पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीच्या अध्यात्मिक भावनेबाबत त्यांचे विचार सामायिक करताना, देवी मातेच्या पुजनातून मिळणाऱ्या शांती आणि सामर्थ्याच्या सखोल भावनेवर अधिक भर दिला. मोदी यांनी याप्रसंगी देवीला समर्पित असलेले एक भक्तीगीत देखील सामायिक केले.
एक्स मंचावरील संदेशात पंतप्रधान लिहितात:
“अंबा मातेच्या आराधनेतून भक्तीचा अद्भुत आनंद मिळतो. यातून मनाला असीम शांती आणि अध्यात्मिक बळ मिळते.”
मां अम्बे की आराधना से भक्ति का अद्भुत आनंद प्राप्त होता है। इससे मन को असीम शांति और आत्मिक शक्ति मिलती है।https://t.co/mqlVG5DTj1
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2026


