पीएम मुद्रा योजनेने कशा प्रकारे लाखो लोकांना स्वप्न पाहण्याचा आत्मविश्वास आणि ती पूर्ण करण्याची साधने प्रदान केली आहेत याची झलक पंतप्रधानांनी सामायिक केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पीएम मुद्रा योजनेच्या यशाबाबत आपले विचार व्यक्त केले आणि या योजनेने कशा प्रकारे लाखो लोकांना स्वप्न पाहण्याचा आत्मविश्वास आणि ती पूर्ण करण्याची साधने प्रदान केली आहेत याची झलक सामायिक केली.

पंतप्रधानांनी नमूद केले की, अडथळे दूर करून आणि आपल्या लोकांच्या आकांक्षांवर विश्वास ठेवून, या उपक्रमाने संपूर्ण भारतात उद्योजकतेची भावना मजबूत केली आहे. मोदी पुढे म्हणाले की, पीएम मुद्रा योजना एक असा आर्थिक  विचारप्रवाह दर्शवते , जिथे संधी सहज उपलब्ध आहेत आणि उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते. योजनेच्या परिवर्तनकारी क्षमतेचा उल्लेख करत  पंतप्रधानांनी सांगितले की, या योजनेने कशा प्रकारे युवाशक्ती आणि नारीशक्तीवर सकारात्मक प्रभाव पाडला आहे, ज्यामुळे प्रत्येक  स्वप्न साकार करण्यासाठी पाठिंबा दिला जात  आहे.

एक्सवरील पोस्टच्या मालिकेत पंतप्रधानांनी लिहिले:

पीएम मुद्रा योजनेने लाखो लोकांना स्वप्न पाहण्याचा आत्मविश्वास आणि ती पूर्ण करण्याची साधने प्रदान करून कर्ज मिळवण्याची सुलभता नव्याने परिभाषित केली आहे.

अडथळे दूर करून आणि आपल्या लोकांच्या आकांक्षांवर विश्वास ठेवून, या योजनेने संपूर्ण भारतात उद्योजकतेची भावना अधिक दृढ केली आहे.

#11YearsOfMUDRA"

"मुद्रा योजनेच्या परिवर्तनकारी  क्षमतेची आणि तिने आपल्या युवाशक्ती व नारीशक्तीवर कसा सकारात्मक प्रभाव पाडला आहे याची ही एक झलक.

#11YearsOfMUDRA"

"पीएम मुद्रा योजना एक  असा आर्थिक  विचारप्रवाह दर्शवते , जिथे संधी सहज उपलब्ध आहेत आणि उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते आणि प्रत्येक  स्वप्न साकार करण्यासाठी पाठिंबा दिला जात  आहे.

#11YearsOfMUDRA"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Railways to operate over 300 special trains for Jagannath Rath Yatra, 100 for Onam: Ashwini Vaishnaw

Media Coverage

Railways to operate over 300 special trains for Jagannath Rath Yatra, 100 for Onam: Ashwini Vaishnaw
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 जुलै 2026
July 07, 2026

PM Modi Elevating India’s Global Standing Through Diplomacy and Development