पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला.

पश्चिम आशियातल्या बदलत्या परिस्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये उपयुक्त विचारांची देवाणघेवाण झाली. तणाव कमी करण्यास आणि लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यास भारताचा पाठिंबा आहे याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

जागतिक शांतता, स्थैर्य आणि आर्थिक सुस्थितीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली, सुरक्षित आणि सुगम्य राहणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी या सामुद्रधुनीचे  महत्त्व अधोरेखित केले.

या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या प्रयत्नांसंदर्भात संपर्कात राहण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली.

'X' वरील पोस्टमध्ये मोदी म्हणाले:

"राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दूरध्वनीवरून माझ्याशी संवाद साधला. पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत आमच्यात विचारांचे उपयुक्त आदानप्रदान झाले. तणाव निवळण्यास आणि लवकरात लवकर शांतता प्रस्थापित होण्यास भारत पाठिंबा देतो. 'होर्मुझची सामुद्रधुनी' खुली, सुरक्षित आणि सुगम राहील याची खात्री करणे संपूर्ण जगासाठी अत्यंत आवश्यक आहे. शांतता आणि स्थैर्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत एकमेकांच्या संपर्कात राहण्याबाबत आमच्यात सहमती झाली.”

@realDonaldTrump

@POTUS”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Shortcuts will cut you short’: PM Modi’s message for youngsters at former President Kovind’s autobiography launch

Media Coverage

‘Shortcuts will cut you short’: PM Modi’s message for youngsters at former President Kovind’s autobiography launch
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 ऑगस्ट 2026
August 13, 2026

Aatmanirbhar in Motion: Solar Homes, Made-in-India Containers, Record Exports & a Rising Global Footprint Under the Leadership of PM Modi