पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या पावन प्रसंगी सर्व देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. विघ्नहर्ता भगवान गणेशाची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेण्याचा हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा आणि नवा उत्साह निर्माण करो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भगवान गणेशाच्या दिव्य आशीर्वादाने सर्वांचे प्रयत्न सफल होवोत आणि देश विकासाच्या मार्गावर निरंतर प्रगती करत राहो, अशी प्रार्थना मोदी यांनी केली.
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले -
“मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं
कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम्।
अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं
नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्॥”
या सुभाषितातून असे सांगितले आहे की, ज्या भगवान श्री विनायकांच्या पवित्र हातात मोदक शोभून दिसतो, जे मुक्तीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्यांना सदैव मार्गदर्शन करतात, ज्यांच्या मस्तकावर चंद्रकोर अलंकार म्हणून विराजमान आहे, जे संपूर्ण विश्वाचे रक्षणकर्ते आणि समस्त ब्रह्मांडाचे एकमेव सर्वोच्च स्वामी आहेत, ज्यांनी गजासुर या राक्षसाचा वध केला आणि जे आपल्या भक्तांना सर्व दुःख व संकटांपासून तत्काळ मुक्त करतात, अशा भगवान विनायकांना मी नमन करतो.
पंतप्रधानांनी 'एक्स' वर लिहिले -
“देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या अनंत शुभेच्छा. विघ्नहर्त्याचे दर्शन आणि पूजन करण्याचा हा पावन सण सर्वांच्या जीवनात नवी ऊर्जा आणि नवा उत्साह निर्माण करो. त्यांच्या दिव्य आशीर्वादाने सर्वांचे प्रयत्न सफल होवोत आणि राष्ट्र निरंतर प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहो, हीच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया!
मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं
कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम्।
अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं
नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्॥”
देशवासियों को गणेश चतुर्थी की अनंत शुभकामनाएं। विघ्नहर्ता के दर्शन और पूजन का यह पावन पर्व सबके जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे। उनके दिव्य आशीर्वाद से सभी के प्रयास सफल हों और राष्ट्र निरंतर प्रगति के पथ पर आगे बढ़ता रहे, यही कामना है। गणपति बाप्पा मोरया!… pic.twitter.com/5biHnkWHJ4
— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2026


