जेव्हा नागरिक एकता आणि परस्पर सहकार्याच्या धाग्यांनी बांधले जातात, तेव्हा राष्ट्राची शक्ती अनेक पटींनी वाढते,अशा अर्थाचे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले आहे. भारतातील लोकांच्या याच सामूहिक निर्धाराच्या जोरावर देश प्रगतीची नवनवीन शिखरे सातत्याने गाठत आहे,असे ही मोदी यांनी अधोरेखित केले आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
"जेव्हा नागरिक एकता आणि परस्पर सहकार्याच्या धाग्यांनी बांधले जातात, तेव्हा राष्ट्राची शक्ती अनेक पटींनी वाढते. भारतातील लोकांच्या याच सामूहिक निर्धाराच्या जोरावर देश प्रगतीची नवनवीन शिखरे सातत्याने गाठत आहे. "
धूमायन्ते व्यपेतानि ज्वलन्ति सहितानि च।
धृतराष्ट्रोल्मुकानीव ज्ञातयो भरतर्षभ॥"
या सुभाषिताचा अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे लाकडाचे तुकडे वेगळे असताना त्यांची शक्ती पूर्णपणे दाखवू शकत होत नाही; परंतु ते एकत्र आले की तेजस्वीपणे प्रज्वलित होतात आणि प्रकाश व उष्णता निर्माण करतात, त्याचप्रमाणे एखाद्या राष्ट्राची प्रगती, समृद्धी आणि सामर्थ्य हे तेथील नागरिकांच्या एकता, परस्पर सहकार्य आणि सामूहिक दृढनिश्चयावर अवलंबून असते.
जब नागरिक एकजुटता और आपसी सहयोग के सूत्र में बंधते हैं, तो राष्ट्र की शक्ति कई गुना बढ़ जाती है। भारतवासियों के इसी सामूहिक संकल्प से आज देश उन्नति की नित-नई ऊंचाइयों को छू रहा है।
— Narendra Modi (@narendramodi) June 3, 2026
धूमायन्ते व्यपेतानि ज्वलन्ति सहितानि च।
धृतराष्ट्रोल्मुकानीव ज्ञातयो भरतर्षभ॥ pic.twitter.com/ySNn4JgNHn


