पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कौशल्य, कठोर परिश्रम आणि करुणा या आपल्या जीवनातील अद्भुत शक्ती आहेत हे नमूद करणारे एक सुभाषित सामायिक केले. या गुणांच्या आधारे, आपण जीवनातील प्रत्येक आव्हानावर केवळ मातच करू शकत नाही, तर, आपली ध्येय साध्य करण्यासाठी देखील हे गुण उपयुक्त ठरतात असे त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधान पुढे म्हणाले, कुशल व्यक्तींसाठी कोणतेही कार्य कठीण नसते; कठोर परिश्रम करणाऱ्यांसाठी कोणतेही ध्येय असाध्य नसते; सुशिक्षित व्यक्तींसाठी स्वदेश आणि परदेश यांच्यात कोणताही फरक नसतो; आणि ज्याचे बोलणे दयाळूपणाचे, प्रेमळ असते, त्या व्यक्तीसाठी कोणीही परके नसते.
‘एक्स’वरील आपल्या संदेशांत पंतप्रधान म्हणाले :
"कौशल्य, कठोर परिश्रम आणि करुणा या आपल्या जीवनातील अद्भुत शक्ती आहेत. त्यांच्याद्वारे आपण केवळ प्रत्येक आव्हानावर मात करू शकत नाही, तर त्या आपल्याला आपली ध्येये साध्य करण्यासही मदत करतात.
को हि भारः समर्थानां किं दूरं व्यवसायिनाम्।
को विदेशः सुविद्यानां कः परः प्रियवादिनाम्॥"
कुशल लोकांसाठी कोणतेही कार्य कठीण नसते; कष्टाळू लोकांसाठी कोणतेही ध्येय दूर नसते; सुशिक्षित लोकांसाठी स्वदेश आणि परदेश यात काहीच फरक नसतो; आणि मृदुभाषी लोकांसाठी कोणीही परके नसते.
कौशल, परिश्रम और करुणा हमारे जीवन की अद्भुत शक्तियां हैं। इनके माध्यम से हम न केवल हर चुनौती को पार कर सकते हैं, बल्कि ये हमारे लक्ष्यों की प्राप्ति में भी मददगार हैं।
— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2026
को हि भारः समर्थानां किं दूरं व्यवसायिनाम्।
को विदेशः सुविद्यानां कः परः प्रियवादिनाम्॥ pic.twitter.com/mJUQT5Yg3l


