आसामने विकासाची नवी गती पकडली आहे: पंतप्रधान
शेतकऱ्यांचे हित हे आपल्या सरकारच्या सर्व प्रयत्नांच्या केंद्रस्थानी : पंतप्रधान
कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना आणि दलहन आत्मनिर्भरता मिशन यांसारखे उपक्रम सुरू केले आहेत : पंतप्रधान
सबका साथ, सबका विकास या संकल्पांनी प्रेरित आमच्या प्रयत्नांनी गरिबांच्या जीवनमानात परिवर्तन घडवून आणले : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी झाली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. ही भूमी चाओलंग सुखाफा आणि महावीर लाचित बोरफुकन यांसारख्या महान वीरांची भूमी असल्याचे त्यांनी नमूद केले.  भीमबर देउरी, शहीद कुशल कुंवर, मोरान राजा बौदोसा, मालती मेम, इंदिरा मिरी, स्वर्गदेव सर्वानंद सिंग आणि पराक्रमी सती साधनी यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी यावेळी केला. या शौर्य आणि बलिदानाच्या महान भूमीला, उजनी आसामच्या पवित्र मातीला आपण नमन करत असल्याची भावना पंतप्रधानांनी  व्यक्त केली.

आज या सभेच्या निमित्ताने समोर मोठ्या संख्येने जमलेले लोक आपला स्नेह व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले. या सभेसाठी जमलेल्या विशेषतः माता आणि भगिनींच्या उपस्थितीची दखलपूर्ण नोंदही त्यांनी घेतली, या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद अद्भूत आहेत असे ते म्हणाले. अनेक भगिनी आसामच्या चहाच्या मळ्यांचा सुगंध घेऊन आल्या आहेत, हा सुगंध आसामसोबतच्या आपल्या नात्यात एक आगळीवेगळी भावना निर्माण करतो, असे पंतप्रधान म्हणाले. यानिमित्ताने त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले तसेच त्यांचा स्नेह आणि प्रेमाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.

आजचा दिवस आसाम आणि संपूर्ण ईशान्य भारतासाठी ऐतिहासिक आहे, आज नामरूप आणि दिब्रुगडचे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले स्वप्न आज पूर्ण झाले असून, या प्रदेशात औद्योगिक प्रगतीचे एक नवीन युग सुरू झाले असे ते म्हणाले. सभेआधी काही वेळापूर्वीच आपण अमोनिया-युरिया खत प्रकल्पाचे भूमिपूजन, तसेच दिब्रुगडला येण्यापूर्वी गुवाहाटी विमानतळावरील नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. आसामने आता विकासाची नवा गती पकडली आहे, असे सर्वजण म्हणू लागले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आज आपण जे पाहतोय ती केवळ सुरुवात आहे, आणि आसामला अजून खूप पुढे न्यायचे आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. अहोम साम्राज्याच्या काळातील आसामच्या क्षमतेचे आणि भूमिकेचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले. विकसित भारतातही आसाम तितकीच सामर्थ्यशाली भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवीन उद्योगांची सुरुवात, आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी, सेमीकंडक्टर उत्पादन, कृषी क्षेत्रातील नवीन संधी, चहाचे मळे आणि तिथल्या कामगारांची प्रगती तसेच पर्यटनातील वाढत्या क्षमतेबद्दल ते बोलले . आज आसाम प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असल्याचे ते म्हणाले.आधुनिक खत प्रकल्पासाठी त्यांनी उपस्थितांसह आसामच्या जनतेल्या शुभेच्छा दिल्या, तसेच गुवाहाटी विमानतळाच्या नवीन टर्मिनलसाठी जनतेचे अभिनंदनही केले. केंद्र आणि राज्यातील आपल्या सरकारांच्या नेतृत्वात, उद्योग आणि दळवणीय जोडणीचा घडून येत असलेला मिलाफ, आसामची स्वप्ने पूर्ण करत आहे, युवा वर्गाला मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरित करत आहे, असे त्यांनी नमूद केले.

 

विकसित भारताच्या उभारणीत देशातील शेतकरी आणि अन्नदात्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्यक्रमावर ठेऊनच सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले, याच दृष्टीकोनातून शेतकरी स्नेही योजनांची व्याप्ती सर्वांसाठी वाढवली जात आहे असेही त्यांनी नमूद केले.  कृषी कल्याण विषयक उपक्रमांसोबतच शेतकऱ्यांना खतांचा निरंतर पुरवठा सुनिश्चित करणे आवश्यक आहे, आणि येत्या काळात असा पुरवठा होत राहील याची हमीच या नवीन युरिया प्रकल्पामुळे मिळाली आहे असे ते म्हणाले. या खत प्रकल्पासाठी सुमारे 11,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, या प्रकल्पाअंतर्गत दरवर्षी 12 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त खताचे उत्पादन घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  स्थानिक पातळीवर जलगतीने उत्पादन झाल्याने पुरवठाही तितक्याच जलद गतीने होईल, परिणामी व्यावसायिक वाहतुकीपोटी होणाऱ्या खर्चात घट होईल असे ते म्हणाले.

नामरूप युनिटमुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या हजारो नव्या संधी निर्माण होतील, असे अधोरेखित करत मोदी म्हणाले की, हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर अनेकांना स्थानिक पातळीवर कायमस्वरूपी नोकऱ्या मिळतील. तसेच दुरुस्ती, पुरवठा आणि इतर संबंधित कामांमुळेही युवकांना रोजगार उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

मोदी यांनी प्रश्न उपस्थित केला की, अशा प्रकारचे शेतकरी कल्याणकारी उपक्रम त्यांचे  सरकार सत्तेत आल्यानंतरच का होत आहेत. त्यांनी नमूद केले की, नामरूप हे दीर्घकाळ खत उत्पादनाचे केंद्र होते आणि एके काळी  येथे तयार होणाऱ्या खतामुळे संपूर्ण ईशान्य भारतातील शेतकऱ्यांच्या शेतांना बळ मिळत होते व त्यांच्या पिकांना आधार मिळत होता. देशातील अनेक भागांत खत टंचाई असतानाही नामरूप शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण होता, याचे त्यांनी स्मरण करून दिले .  मात्र जुन्या प्रकल्पांचे तंत्रज्ञान कालबाह्य झाले आणि पूर्वीच्या सरकारांनी याकडे दुर्लक्ष केले, असे त्यांनी सांगितले. परिणामी नामरूप प्रकल्पातील अनेक युनिट्स  बंद पडली , ईशान्य भारतातील शेतकरी अडचणीत सापडले, त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आणि शेतीतील समस्या वाढल्या. केंद्र आणि राज्यातील सध्याची सरकारे पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेल्या समस्या सोडवत आहेत, असा ठाम दावा पंतप्रधानांनी केला.

 

पंतप्रधानांनी सांगितले की, आसामप्रमाणेच इतर अनेक राज्यांतील खत कारखानेही बंद पडले होते. त्या काळातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली होती याची त्यांनी आठवण करून दिली .  जेव्हा युरियासाठी लांबच लांब रांगा लागायच्या, दुकानांवर पोलीस तैनात करावे लागत आणि शेतकऱ्यांवर लाठीचार्जही होत असे. विरोधकांनी परिस्थिती आणखी बिघडवली, तर सध्याचे सरकार ती सुधारत आहे, असे त्यांनी सांगितले. मागील सत्ताधारी काळात खत कारखाने बंद होत होते, तर सध्याच्या सरकारने गोरखपूर, सिंद्री, बरौनी आणि रामगुंडम येथे नवीन प्रकल्प सुरू केले आहेत, असे त्यांनी नमूद केले. या क्षेत्रात खासगी क्षेत्रालाही प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रयत्नांमुळे भारत युरियाच्या बाबतीत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला.

पंतप्रधानांनी सांगितले की, 2014 मध्ये देशात केवळ 225 लाख मेट्रिक टन युरियाचे उत्पादन होत होते, तर आज ते जवळपास 306 लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले आहे. भारताला दरवर्षी सुमारे 380 लाख मेट्रिक टन युरियाची गरज असून ही तूट भरून काढण्यासाठी सरकार वेगाने काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. सरकार शेतकऱ्यांच्या हितांबाबत अत्यंत संवेदनशील असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. परदेशातून महागड्या दराने आयात केलेला युरियाचाही  शेतकऱ्यांवर भार पडू दिला जात नाही, कारण त्याचा खर्च सरकार अनुदानाच्या माध्यमातून उचलते, असे त्यांनी नमुद केले. भारतीय शेतकऱ्यांना युरियाची एक गोणी केवळ ₹300 मध्ये मिळते, तर त्याच गोणीसाठी सरकारला इतर देशांना जवळपास ₹3,000 द्यावे लागतात, असे त्यांनी स्पष्ट केले. उर्वरित रक्कम सरकार भरते, जेणेकरून शेतकरी बांधव-भगिनींवर आर्थिक भार पडू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मातीचे संरक्षण करण्यासाठी युरिया आणि इतर खतांचा योग्य वापर करण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आज बीजापासून बाजारापर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतीसाठी लागणारा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात असल्याने त्यांना कर्जासाठी भटकावे लागत नाही, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत जवळपास ₹4 लाख कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. याच वर्षी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ₹35,000 कोटींच्या दोन योजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पीएम धन-धान्य कृषी योजना आणि डाळींमध्ये  आत्मनिर्भरता अभियानामुळे शेतीला आणखी चालना मिळेल, असे त्यांनी अधोरेखित केले.

 

शेतकऱ्यांची प्रत्येक गरज लक्षात घेऊन सरकार काम करत आहे यावर भर देत, मोदी म्हणाले की प्रतिकूल हवामानामुळे जेव्हा पिकांचे नुकसान होते, तेव्हा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेद्वारे मदत केली जाते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी खरेदी व्यवस्थेत सुधारणा करण्यात आली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शेतकरी सक्षम असेल तेव्हाच राष्ट्र प्रगती करते असा सरकारचा ठाम विश्वास असल्याचे सांगून, त्या दिशेने सर्वतोपरी  प्रयत्न केले जात असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

केंद्रामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर, पशुपालक शेतकरी, मत्स्यपालकांनाही किसान क्रेडिट कार्ड सुविधेच्या लाभाखाली आणले गेले आणि त्यांना याचा मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना या वर्षी 10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत मिळाली असल्यावर त्यांनी भर दिला. त्याचबरोबर, जैव-खतांवरील जीएसटी घटल्यामुळेही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान सुरू करून, त्यांचे केंद्र सरकार नैसर्गिक शेतीला सक्रिय प्रोत्साहन देत असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. या अभियानाशी लाखो शेतकरी जोडले गेल्याचेही त्यांनी सांगितले. अलीकडील काळात, देशात 10,000 शेतकरी उत्पादक संस्थांची (एफपीओ) स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ईशान्येकडील राज्यांकडे विशेष लक्ष केंद्रित करत सरकारने पाम तेलाशी निगडीत अभियान सुरू केले आहे, ज्यामुळे खाद्यतेलाच्या क्षेत्रात  भारत केवळ आत्मनिर्भर होणार  नाही तर या राज्यांतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी देखील होईल.

या प्रदेशात चहाच्या मळ्यातील कामगारांची संख्या मोठी असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधानांनी, त्यांच्या सरकारने आसाममधील साडेसात लाख चहा कामगारांना जन धन खाती उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे या कामगारांना थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचा फायदा मिळत आहे. चहाच्या मळ्यांच्या परिसरात शाळा, रस्ते, वीज, पाणी आणि रुग्णालय यांसारख्या सुविधा विस्तारत आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

सबका साथ, सबका विकास या मंत्राचे पालन करत सरकार पुढे जात आहे आणि त्यामुळे गरिबांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडून आल्याचे अधोरेखित करताना, या प्रयत्नांमुळेच गेल्या 11 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडून, देशामध्ये एक नवा मध्यमवर्ग उदयास आला आहे. गेल्या काही वर्षांत गरीब कुटुंबांच्या राहाणीमानात सातत्याने सुधारणा होत असल्यामुळे हे शक्य झाल्याचे ते पुढे म्हणाले.

 

अलीकडे आलेल्या आकडेवारीवरून भारतामध्ये बदल होत असल्याचे दिसून येत असल्याचं पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. पूर्वी गावातल्या सर्वांत गरीब दहा कुटुंबापैकी एका कुटुंबाकडे दुचाकी असे, तर आता गावांमधील निम्म्या कुटुंबांकडे दुचाकी अथवा चार चाकी आहे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मोबाइल फोन जवळपास प्रत्येक घरापर्यंत पोहोचले आहेत आणि एकेकाळी चैनीची गोष्ट मानली जाणारी फ्रीज सारखी वस्तू आता सामान्य झाली असून, गावांतल्या स्वयंपाकघरात त्यांना स्थान मिळालं आहे. स्मार्टफोन्सचा प्रसार होऊनही, खेडोपाडी टीव्ही घेण्याचा कल वाढतो आहे. हे बदल आपोआप झालेले नाहीत, तर देशातील गरीब लोक सक्षम होत असल्यामुळे  आणि दुर्गम भागात राहाणाऱ्या लोकांनाही विकासाचा फायदा मिळत असल्याने हे बदल घडून येत आहेत यावर मोदी यांनी भर दिला.

केंद्रात आणि राज्यात असलेली त्यांची सरकारे, गरीब, आदिवासी, तरुण आणि महिलांसाठी तसेच  गेल्या अनेक दशकांपासून आसाम आणि ईशान्येकडील राज्यात सुरू असलेला हिंसाचार संपवण्यासाठी काम करत आहेत, असे सांगून मोदींनी, सरकारने नेहमीच आसामची ओळख  आणि संस्कृतीला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे आणि प्रत्येक व्यासपीठावर आसामच्या अभिमानाची प्रतीके व्यासपीठांवरून ठळकपणे मांडली असल्याचे अधोरेखित केले. म्हणूनच महावीर लचित बोरफुकान यांचा 125 फुटी पुतळा सरकारने अभिमानाने साकारला, भुपेन हजारिका यांची जन्मशताब्दी साजरी केली आणि आसामची कला, हस्तकला  आणि गमोसा यांना जागतिक प्रतिष्ठाही मिळवून दिली.

काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष महामहिम व्लादिमीर पुतिन दिल्ली दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांना अभिमानाने आसामचा काळा चहा भेट म्हणून देण्यात आल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला.

पंतप्रधानांनी स्पष्ट केले की आसामच्या प्रतिष्ठेत भर घालणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाला प्राधान्य दिले जाते. अशा प्रकारची कामे केली की विरोधक सर्वाधिक अस्वस्थ होतात असे त्यांनी नमूद केले. भारतरत्न भूपेन हजारिका यांना भारतरत्न देण्यात आले , तेव्हा विरोधकांनी उघडपणे त्याला विरोध केला होता, आणि त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी “मोदी गायक आणि कलाकारांना भारतरत्न देत आहेत” अशी टीका केली होती, याची त्यांनी आठवण करून दिली. तसेच, आसाममध्ये सेमीकंडक्टर  युनिट उभारले गेले तेव्हाही विरोधकांनी त्याला विरोध केल्याचे त्यांनी सांगितले.

 

पंतप्रधानांनी स्मरण करून दिले की अनेक दशकांपर्यंत विरोधी सरकारांनी चहामळ्यातील कामगार बांधव-भगिनींना जमीन हक्क नाकारले होते, त्याउलट  त्यांच्या सरकारने त्यांना जमीन हक्क दिले आणि सन्मानजनक जीवन बहाल केले. विरोधक अजूनही राष्ट्रविरोधी विचारसरणीला प्रोत्साहन देत असून, मतपेढी मजबूत करण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना आसामच्या जंगलांमध्ये आणि जमिनींवर वसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की विरोधकांना आसाम येथील जनता किंवा त्यांची ओळख यांची कोणतीही काळजी नाही; त्यांना फक्त सत्ता आणि सरकारचीच चिंता आहे. विरोधक बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना प्राधान्य देतात, त्यांना वसवतात आणि त्यांचे संरक्षण करतात, असे त्यांनी म्हटले. त्यामुळेच विरोधक मतदार यादी शुद्धीकरणाला विरोध करतात, हेही त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले की आसामला विरोधकांच्या तुष्टीकरणाच्या आणि मतपेढीच्या राजकारणाच्या विषापासून वाचवणे गरजेचे आहे. आसामची ओळख आणि सन्मान जपण्यासाठी त्यांचा पक्ष ढालीसारखा उभा आहे, असा विश्वास त्यांनी जनतेला दिला.

विकसित भारत घडवताना पूर्व भारत आणि ईशान्य भारताची भूमिका सातत्याने वाढत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. पूर्व भारत देशाच्या विकासाचे  इंजिन बनेल, हे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. नव्या नामरूप युनिटचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की येथे तयार होणारे खत केवळ आसामच्या शेतांपुरते मर्यादित न राहता बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचणार आहे. देशाच्या खत गरजांमध्ये ईशान्य भारताचे हे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

 

विकसित भारत घडवताना पूर्व भारत आणि ईशान्य भारताची भूमिका सातत्याने वाढत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. पूर्व भारत देशाच्या विकासाचे  इंजिन बनेल, हे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. नव्या नामरूप युनिटचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की येथे तयार होणारे खत केवळ आसामच्या शेतांपुरते मर्यादित न राहता बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचणार आहे. देशाच्या खत गरजांमध्ये ईशान्य भारताचे हे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी शेवटी नमूद केले की नामरूपसारखे प्रकल्प दर्शवतात की येणाऱ्या काळात ईशान्य भारत आत्मनिर्भर भारताचे प्रमुख  केंद्र म्हणून उदयाला येईल आणि खऱ्या अर्थाने अष्टलक्ष्मी ठरेल. नव्या खत प्रकल्पासाठी त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाला आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी आसाममधील दिब्रुगढ जिल्ह्यात नामरूप येथे ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या विद्यमान परिसरात नव्या ब्राउनफिल्ड अमोनिया-युरिया खत प्रकल्पाचे भूमिपूजन केले. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला पुढे नेत, सुमारे 10,600 कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प आसाम आणि शेजारील राज्यांच्या खत संबंधी गरजा पूर्ण करणार आहे. यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळेल. हा प्रकल्प औद्योगिक पुनरुज्जीवन आणि शेतकरी कल्याणाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार आहे.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
UP's exports to BRICS nations, partners cross $5.36 billion in FY26: Govt

Media Coverage

UP's exports to BRICS nations, partners cross $5.36 billion in FY26: Govt
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of PM’s address on the occasion of completion of two years of the Government of Odisha
June 20, 2026
I extend my heartfelt birthday greetings to President Smt. Droupadi Murmu Ji, I wish her long life and excellent health: PM
Pahadpur village will now be rapidly developed as a solar village, that is, solar power will be ensured in every home here: PM
The vision of the Central Government is the development of India through the development of Eastern India: PM
To uplift tribal society, we are connecting tribal youth with opportunities for education and employment: PM
These children should get better facilities for studies; for this, around 500 Eklavya Model Schools have been opened across the country: PM

जॉय जगन्नाथ! जॉय मां किचकेश्वरी! मोर सबू भाई,भौणी,मां,मौसी मानंकु मोर नमोस्कार।

माननीय राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी, राज्यपाल श्री हरि बाबु जी, यहां के लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन चरण माझी जी, उप मुख्यमंत्री कनक वर्धन सिंह देव जी, प्रवती परीदा जी, ओडिशा के मंत्री गणेश सिंह खूंटिया जी, कृष्ण चंद्र महापात्र जी, सांसद नबा चरण माझी जी, मनमोहन सामल जी, बैजयंत पांडा जी, अन्य महानुभाव, भाइयों और बहनों।

हमारा ओडिशा इन दिनों उत्सवों के आनंद में डूबा हुआ है। यहाँ का गणपर्व रज, पिछले हफ्ते ही धूमधाम से मनाया गया है। महाप्रभु जगन्नाथ जी की रथ यात्रा की तैयारियां भी पुरजोश चल रही है। मयूरभंज के बारीपदा रथ यात्रा को लेकर भी उत्साह का माहौल है। और, इस सबके बीच ही लोकतन्त्र का विकास का उत्सव भी चल रहा है। ओडिशा की बीजेपी सरकार ने अपने 2 साल भी पूर्ण किए हैं। इस मौके पर, आप सबके बीच आना, मयूरभंज आने का ये सौभाग्य, और इतनी बड़ी संख्या में आप सबकी उपस्थिति, ये अवसर मेरे लिए बहुत खास है। आपका अपनापन मुझे बार-बार यहां खींच लाता है। मैं आप सभी का हृदय से बहुत-बहुत अभिनंदन करता हूँ। और ओडिशा की जनता को डबल इंजन सरकार में विकास यात्रा की भी बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूं। साथ ही, इस अवसर पर मैं पंडित रघुनाथ मुर्मू जी, डॉ. दमयंती बेश्रा जी, और श्री चरण हेम्ब्रम जी जैसी विभूतियों को भी नमन करता हूँ। रघुनाथ मुर्मू जी ने संथाली भाषा के लिए ओल चिकी लिपि का निर्माण किया था। हमारी सरकार ने संथाली भाषा में भारत के संविधान को प्रस्तुत किया है। ओडिशा की संतानों को पद्म सम्मान देकर सम्मानित किया है। पिछले 2 वर्षों में ओडिशा सरकार भी इन सभी विभूतियों के सपनों को पूरा करने में दिन रात पुरुषार्थ कर रही है।

साथियों,

आज का ये अवसर इसलिए भी विशेष है, क्योंकि मयूरभंज की धरती पर पली-बढ़ीं, ओडिशा की बेटी, माननीय राष्ट्रपति जी हमारे बीच उपस्थित हैं। आज उनका जन्मदिन भी है। मैं राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी को जन्मदिन की हार्दिक बधाई और शुभकमानाएं देता हूं, मैं उनके दीर्घायु होने और उत्तम स्वास्थ्य की कामना करता हूं। जनगन्नाथ जी भगवान के श्री चरणों में प्रार्थना करता हूं। ओडिशा की बेटी आज देश के इतने बड़े पद पर पहुंची हैं, हमारा मार्गदर्शन कर रही हैं, ये हम सभी के लिए बहुत गौरव की बात है। राष्ट्रपति जी का व्यक्तित्व, उनका उदार और सहृदय स्वभाव, राष्ट्र और समाज की सेवा के लिए उनका अटल समर्पण, उन्होंने मयूरभंज ही नहीं, पूरे ओडिशा की पहचान सशस्त की है। मैं इस अवसर पर, उनका विशेष रूप से अभिनंदन करता हूँ।

साथियों,

ये कार्यक्रम जब बना, तो इसमें मूल कारण तो लॉजिस्टिक था, लंबे अर्से से यहां आने के लिए चर्चा चल रही थी, लेकिन कोई तालमेल नहीं बैठता था। 21 जून को अंतर्राष्ट्रीय योगा दिवस कोलकाता में तय हुआ, तो फिर मैंने कहा अच्छा है, आज बंग दिवस भी है, तो क्यों न मैं सुबह मयूरभंज होकर के शाम को फिर कोलकाता के कार्यक्रम में जाऊं। और इसके कारण ये 20 जून तय हुई। लेकिन कुछ चीजें ऐसी होती हैं, जिसकी मंगल कामनाएं ईश्वरआधीन होती हैं, और इसलिए आज एक शुभ मंगल हो गया, कि राष्ट्रपति का जन्मदिन भी, मुझे आज उनके गांव में जाकर के, उनको शुभकामनाएं देने का अवसर मिला।

साथियों,

आज मैं राष्ट्रपति जी के साथ पहाड़पुर भी गया था। मैं इस क्षेत्र के बच्चों के लिए उनके द्वारा बनवाए गए स्कूल भी गया। बच्चों के साथ कुछ यादगार समय बिताने का अवसर मुझे मिला। मैं देख रहा था, बच्चों के चेहरों की चमक, राष्ट्रपति जी की उपस्थिति और आत्मीयता, वहां मुझे ऐसा कुछ भी नहीं लगा, किसी बच्चे को ये लगा हो कि राष्ट्रपति जी आई हैं, हर बच्चे को लगता था उनकी मां आई है। वे बच्चे भी बहुत भाग्यवान हैं, कैसे इस क्षेत्र के गरीब, वंचित और आदिवसी समाज के बच्चों को प्रेरणा मिल रही है, उन्हें देश के लिए कुछ बड़ा करने का आत्मविश्वास मिल रहा है। मैं राष्ट्रपति जी का आभारी हूं कि उन्होंने इन अनुभवों से गुजरने का आज मुझे अवसर दिया। ये मेरा दिन, एक प्रकार से मेरी शिक्षा का दिवस था, कुछ सीखने का अवसर था मेरे लिए।

साथियों,

मैं आपको सरकार का ये निर्णय भी बताना चाहता हूं कि पहाड़पुर गांव को, अब तेजी से सुर्यग्राम, सोलर विलेज के रूप में विकसित किया जाएगा। यानी यहां हर घर में सोलर बिजली बने, इसे सुनिश्चित किया जाएगा। और हम तो बड़ा गर्व के साथ कह सकते हैं कि यही ओडिशा है, जहां कोणार्क में सुर्य मंदिर की एक पहचान है, वैसे ही पहाड़पुर सुर्यग्राम की पहचान बन जाएगा। सुर्यग्राम, से पूरा गांव सोलर विलेज के रूप में पहचाना जाए, इस दिशा में काम तुरंत शुरू हो ऐसा मेरा प्रयास रहेगा। इस अभियान से, पहाड़पुर के लोगों को मुफ्त सोलर बिजली भी मिलेगी और जो ज्यादा बिजली होगी, वो उनकी आय भी बढ़ाएगी।

साथियों,

ओडिशा में डबल इंजन सरकार के 2 साल कई मायनों में ऐतिहासिक रहे हैं। मुख्यमंत्री मोहन चरण माझी जी के नेतृत्व में, आज ओडिशा तेज गति से विकास के रास्ते पर आगे बढ़ रहा है। आज यहां गरीब कल्याण की योजनाओं से सामान्य मानवी का जीवन बदल रहा है। ओडिशा में आर्थिक गतिविधियाँ निवेश और उद्योगों को आकर्षित करने का सामर्थ्य आज नज़र आ रहा है। यहाँ रोजगार के नए अवसरों के लिए तेजी से काम हो रहा है।

साथियों,

केंद्र सरकार का विज़न है- पूर्वी भारत के विकास से भारत का विकास। इसीलिए, हम पूर्वोदय की नीति पर काम कर रहे हैं। जिस पूर्वी भारत को काँग्रेस के दौर में पिछड़ेपन का पर्याय बना दिया गया था, आज वो प्रगति का प्रवेश द्वार बन रहा है। आज ओडिशा खुद इस बदलाव का साक्षी बन रहा है।

साथियों,

ओडिशा के पास समुद्र है, खनिज संपदा है, कृषि की शक्ति है और सबसे सामर्थ्यवान यहां युवा प्रतिभा है। इस सामर्थ्य का पूरा उपयोग करने के लिए हम मिलकर काम कर रहे हैं। इसीलिए, आज ओडिशा में रेलवे इनफ्रास्ट्रक्चर में रिकॉर्ड निवेश हो रहा है। नई सड़कें और आर्थिक कॉरिडोर बन रहे हैं। पोर्ट्स का विस्तार हो रहा है। ऊर्जा, सेमीकंडक्टर, ग्रीन एनर्जी और आधुनिक उद्योगों में निवेश आ रहा है। आज भी यहां ओडिशा के विकास से जुड़ी अनेक महत्वपूर्ण परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास हुआ है। इन परियोजनाओं पर लगभग 47 हजार करोड़ रुपये खर्च किए जाएंगे। बिजली, सड़क, रेलवे, स्वास्थ्य और शिक्षा से जुड़ी इन परियोजनाओं से, आप सभी लोगों को बहुत सुविधा होने वाली है। मैं इन परियोजनाओं के लिए ओडिशा के लोगों को बहुत बहुत बधाई देता हूं।

साथियों,

हमारी सरकार ओडिशा के संसाधनों को, ओडिशा की संभावनाओं में बदल रही है। ओडिशा में बड़ा निवेश आए, यहाँ नए उद्योग लगें, इसके लिए उत्कर्ष ओडिशा जैसे अभियान चलाए जा रहे हैं। इसके तहत, अब तक करीब 20 लाख करोड़ रुपए के निवेश प्रस्ताव मिल चुके हैं। साढ़े 3 लाख करोड़ रुपए से ज्यादा की अनेक मेगा परियोजनाओं पर भी काम चल रहा है। उद्योगों के लिए अनुकूल वातावरण बने, इसके लिए ओडिशा के समग्र विकास पर ध्यान दिया जा रहा है। पावर सेक्टर में 6 हजार करोड़ रुपए से ज्यादा का निवेश हो रहा है। समृद्ध शहर योजना के तहत शहरी विकास को गति दी जा रही है। आने वाले वर्षों में इन प्रयासों का परिणाम हमें देखने को मिलने वाला है।

साथियों,

डबल इंजन सरकार की बड़ी विशेषता ये है कि वो खुद जनता तक पहुँचती है। हमारा प्रयास है कि सामान्य नागरिक को किसी समस्या के समाधान के लिए अनावश्यक चक्कर न लगाने पड़े। इन्हीं प्रयासों का परिणाम है कि युवाओं, महिलाओं, किसानों और आम लोगों की अपेक्षाएँ आज पूरी हो रही हैं। आप देखिए, धान खरीद में किसानों को 3,100 रुपये प्रति क्विंटल देने का निर्णय लिया गया। सुभद्रा योजना के माध्यम से एक करोड़ से अधिक माताओं और बहनों तक आर्थिक सहायता पहुंचाई गई। आयुष्मान भारत को लागू करके ओडिशा के परिवारों के लिए देशभर के अस्पतालों में इलाज का रास्ता खोला गया। आदिवासी विद्यार्थियों की पढ़ाई बीच में न छूटे, इसके लिए माधो सिंह हाथ-खर्चा योजना शुरू की गई। महाप्रभु श्री जगन्नाथ जी के भक्तों की भावनाओं का सम्मान करते हुए श्रीमंदिर के श्रद्धालुओं के लिए सारे द्वार खोल दिए गए, चारों-चार द्वार खोल दिए गए। डबल इंजन की ताकत मिलने से आज यहां चारों दिशाओं में विकास सुनिश्चित हो रहा है।

साथियों,

यहां बीते दिनों स्वच्छता को लेकर जो विशेष अभियान चला है, उसकी भी मुझे जानकारी मिली है। और मैं देख रहा था सोशल मीडिया में तो सफाई अभियान छाया हुआ है, यानी स्वच्छता से स्वागत, मैं ओडिशा की इस पहल के लिए, यहां के नगारिको का, सरकार का, मुख्यमंत्री जी का, इस प्रशंसनीय पहल के लिए बहुत ही प्रशंसा करता हूं, संतोष व्यक्त करता हूं।

साथियों,

स्वच्छता हमारे जीवन शैली का हिस्सा होनी चाहिए, हर रोज की आदत होनी चाहिए। मैं यहां स्वच्छता अभियान से जुड़े सभी लोगों का हृदय से बहुत-बहुत अभिनंदन करता हूं।

साथियों,

मैंने अपने जीवन का कुछ महत्वपूर्ण कालखंड जनजातीय क्षेत्रों में एक वालंटियर के रूप में काम करते हुए बिताया है। माननीय राष्ट्रपति जी तो बरसों तक ऐसे क्षेत्रों में चुनौतियां का सामना करती रही हैं। आप और हम जानते हैं कि जनजातीय क्षेत्रों में जीवन की सुविधाएं आसानी से नहीं पहुंचती थीं। इसलिए, हमारी सरकार ने जनजातीय विकास को बहुत प्राथमिकता दी है। हमने ऐसे इलाकों को सुविधाओं से जोड़ने के लिए धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान शुरू किया। इसके तहत स्वास्थ्य, शिक्षा, सड़क, आवास से जुड़े विभाग मिलकर के सर्वागीण विकास के लिए काम कर रहे हैं। ताकि वहां रहने वाले लोगों की कठिनाइयां दूर हो सकें। इसी तरह, पीएम जनमन अभियान तो राष्ट्रपति जी के साथ हुई चर्चाओं का, उनके मार्गदर्शन का ही परिणाम है। ये विशेष रूप से देश के ऐसे जनजातीय समूहों के लिए है, जो जनजातीय समुदाय में भी सबसे पीछे रह गए हैं। ऐसे जनजातीय समुदायों तक अब सरकार स्वयं चलकर उनके गांव, उनके दरवाजे तक पहुंच रही है।

साथियों,

आदिवासी समाज के उत्थान के लिए हम आदिवासी युवाओं को शिक्षा और रोजगार के अवसरों से जोड़ रहे हैं। इन बच्चों को पढ़ाई की बेहतर सुविधा मिले, इसके लिए देश में करीब 500 एकलव्य मॉडल स्कूल खोले गए हैं। करीब साढ़े सात सौ एकलव्य स्कूल स्वीकृत किए गए हैं। प्री-मैट्रिक और पोस्ट मैट्रिक लेवल पर, डेढ़ करोड़ से अधिक आदिवासी बच्चों को सैकड़ों करोड़ रुपए की स्कॉलर्शिप दी गई है। मुझे ये बताते हुए भी खुशी है कि यहां मयूरभंज में एक और नवोदय विद्यालय बनाने के लिए भी स्वीकृति दे दी गई है।

साथियों,

दूर-दराज इलाकों में रहने के कारण, जनजातीय समाज स्वास्थ्य से जुड़ी कठिनाइयों का भी शिकार रहा है। सिकल सेल एनीमिया जैसी बीमारियाँ एक बहुत बड़ी चुनौती रही हैं। हमने इनके खिलाफ देश भर में अभियान चलाया, चार करोड़ से ज्यादा हेल्थ कार्ड बांटे, मुफ्त इलाज के लिए करोड़ों आदिवासी लाभार्थियों को आयुष्मान कार्ड दिये। जल जीवन मिशन के तहत घर-घर साफ पानी पहुंचाया जा रहा है। इन प्रयासों का परिणाम आज हमें दिख रहा है। आदिवासी समाज दशकों पुरानी कठिनाइयों से बाहर आ रहा है, और, विकास की मुख्यधारा का हिस्सा बन रहा है।

साथियों,

आने वाले समय में हमारे सामने दो महत्वपूर्ण पड़ाव हैं। 2036 में ओडिशा के गठन के 100 वर्ष पूरे होंगे। और, 2047 में भारत की स्वतंत्रता के 100 वर्ष पूरे होने वाले हैं। यानी, ओडिशा और देश का लक्ष्य एक ही दिशा में है। ओडिशा की अर्थव्यवस्था मजबूत होगी, तो भारत मजबूत होगा। मुझे ओडिशा के सामर्थ्य पर भरोसा है। हमें मिलकर ओडिशा को विकास की बुलंदियों पर पहुंचाना है।

साथियों,

कल 21 जून को अंतर्राष्ट्रीय योग दिवस भी मनाया जाना है। ज्ञान और योग की धरती ओडिशा, योग यहाँ के संस्कारों का हिस्सा रहा है। मैं ओडिशा की धरती से पूरे देश से, पूरी दुनिया के लोगों से आह्वान करता हूँ, आप सब ज्यादा से ज्यादा संख्या में योग दिवस में हिस्सा लें। मैं एक बार फिर आप सभी को आज के अवसर, और विकास परियोजनाओं की बहुत-बहुत बधाई देता हूं। मैं माननीय राष्ट्रपति जी का विशेष रूप से आभार प्रकट करता हूं, कि मुझे उनके साथ उनकी कर्मभूमि को देखने का मौका मिला। एक बार फिर उन्हें जन्मदिन की बहुत-बहुत बधाई। बहुत-बहुत धन्यवाद।

जय जगन्नथ।

जय जगन्नथ।

जय जगन्नथ।