पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरिक ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी सामायिक केले, ज्यामध्ये आंतरिक ज्ञानाला जीवनाचा खरा सार मानून त्याचे महत्व अधोरेखित केले आहे.
भारताचा वारसा आणि संस्कृतीने सातत्याने हीच शिकवण दिली आहे की, अचूक ज्ञान आणि त्याचा योग्य वापर हाच कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचा खरा पाया असतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. याच मार्गाचा अवलंब करून देशातील तरुण आज समृद्ध आणि सशक्त भारताच्या निर्मितीमध्ये सक्रियपणे योगदान देत आहेत, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. ते पुढे म्हणाले की, हे ज्ञान जे आपल्या आत वसलेले आहे आणि जे सामान्य माहितीच्या पलीकडचे आहे, ते थोर महात्मे आणि विद्वानांकडूनही पूजनीय मानले जाते.


पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे की, 
“आपल्या वारसा आणि संस्कृतीने आपल्याला शिकवले आहे की खरे ज्ञान आणि त्याचा योग्य वापर हा राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे. याच मार्गाचे अनुसरण करून, आपल्या देशातील तरुण आज एक समृद्ध आणि बलवान भारत घडवण्यासाठी कार्यरत आहेत”.

अन्तःस्थमेव यज्ज्ञानं ज्ञानादपि च यत्परम्।
तदेव सर्वसंसारसारं सद्भिरुपास्यते॥"

आपल्या अंतर्यामी वसलेले ज्ञान, जे सामान्य किंवा बाह्य ज्ञानाच्या पलीकडचे आहे, तेच या संपूर्ण विश्वाचे खरे सार आहे. हेच ते आंतरिक शहाणपण आहे ज्याची महान आणि ज्ञानी पुरुषांकडून उपासना केली जाते. ”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'Smartphone PLI plan exceeds targets, value addition quadruples': Industry informs govt

Media Coverage

'Smartphone PLI plan exceeds targets, value addition quadruples': Industry informs govt
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 जुलै 2026
July 08, 2026

1,000 Years of Heritage, One Future of Partnership: PM Modi Strengthens India-Indonesia Bonds in Jakarta