पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पृथ्वीच्या चिरस्थायी चैतन्यावर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
"यस्यां वृक्षा वानस्पत्या ध्रुवास्तिष्ठन्ति विश्वहा।
पृथिवीं धेनुं प्रदुहां न उदिच्छन्तु नमोऽस्तु पृथिव्यै॥"
या सुभाषितात म्हटले आहे की, "ज्या भूमीवर वृक्ष आणि वनस्पती सदैव ताठ मानेने आणि स्थिरपणे उभ्या आहेत, ती पृथ्वी आम्हाला सर्व प्रकारची सुखे आणि संसाधने प्रदान करो. आम्ही वसुंधरेला वंदन करतो."
मोदी यांनी नमूद केले की, "पृथ्वी ही आपली माता आहे, मानवजातीचे कल्याण तिच्या संवर्धनातच सामावलेले आहे. तिचे रक्षण करणे हे केवळ आपले सामूहिक कर्तव्यच नाही, तर भावी पिढ्यांसाठी घेतलेली आपली पवित्र प्रतिज्ञा देखील आहे."
एक्स या समाजमाध्यमावच्या पोस्ट मध्ये पंतप्रधान लिहितात:
“पृथ्वी आपली माता आहे आणि मानवजातीचे कल्याण तिच्या संरक्षणात आहे. तिचे संरक्षण करणे ही केवळ आपली जबाबदारीच नाही, तर भावी पिढ्यांप्रति असलेली आपली एक पवित्र प्रतिज्ञासुद्धा आहे.”
"यस्यां वृक्षा वानस्पत्या ध्रुवास्तिष्ठन्ति विश्वहा।
पृथिवीं धेनुं प्रदुहां न उदिच्छन्तु नमोऽस्तु पृथिव्यै॥"
पृथ्वी हमारी माता है और इसके संरक्षण में मानवता का कल्याण निहित है। इसकी रक्षा करना हम सबका केवल दायित्व नहीं, बल्कि आने वाली पीढ़ियों के प्रति हमारा पवित्र संकल्प भी है।
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2026
यस्यां वृक्षा वानस्पत्या ध्रुवास्तिष्ठन्ति विश्वहा।
पृथिवीं धेनुं प्रदुहां न उदिच्छन्तु नमोऽस्तु पृथिव्यै॥ pic.twitter.com/PqeuwZP79H


