पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि पर्यावरण संवर्धनासाठी उत्कटतेने कार्य करणाऱ्या सर्वांचे कौतुक केले.

हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला पुढे नेण्याप्रती आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याची संधी आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. गेल्या दशकात सरकारच्या विविध उपक्रमांमुळे हरित आच्छादनात वाढ झाली असून काही प्राण्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भारतातील जनतेचे सामूहिक प्रयत्न, प्रभावी धोरणे, विज्ञानावरील विश्वास आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून पर्यावरणात लक्षणीय सुधारणा घडवून आणता येते हे सिद्ध करून दाखवले आहे, असे मोदी म्हणाले.

भारताला आपल्या जैवविविधतेचा अत्यंत अभिमान आहे, जैवविविधतेचा भाग असलेल्या परिसंस्थांच्या वैविध्यामुळे असंख्य प्रजाती आणि लोकांच्या उपजीविकेला आधार मिळतो, असे पंतप्रधान म्हणाले.

काही महत्त्वाच्या प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धनातील प्रगतीचा उल्लेख करताना मोदी यांनी सांगितले की माळढोक (ग्रेट इंडियन बस्टर्ड), हिमबिबट्या (स्नो लेपर्ड), अस्वल (स्लॉथ बेअर) आणि चित्ता यांच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख त्यांनी केला. वचनबद्धतेच्या बळावर वन्यजीव आणि परिसंस्था पुनर्स्थापित करण्यास कशी मदत होऊ शकते याची हे प्रयत्न झलक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

‘एक पेड माँ के नाम’ सारख्या उपक्रमांचे दरवर्षी सुमारे 1.1 लाख हेक्टर वन क्षेत्र वाढविण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या तत्त्वाने प्रेरित होऊन भारत, मिशन लाईफमार्फत अधिक स्वच्छ, हरित आणि शाश्वत ग्रहाच्या निर्मितीसाठी कार्य करीत राहील, असे प्रतिपादन मोदी यांनी केले.

भारतीय ज्ञानपरंपरेत सांस्कृतिक मूल्यव्यवस्था सुरेख प्रतिबिंबित झाली आहे, असे सांगून पंतप्रधानांनी पर्यावरणाच्या जतन आणि संवर्धनाचा संदेश अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी एक पवित्र संस्कृत सुभाषित आपल्या संदेशात दिले.

आपल्या एक्स  वरील संदेशांच्या मालिकेत पंतप्रधानांनी म्हटले आहे,

“जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना उत्तमोत्तम शुभेच्छा. पर्यावरण संवर्धनासाठी उत्कटतेने कार्य करणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक कौतुक करतो. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याप्रती आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याचा आहे. गेल्या दशकात आमच्या सरकारने केलेल्या अनेक प्रयत्नांमधून या दिशेने केलेले कार्य ठळकपणे दिसून येते. भारताच्या महत्त्वपूर्ण यशामध्ये हरित आच्छादनाचा विस्तार आणि काही प्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ यांचा समावेश आहे. भारतातील जनतेचे सामूहिक प्रयत्न, धोरणे, विज्ञानावरील विश्वास आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून पर्यावरणात कशी सुधारणा घडवून आणता येते हे दाखवून दिले आहे.”

 

“भारताला आपल्या जैवविविधतेचा अभिमान आहे. आपल्या विविध परिसंस्था असंख्य प्रजातींना आणि लोकांच्या उपजीविकेला आधार देतात. काही खास प्रजातींच्या पुनर्स्थापनेसाठी केलेले आपले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. माळढोक (ग्रेट इंडियन बस्टर्ड), हिमबिबट्या (स्नो लेपर्ड), अस्वल (स्लॉथ बेअर) आणि चित्ता यांच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्न सातत्यपूर्ण आहेत. त्यांतून वन्यजीव आणि परिसंस्थांचे पुनरुज्जीवन कसे शक्य होते याची झलक मिळाली आहे. ‘एक पेड माँ के नाम’ यांसारख्या उपक्रमांचे दरवर्षी सुमारे 1.19 लाख हेक्टर वन क्षेत्र वाढविण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे.” 

“Guided by the principle of ‘One Earth, One Family and One Future’, we will continue working towards a cleaner, greener and more sustainable planet through the spirit of Mission LiFE.” 

“प्रकृति का संरक्षण केवल एक दायित्व नहीं, बल्कि हमारी संस्कृति और संस्कारों का भी अभिन्न हिस्सा है।

मधु वाता ऋतायते मधु क्षरन्ति सिन्धवः।
माध्वीर्नः सन्त्वोषधीः॥"

 

“‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या तत्त्वाला धरून, मिशन लाईफच्या माध्यमातून आम्ही अधिक स्वच्छ, हरित आणि शाश्वत ग्रहाच्या निर्मितीसाठी सातत्याने कार्यरत असू.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Mapping the subsurface: How ICAR’s ‘Soil Intelligence’ is reshaping India’s mega infrastructure boom

Media Coverage

Mapping the subsurface: How ICAR’s ‘Soil Intelligence’ is reshaping India’s mega infrastructure boom
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
September 11, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान म्हणाले की, आचार्य विनोबा भावे यांची जय जगत ही प्रेरणादायी हाक सर्व सीमांच्या पलीकडे जाणारी होती आणि तिने मानवतेला सर्वोच्च स्थान दिले.

मोदी म्हणाले की, आपल्या विविध प्रयत्नांतून आचार्य विनोबा भावे यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्य केले.

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, समानता, प्रतिष्ठा आणि सेवा यांवरील त्यांच्या अढळ श्रद्धेमुळे समाजातील सर्वात वंचित घटकांना बळ मिळाले.

मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे;

"आचार्य विनोबा भावे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली.

त्यांची जय जगत ही प्रेरणादायी हाक सर्व सीमांच्या पलीकडे जाणारी होती आणि तिने मानवतेला सर्वोच्च स्थान दिले.

आपल्या विविध प्रयत्नांतून त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्य केले.

समानता, प्रतिष्ठा आणि सेवा यांवरील त्यांच्या अढळ श्रद्धेमुळे समाजातील सर्वात वंचित घटकांना बळ मिळाले.