पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रसेवा हा 'विकसित भारता'चा पाया असल्याचे अधोरेखित करत या आशयाचे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. लोकसेवा दिनाच्या या गौरवशाली प्रसंगाचे औचित्य साधून, सर्वात मागे असलेल्या व्यक्तीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सक्षम,समृद्ध आणि संवेदनशील भारत घडवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा आपण पुन्हा एकदा निर्धार करूया, असे म्हटले आहे.
पंतप्रधानांनी पुढील संस्कृत सुभाषित सामयिक केले आहे-
"शीलं परहितासक्तिः अनुत्सेकः क्षमा धृतिः।
अलोभश्चेति विद्यायाः परिपाकोञ्चलं फलम्॥"
नम्रता,परोपकार, लीनता, क्षमाशीलता, सहनशीलता आणि निर्लोभीपणा, ही सर्व ज्ञानाच्या परिपूर्णतेची तेजस्वी फळे आहेत, असे या सुभाषितात सांगितले आहे.
एक्स समाज माध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात:
"राष्ट्रसेवा हा ‘विकसित भारत’ चा पाया आहे. नागरी सेवा दिनाच्या या गौरवशाली प्रसंगी, आपण रांगेतील सर्वात शेवटच्या व्यक्तीला विकासाच्या मुख्य प्रवात आणून सशक्त, समृद्ध तसेच संवेदनशील भारताच्या उभारणीचा पुनश्च निर्धार करूया.
शीलं परहितासक्तिः अनुत्सेकः क्षमा धृतिः।
अलोभश्चेति विद्यायाः परिपाकोञ्चलं फलम्॥"
राष्ट्रसेवा ही ‘विकसित भारत’ की नींव है। सिविल सेवा दिवस के गौरवशाली अवसर पर आइए, अंतिम पंक्ति में खड़े व्यक्ति को विकास की मुख्यधारा से जोड़कर सशक्त, समृद्ध एवं संवेदनशील भारतवर्ष के निर्माण का संकल्प दोहराएं।
— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2026
शीलं परहितासक्तिः अनुत्सेकः क्षमा धृतिः।
अलोभश्चेति विद्यायाः… pic.twitter.com/2vNGOQVBaC


