणाच्या निमित्ताने, पंतप्रधानांनी, डॉ मसूद पेझेश्कियान यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी झालेल्या चर्चेत, दोन्ही नेत्यांनी, हा उत्सवाचा काळ पश्चिम आशियात, शांतता, स्थैर्य आणि समृद्धी घेऊन येणारा ठरेल, अशी आशा व्यक्त केली. या प्रदेशातील महत्वाच्या पायाभूत सुविधांवर अलीकडेच झालेल्या हल्ल्यांचा निषेध नोंदवत, पंतप्रधान मोदी यांनी, असे हल्ले प्रादेशिक स्थैर्य राखण्यात धोकादायक ठरून, महत्वाच्या जागतिक पुरवठा साखळीतही अडथळे निर्माण करत असल्याचे सांगितले. जागतिक स्तरावर सुरळीत नौवहनाचे स्वातंत्र्य अत्यंत महत्वाचे असल्याचा पुनरुच्चार करत, आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूकीचे मार्ग खुले आणि सुरक्षित राहतील, हे सुनिश्चित करणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. इराणमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षिततेची काळजी घेत असल्याबद्दल, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इराणचे आभारही मानले.

पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:-
“इराणचे राष्ट्रपती डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधत त्यांना ईद आणि नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. हा पवित्र उत्सवाचा काळ पश्चिम आशियात, शांतता, स्थैर्य आणि समृद्धी आणणारा ठरेल, अशी आशा आम्ही दोघांनीही व्यक्त केली.

या प्रदेशातील महत्वाच्या पायाभूत प्रकल्पावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवत, असे हल्ले प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक पुरवठा साखळीसाठी धोकादायक ठरतील, असे नमूद केले.

नौवहनाचे सर्व देशांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याला महत्त्व देण्याची गरज आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

इराणमधल्या भारतीयांना सुरक्षा आणि सुरक्षितता देण्यास इराण करत असलेल्या प्रयत्नांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.”

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
UP's exports to BRICS nations, partners cross $5.36 billion in FY26: Govt

Media Coverage

UP's exports to BRICS nations, partners cross $5.36 billion in FY26: Govt
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister visits Pahadpur village in Odisha with President of India, Smt. Droupadi Murmu on her birthday
June 20, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, said that he was honoured to be in Pahadpur village in Odisha with President of India, Smt. Droupadi Murmu on her birthday.

The Prime Minister noted that Pahadpur is the President’s village and said that the work done by her is truly inspiring.

Shri Modi prayed for the President’s long and healthy life.

The Prime Minister wrote on X;

“Honoured to be in Pahadpur village, Odisha with Rashtrapati Ji and that too on her birthday. This is her village and the work that she has done is truly inspiring.

Praying for her long and healthy life.

@rashtrapatibhvn”