पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून या सुभाषितामध्ये राष्ट्र उभारणीत युवा शक्ती ही सर्वात सामर्थ्यशाली घटक असून भारतातील युवक आपला उत्साह आणि ध्येयनिष्ठेने प्रत्येक महत्वाकांक्षा साकार करु शकतात हा स्वामी विवेकानंद यांचा दृढ विश्वास अधोरेखित केला आहे.
"अङ्गणवेदी वसुधा कुल्या जलधिः स्थली च पातालम्।
वल्मीकश्च सुमेरुः कृतप्रतिज्ञस्य वीरस्य॥"
शूर आणि दृढ इच्छाशक्ती असणाऱ्यांसाठी पृथ्वी ही त्यांच्या स्वतःच्या अंगणासमान आहे, विशाल समुद्र एखाद्या तळ्याप्रमाणे आहे तर गगनाला भिडणारे पर्वत उंचावरील बिंदू प्रमाणे आहेत, ज्यांची इच्छाशक्ती एखाद्या पाषाणाप्रमाणे अभेद्य आहे, त्यांना या पृथ्वीवर काहीच अशक्य नाही, असे या सुभाषितातून सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
"युवाशक्ती हीच राष्ट्र उभारणीतील सर्वात शक्तिशाली आधारस्तंभ आहे असा स्वामी विवेकानंद यांचा दृढ विश्वास होता, भारतीय युवक आपला दुर्दम्य उत्साह आणि ध्येयनिष्ठेने प्रत्येक संकल्पाला साकार करु शकतात."
अङ्गणवेदी वसुधा कुल्या जलधिः स्थली च पातालम्।
वल्मीकश्च सुमेरुः कृतप्रतिज्ञस्य वीरस्य॥"
स्वामी विवेकानंद का मानना था कि युवा शक्ति ही राष्ट्र-निर्माण की सबसे सशक्त आधारशिला है। भारतीय युवा अपने जोश और जुनून से हर संकल्प को साकार कर सकते हैं।
— Narendra Modi (@narendramodi) January 12, 2026
अङ्गणवेदी वसुधा कुल्या जलधिः स्थली च पातालम्।
वल्मीकश्च सुमेरुः कृतप्रतिज्ञस्य वीरस्य॥ pic.twitter.com/6cliyTstvE


