पंतप्रधानांनी त्यांना ईदच्या शुभेच्छा देत पश्चिम आशियामधील देशांत सुसंवाद आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर चर्चा करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनचे राजे महामहिम अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला; यावेळी आगामी सणांच्या निमित्ताने एकमेकांत शुभेच्छांची देवाणघेवाण केली, तसेच पश्चिम आशिया क्षेत्रातील बदलत्या सुरक्षा परिस्थितीवर उभय नेत्यांनी चर्चा केली.

पंतप्रधानांनी राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना ईदच्या सणाच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या. या दरम्यान झालेल्या चर्चेच्या वेळी , दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि या प्रदेशात लवकरात लवकर शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी धोरणात्मक संवाद साधण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

पश्चिम आशियातील ऊर्जेच्या पायाभूत स्रोतांवरील हल्ले अत्यंत निंदनीय आहेत आणि त्यामुळे वाढलेला तणाव टाळता आला असता, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारत आणि जॉर्डन हे वस्तू आणि ऊर्जेच्या निर्वेध वाहतुकीच्या समर्थनार्थ ठामपणे उभे राहतील, असे प्रतिपादन मोदींनी केले. या प्रदेशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्याची सोय करण्यासाठी जॉर्डनने केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. 

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे :

"माझे बंधू, जॉर्डनचे राजे महामहिम अब्दुल्ला द्वितीय यांना ईदच्या निमित्ताने दूरध्वनीवरून आगाऊ शुभेच्छा दिल्या. पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आम्ही उभयतांनी चिंता व्यक्त केली; तसेच, या प्रदेशात लवकरात लवकर शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी संवाद आणि धोरणात्मक मुत्सद्देगिरीची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पश्चिम आशियातील ऊर्जा पायाभूत स्रोतांवर होणारे हल्ले निंदनीय असून, त्यामुळे टाळता येण्याजोगा तणाव वाढू शकतो. वस्तू आणि ऊर्जेची  वाहतूक सुरळीतपणे करण्याच्या भूमिकेला भारत आणि जॉर्डन यांचा पाठिंबा आहे. "जॉर्डन मधे अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतीच्या प्रवासासाठी जॉर्डनने केलेल्या प्रयत्नांचे मी मनापासून कौतुक करतो."

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'Make in India' radar programme to help Tejas track targets gets Rs 2,205 crore boost

Media Coverage

'Make in India' radar programme to help Tejas track targets gets Rs 2,205 crore boost
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 01 ऑगस्ट 2026
August 01, 2026

Aatmanirbhar Bharat Delivers: Indigenous Power, Farmer Prosperity & Blue Economy